Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News Updates : बीड हादरलं! मित्रानेच मित्राची धारदार शस्त्राने केली हत्या

Crime News Live Updates Marathi : आज दिनांक 04 - 09- 2025 रोजी देश-विदेशासह राज्यातील गुन्हेगारी संदर्भातल्या ताज्या घडामोडींचे अपडेट वाचा फक्त एका क्लिकवर...

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 04, 2025 | 05:33 PM
Crime News Live Updates

Crime News Live Updates

Follow Us
Close
Follow Us:

बीड शहरातील स्वराज्य नगर भागात चाकूने हल्ला करून एका 25 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या हत्येचं कारण समोर आले असून मित्रात किरकोळ वाद झाला आणि मित्रानेच मित्राची धारदार शस्त्राने हत्या केली. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी पाठलाग करून बड्या शिताफीने अवघ्या काही तासांत अटक केली आहे. काल मध्यरात्री दोन वाजता विजय काळे हा गणपतीच्या समोर मित्रांसोबत नृत्य करत होता. त्याने त्या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील पोस्ट केला होता. मात्र थोड्याच वेळात मित्र अभिषेक गायकवाड याच्यासोबत किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर आरोपी अभिषेकने विजयच्या छातीत धारदार शस्त्राने वार केला. त्याला उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला.

The liveblog has ended.
  • 04 Sep 2025 05:25 PM (IST)

    04 Sep 2025 05:25 PM (IST)

    डॉल्बी व लेझर लाईट वापरल्यास कारवाई होणार

    गणेशोत्सवाचे दिवस उत्साह, भक्ती आणि सांस्कृतिक परंपरेचे द्योतक मानले जातात. मात्र, विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे, डॉल्बी व लेझर लाईटच्या वाढत्या वापरामुळे ध्वनीप्रदूषण, अराजकता आणि अनुशासनभंगाचे प्रकार वाढत असल्याने पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे की, विसर्जन मिरवणुकांमध्ये डॉल्बी वा लेझर लाईटचा वापर झाल्यास संबंधित गणेश मंडळांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

  • 04 Sep 2025 05:05 PM (IST)

    04 Sep 2025 05:05 PM (IST)

    मारहाणप्रकरणी एकावर गुन्हा

    मारहाण प्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, दि. २८ रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सुनील प्रकाश चव्हाण (रा. तामजाईनगर, सातारा) यांना उसने पैसे न दिल्याच्या कारणावरून लाकडी दांडक्याने तसेच वस्ताऱ्याने मारहाण केली. यात ते जखमी झाले. याप्रकरणी राजेंद्र गंगाराम पवार यांच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार बोडरे करीत आहेत.

  • 04 Sep 2025 04:50 PM (IST)

    04 Sep 2025 04:50 PM (IST)

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात बँकेत ७३ पदांची भरती

    सिंधुदुर्ग जिल्हा बॅक लवकरच तब्बल ७३ कर्मचारी वर्गाची पदे भरती प्रकियेने भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रिया मध्ये ५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. यानंतर परीक्षा घेऊन ७३ जणांची नि:पक्षपतीपणे भरती केली जाणार असल्याचा दावा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन मनिष दळवी यांनी केला आहे.

  • 04 Sep 2025 04:45 PM (IST)

    04 Sep 2025 04:45 PM (IST)

    टेंभूर्णीत तरुणाची गळफास लावून आत्महत्या

    टेंभुर्णी येथे तरुणाने  राहत्या घराच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. आकाश रणजित शिंदे (वय २८, रा. शिवाजीनगर टेंभुर्णी, ता. माढा) असे मृताचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगी असा परिवार आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मृताचे भाऊ सुरज रणजित शिंदे यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास जाधव करीत आहेत.

  • 04 Sep 2025 04:45 PM (IST)

    04 Sep 2025 04:45 PM (IST)

    गगनबावडा घाटात दरड कोसळली

    वैभववाडीतील गगनबावडा घाटात दरडीचा मोठा मलबा कोसळल्याची घटना आज सकाळी ८ च्या सुमारास घडली. यामध्ये मोठमोठे दगड व माती रस्त्यावर आली असून दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत रस्त्यावरील दरड हटवून वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे. यामुळे कोल्हापूर व सिंधुदुर्गात जाणाऱ्या प्रवाशांची होणार गैरसोय झाली आहे.

  • 04 Sep 2025 04:25 PM (IST)

    04 Sep 2025 04:25 PM (IST)

    इचलकरंजीमध्ये जेवणात आढळल्या अळ्या

    इचलकरंजी महानगरपालिकेमार्फत घरगुती गौरी गणपती विसर्जनासाठी पर्यावरणपूरक जलकुंडांची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी सकाळपासून उशिरापर्यंत अनेक कर्मचारी जबाबदारीने कार्यरत होते. मात्र आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांशी अत्यंत हलगर्जीपणाचा प्रकार घडला आहे. महानगरपालिकेकडून कर्मचाऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात दिलेले जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर भोजनामध्ये अळीही सापडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप उसळला आहे.

  • 04 Sep 2025 04:05 PM (IST)

    04 Sep 2025 04:05 PM (IST)

    मोबाईल चोरी करणारी परप्रांतीय टोळी जेरबंद

    सातारा शहरातील मोबाईल चोरीचे प्रकरण शाहूपुरी पोलिसांनी उलगडले आहे. राधिकारोड ते एसटी स्टँड परिसरात पेट्रोलिंग करताना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने संशयावरून ताब्यात घेतलेल्या एका वाहनातील पाच जणांना पकडून त्यांची कसून चौकशी केली. त्यावेळी त्यांनी बारा मोबाईल चोरल्याचे कबूल केले. या कारवाईत गेल्या तीन दिवसात सातारा शहर भाजी मंडई, सदाशिव पेठ, जुना मोटर स्टॅन्ड येथून चोरी गेलेले १२ मोबाईल हस्तगत करण्यात आले. हा मुद्देमाल तब्बल १० लाख २५८ रुपयाचा आहे. याप्रकरणी जगदीश रामप्रसाद महतो, अजित कुमार, सुरेश मंडळ, रोहित कुमार, सियाराम महतो (वय २५), अर्जुन राजेश मंडल, (वय २०, सर्व जण रा. महाराजपूर, सहाबगंज, राज्य झारखंड), शोएब मस्तान, साहेब शेख (वय २४ रा. सलगर पुरा, ता. मुखेड, जि. नांदेड), एक विधी संघर्ष बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

  • 04 Sep 2025 03:40 PM (IST)

    04 Sep 2025 03:40 PM (IST)

    दुभाजकाला धडकून चारचाकी पलटी

    जरंडेश्वर नाक्यावर दुभाजकावरील पथदिवे बंद असल्याने चालकाला दुभाजकाचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्यांची चारचाकी दुभाजकाला धडकली आणि पलटी झाली. या अपघातात गाडीतील दोन जण जखमी झाले. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात  घडला. या रस्त्यावरील दुभाजकावर असलेले पथदिवे बंद असल्याने परिसरात पूर्णपणे अंधार होता. त्यामुळे चालकाला दुभाजक वेळेवर दिसला नाही आणि त्यांची गाडी थेट दुभाजकावर आदळली. धडक इतकी जोरदार होती की गाडी पलटी झाली. अपघातानंतर गाडीतील प्रवासी अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने गाडीतील जखमींना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी अपघातग्रस्त गाडी रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. या घटनेची नोंद पोलिसात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

  • 04 Sep 2025 03:30 PM (IST)

    04 Sep 2025 03:30 PM (IST)

    SC On Flood: "आम्ही निसर्गासह इतकी छेडछाड..."; 'या' राज्यांमधील महापुरावर कोर्टाने काढली थेट नोटीस; म्हणाले...

    देशभरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक राज्यांमध्ये अति ते अति मुसळधार पाऊस सुरु आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पंजाब व राजधानी दिल्लीला महापुराचा फटका बसला आहे. दरम्यान निर्माण झालेल्या पुरस्थितीवर सुप्रीम कोर्टाने उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावली आहे.

  • 04 Sep 2025 03:20 PM (IST)

    04 Sep 2025 03:20 PM (IST)

    अमली पदार्थ खरेदी व्यवहारातून वाद

    पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अमली पदार्थ खरेदीसाठी आलेल्या तीन तरुणांवर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना रास्ता पेठेतील क्वार्टर गेट चौक परिसरात मंगळवारी मध्यरात्री घडली आहे. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तिघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आकाश उणेचा, चैतन्य, तसेच त्यांच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात राहुल बंडू पवार (वय ३१, सध्या रा. काळेपडळ. मूळ रा. रांजणी, ता. गेवराई, जि. बीड ), गौरव नितीन साठे, राजा मुन्ना पंडीत जखमी झाले आहेत. पवार यांनी याबाबत समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

  • 04 Sep 2025 02:40 PM (IST)

    04 Sep 2025 02:40 PM (IST)

    अमरावती हादरली! पतीला झोपेच्या गोळ्या देऊन पत्नीने संपवलं

    अमरावतीतून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे धक्कदायक घटना समोर आली आहे. त्याच्या चेहऱ्यावर राफ्टरने वार करून त्याला ठार मारण्यात आलं. ही घटना पथ्रोट येथील झेंडा चौक येथे मंगळवारी रात्री 10:45 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मृतकाचे नाव अरविंद नजीर सुरत्ने असे आहे. याप्रकरणी पथ्रोट पोलिसांनी ३ सेप्टेंबरला पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास महिलेसह तिच्या प्रियकराविरुद्ध खून व ॲट्रासिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्रियकराला मंगळवारी अटक करण्यात आली. तर महिलेला बुधवारी अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे.

  • 04 Sep 2025 02:25 PM (IST)

    04 Sep 2025 02:25 PM (IST)

    देशभरात पावसाचा कहर; उत्तराखंड नव्हे तर ‘या’ राज्यांमध्ये घालणार धुमाकूळ

    IMD Indian Rain Alert: गेल्या काही दिवसांपासून देशभरात मुसळधार पाऊस सुरु आहे. पंजाब, राजधानी दिल्लीत महापुराचा फटका बसला आहे. नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाराष्ट्राच्या देखील काही जिल्ह्यात पाऊस सुरु आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांसाठी पावसाचा अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने कोणत्या राज्यांना कोणता अलर्ट दिला आहे, त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • 04 Sep 2025 02:20 PM (IST)

    04 Sep 2025 02:20 PM (IST)

    नांदेडमध्ये भीषण अपघात, ३ जणांचा जागीच मृत्यू

    नांदेडमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नांदेडच्या भोकर तालुक्यातील पाळज येथील प्रसिद्ध असलेल्या गणपतीचे दर्शन घेऊन परत जात होती तेव्हा हा अपघात घडला. भोकर तालुक्यातील नांदा म्है.प. येथील शाळेजवळ उभ्या असलेल्या ट्रकला कारने धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला आहे. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. मयत सर्व तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्यातील बोधन येथील रहिवासी आहे. ही घटना बुधवारी घडली असून ही अपघाताची दुसरी घटना आहे.

  • 04 Sep 2025 02:00 PM (IST)

    04 Sep 2025 02:00 PM (IST)

    तिहेरी हत्याकांडाने रत्नागिरी हादरली!

    रत्नागिरी शहरातून तिहेरी हत्याकांड समोर आला आहे. या हत्याकांडाने रत्नागिरी हादरली आहे. दुर्वास पाटील असे या हत्याप्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. आधी त्याला एका तरुणीच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. तेव्हा त्याने आणखी दोन हत्या केल्याचे कबुल केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. हि हत्या दुर्वास पाटील याच्या वडिलांच्या नावे असलेला सायली बार जवळच संबंधित असल्याचेही समोर आलं आहे. सिरीयल किलर ठरलेला दुर्वास व त्याचे साथीदार सध्या पोलीस कोठडीत आहेत. पोलीस तपासात याबाबत अनेक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.

  • 04 Sep 2025 01:40 PM (IST)

    04 Sep 2025 01:40 PM (IST)

    बीडच्या परळीत ५ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, शहरात प्रचंड संताप

    बीड जिल्ह्यातील परळी येथे एक संतापजनक आणि धक्कदायक घटना समोर आली आहे. या रेल्वे स्थानकात एका पाच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांना तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, विशेषतः फाशीची शिक्षा मिळावी,या मागणीसाठी परळी शहर बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे आज परळी शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे.

  • 04 Sep 2025 01:30 PM (IST)

    04 Sep 2025 01:30 PM (IST)

    संतापजनक! डुकरांना त्रास होऊ नये म्हणून कुत्रे-मांजरींना दिले विष, २० पेक्षा जास्त ठार

    नाशिक मधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने कुत्रे-मांजरींना विष देऊन संपवल्याचे समोर आले आहे. जवळपास 20 पेक्षा जास्त भटके श्वान आणि काही मांजरी ठार केल्याचे समोर आले आहे. हे करण्यामागचं उद्देशष्य केवळ इतकंच की डुक्करांचे रक्षण, डुकरांना त्रास होऊ नये. ही घटना नाशिकच्या सटाणा तालुक्यातील अंबासन गावात समोर आला आहे. डुक्कर पालकाने आपल्या डुक्करांचे रक्षण करण्यासाठी शांत डोक्याने हे क्रूर कृत्य केलं आहे. त्यामुळे प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

  • 04 Sep 2025 01:00 PM (IST)

    04 Sep 2025 01:00 PM (IST)

    गुरुवार पेठेत सोसायटीत आग

    गुरुवार पेठेतील सोसायटीत पार्किंगमधील वीज मीटर आणि दुचाकींना पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे सोसायटीत मोठ्या प्रमाणावर धूर झाला. तत्काळ अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला गेला. दरम्यान, आग नेमकी का लागली हे समजू शकले नाही.
    गुरुवार पेठेत झेबा शेल्टर्स सोसायटी आहे. तळमजल्यावर वीज मीटर तसेच दुचाकी वाहने लावली जातात. दरम्यान, या सोसायटीत बुधवारी (३ सप्टेंबर) पहाटे साडेतीनच्या सुमारास वीज मीटर तसेच दुचाकींनी पेट घेतला. सोसायटीतील रहिवासी गाढ झोपेत होते. तळमजल्यावर दुचाकी, वीज मीटरला आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर धूर झाला. आग भडकल्याने रहिवासी घाबरले. नागरिकांनी अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करुन दहा ते पंधरा मिनिटात आग आटोक्यात आणली. परंतु,  सोसायटीत मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने रहिवासी घाबरले गेले होते. जवानांनी सोसायटीतील ४६ रहिवाशांना बाहेर काढले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीमागचे कारण समजू शकले नाही.

  • 04 Sep 2025 12:40 PM (IST)

    04 Sep 2025 12:40 PM (IST)

    फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार

    शनिवारवाडा परिसरात दुचाकी लावून देखावे पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाची दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत तरुणाने फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार तरुण वाकड परिसरात राहतो. शनिवारी (३० ऑगस्ट) तरुण मित्रासोबत देखावे पाहण्यास आला होता. शनिवारवाडा परिसरातील सूर्या हॉस्पिटजवळ त्याने दुचाकी लावली. दुचाकी चोरून चोरटे पसार झाले. पोलीस हवालदार मानमोडे तपास करत आहेत.

  • 04 Sep 2025 12:20 PM (IST)

    04 Sep 2025 12:20 PM (IST)

    शनिवारवाडा परिसरातून वाहनांची चोरी

    कुटुंबियांसोबत देखावे पाहण्यास आल्यानंतर रिक्षा शनिवारवाडा परिसरात पार्ककरून गेले असता अज्ञाताने रिक्षाची चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चोरट्यांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत ३८ वर्षीय रिक्षाचालकाने तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रिक्षाचालक कुटुंबीयासोबत रविवारी (३१ ऑगस्ट) दुपारी देखावे पाहण्यास आला होता. त्याने शनिवारवाडा येथे रिक्षा लावली. त्यावेळी चोरट्यांनी बनावट चावीचा वापर करुन रिक्षा चोरून नेली. देखावे पाहून रिक्षाचालक तेथे आला. तेव्हा रिक्षा जागेवर नसल्याचे आढळून आले. नंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. चोरीला गेलेल्या रिक्षाची किंमत ७५ हजार रुपये असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलीस हवालदार कोकाटे तपास करत आहेत.

  • 04 Sep 2025 12:00 PM (IST)

    04 Sep 2025 12:00 PM (IST)

    नोकरीच्या बहाण्याने आयटी फ्रेशर्सची फसवणूक

    हिंजवडी आयटी पार्कमधील एका कंपनीच्या संचालकांनी नोकरी देण्याच्या बहाण्याने आयटी अभियंत्यांची लाखोंची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी एका संचालकाला अटक केली असून महिला संचालकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात २३ ऑगस्ट रोजी पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा १ सप्टेंबर रोजी दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी जॉब प्लेसमेंटच्या नावाखाली फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांकडून प्रत्येकी दीड ते अडीच लाख रुपये उकळले. सुरुवातीला काही दिवस ऑनलाईन प्रशिक्षण दिले आणि त्यांच्याकडून काम करून घेतले. मात्र कोणताही प्रकल्प न देता वेगवेगळी कारणे सांगून त्यांना कामावरून कमी करण्यात आले. अशा प्रकारे २७ लाख ३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात आरोपी उपेश रणजित पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. तर महिला संचालक आणि आणखी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत फसवणूक झालेल्या आयटी फ्रेशर्स तरुणांचा आकडा ४०० पेक्षा अधिक असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस तपास करत असून आणखी काही तरुण यामध्ये पीडित असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

  • 04 Sep 2025 11:40 AM (IST)

    04 Sep 2025 11:40 AM (IST)

    पुण्यात पुन्हा भीषण अपघात

    पुणे शहरात सातत्याने जड वाहनांचे अपघात होत असून, पुन्हा भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगातील सिमेंट मिक्सरने दुचाकीस्वारासह दोघांना चिरडल्याची घटना घडली आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला हे मात्र समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी सिमेंट मिक्सरच्या चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फुरसूंगीतील मंतरवाडी चौकातील शेल पेट्रोल पंपाजवळ सोमवारी सकाळी ही घटना घडली आहे. संतोष प्रल्हाद कांबळे (वय ३९, रा. कवडगाव, अहिल्यानगर) आणि सुदर्शन गोरख पुलावळे (वय ३८, रा. उरूळी देवाची) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. सिमेंट मिक्सर चालक नागेश नाना कोरके (वय ३०, रा. उपळाई बुद्रुक, ता. माढा, जि. सोलापूर) याच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 04 Sep 2025 11:20 AM (IST)

    04 Sep 2025 11:20 AM (IST)

    मिनीबसचा चालकच निघाला चोर

    माळेगाव पोलिसांनी तत्परता दाखवत मिनीबस चोरीचा गुन्हा अवघ्या काही तासांत उघडकीस आणला. विशेष म्हणजे चोरीच्या या प्रकारामागे मिनीबसचाच चालक असल्याचे निष्पन्न झाले असून, पोलिसांनी त्याला अटक करून ७ लाख रुपये किमतीची मिनीबस जप्त केली आहे. माळेगाव परिसरात अलीकडेच चोरीच्या घटना वाढू लागल्याने पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी गुन्हेगारांवर लगाम घालण्यासाठी विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार माळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने गस्त वाढवून तपास यंत्रणा अधिक सक्रिय केली होती.

Web Title: Maharashtra crime news in marathi live updates beed murder 3

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 11:17 AM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

या घोटाळ्याने भल्या भल्या चोरांने केले चकित; भष्ट्राचाराच्या जमिनीत गाडला गेला तलाव
1

या घोटाळ्याने भल्या भल्या चोरांने केले चकित; भष्ट्राचाराच्या जमिनीत गाडला गेला तलाव

ज्योतिर्लिंग मंदिरातील चोरीचा तीन दिवसांत उलगडा; आरोपीला ठोकल्या बेड्या
2

ज्योतिर्लिंग मंदिरातील चोरीचा तीन दिवसांत उलगडा; आरोपीला ठोकल्या बेड्या

Nude Gang: ‘न्यूड गँग’ची दहशत, शेतातून खेचून महिलांना…ड्रोनद्वारे पोलीस घेताहेत शोध
3

Nude Gang: ‘न्यूड गँग’ची दहशत, शेतातून खेचून महिलांना…ड्रोनद्वारे पोलीस घेताहेत शोध

Pune Crime: गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुणे रक्तरंजित! आंदेकर हत्येच्या बदल्यासाठी थेट जावयाच्या मुलालाच…
4

Pune Crime: गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुणे रक्तरंजित! आंदेकर हत्येच्या बदल्यासाठी थेट जावयाच्या मुलालाच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.