Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News Updates : पतीने पत्नीच्या मामाला चाकूनं भोसकून संपवलं, जळगावातील घटनेने खळबळ

Crime News Live Updates Marathi : आज दिनांक 13 - 09- 2025 रोजी देश-विदेशासह राज्यातील गुन्हेगारी संदर्भातल्या ताज्या घडामोडींचे अपडेट वाचा फक्त एका क्लिकवर...

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 13, 2025 | 05:09 PM
Crime News Live Updates

Crime News Live Updates

Follow Us
Close
Follow Us:

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात कौटुंबिक वादाने टोकाचं रूप घेत एक धक्कादायक घटना घडली आहे. पती-पत्नीच्या वादात मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या पत्नीच्या मामाचा, पतीनेच चाकूने वार करत खून केला. या हल्ल्यात सासरे देखील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण भुसावळ शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत समद शेख हे आरोपी सुभान शेख यांच्या पत्नी सईदा शेख यांचे मामा होते. गेल्या काही दिवसांपासून सुभान आणि सईदा यांच्यात वारंवार वाद सुरू होता. दोन दिवसांपूर्वी पत्नी सईदा घर सोडून माहेरी गेल्यानंतर हा वाद अधिकच तीव्र झाला होता. त्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये सलोखा साधण्यासाठी शुक्रवारी (दि. 12 सप्टेंबर) रात्री नातेवाईकांची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीदरम्यान वाद शमण्याऐवजी चिघळत गेला आणि अचानक सुभान शेख याने चाकू काढून समद शेख यांच्यावर छाती, मान आणि पोटावर सपासप वार केले. याच दरम्यान, समद शेख यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे सासरे जमील शेख यांच्यावरही हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात समद शेख गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यूमुखी पडले, तर जमील शेख यांना तात्काळ भुसावळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी सुभान शेख याला अटक केली आहे.

The liveblog has ended.
  • 13 Sep 2025 05:00 PM (IST)

    13 Sep 2025 05:00 PM (IST)

    दुचाकीवरुन घरी जाताना डम्परने विद्यार्थिनीला उडवले

    पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंभ येथे खडी वाहतूक करणाऱ्या हायवा डंपरने दहावीच्या विद्यार्थिनीला उडवले. मात्र या अपघातात ती विद्यार्थिनी सुदैवाने बचावली असली, तरी तिच्या एका पायाला मात्र मोठी दुखापत झाली आहे. ही घटना बुधवारी ( दि १०) सायंकाळी कुरकुंभच्या वर्दळ असलेल्या चौकात घडली आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली‌ आणि संतप्त ग्रामस्थांनी वाहन चालकाला चांगलाच चोप दिला आहे. मात्र त्या ठिकाणी मळद आणि कुरकुंभ परिसरात बेकायदा मुरूम उत्खनन करणाऱ्या एका माफीयाने वाहन चालकाची काय चूक नाही, त्या मुलीची चूक आहे असे सांगितले. आणि मग मात्र संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वाहन चालकाचा मोर्चा थेट या मुरूम माफियावरच वळवला. भर चौकात त्याची चांगलीच धुलाई केली.

  • 13 Sep 2025 04:55 PM (IST)

    13 Sep 2025 04:55 PM (IST)

    पाळीव कुत्र्यांच्या मालकांनो सावधान !

    आता बातमी पाहुयात कोल्हापूरात हिसंक पाळीव कुत्र्यांसाठी महापालिका प्रशासनाने काढलेल्या नियमावलीची.. कोल्हापूरात एकीकडं भटक्या कुत्र्यांचा हैदोस मोठ्या प्रमाणात वाढला आहे..मात्र दुसरीकडं महापालिका प्रशासनाने हिंसक पाळीव कुत्र्यांसाठी जाहीरात काढून नियम जारी केलायं..कोल्हापूर महापालिकेकडून पाळीव आणि हिंस्त्र कुत्र्यांबाबत नियम घालण्यात आले आहेत..संबधित मालकाने रोटविलर्स, पिटबुल, जर्मन शेफर्ड आणि डॉबरमन अशा कुत्र्यांना फिरायला घेऊन जाताना महापालिकेनं घातलेले नियम पाळणं गरजेचं आहे..अन्यथा संबधित कुत्रा जप्त करण्यात येणार आहे..

  • 13 Sep 2025 04:40 PM (IST)

    13 Sep 2025 04:40 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्रींचा अपमान? रायगड भाजप महिला मोर्चा आक्रमक

    पेझारी येथे रायगड जिल्हा भाजप महिला मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मातोश्रींविषयी काँग्रेस पक्षाने AI प्रणालीचा गैरवापर करून अपमानकारक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्षा चित्रा पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. या वेळी अलिबाग-वडखळ मुख्य मार्गावर रॅली काढण्यात आली असून, काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

  • 13 Sep 2025 04:40 PM (IST)

    13 Sep 2025 04:40 PM (IST)

    बीएसएनएलच्या केबलची चोरी

    दूरसंचार विभागाकडून (बीएसएनएल) टाकण्यात येणाऱ्या केबलची चोरी करण्यात आल्याची घटना कोंढवा भागात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध कोँढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बीएसएनलच्या कनिष्ठ अभियंत्याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील कुबेरा पार्क बीएसएनएलकडून भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरू आहे. या भागात केबल, तसेच अन्य साहित्य (सीटी बाॅक्स) ठेवण्यात आले होते. चोरट्यांनी केबल आणि साहित्य असा २४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. केबल, तसेच अन्य साहित्य चोरीला गेल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात तपास करत आहेत.

  • 13 Sep 2025 04:20 PM (IST)

    13 Sep 2025 04:20 PM (IST)

    मोटारीच्या धडकेत दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू

    मोटारीच्या धडकेत दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना लोहगावमधील हवाई दलाच्या वसाहतीत घडली. या प्रकरणी मोटारचालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विदार्थ विपीन मावी (वय दोन वर्ष) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. याबाबत वडील विपीन राजसिंग मावी (वय ३४, सध्या रा. हवाई दल वसाहत, लाेहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका महिलेविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विपीन मावी हे हवाई दलात अधिकारी आहेत. त्यांचा दोन वर्षांचा मुलगा विदार्थ गुरुवारी (११ सप्टेंबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास हवाई दल वसाहतीतील घरासमोर खेळत होता. त्या वेळी वसाहतीत राहणाऱ्या एका मोटारचालक महिलेने घरासमोर खेळणाऱ्या मुलाला धडक दिली. अपघातात मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपाचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी मोटार चालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार धेंडे तपास करत आहेत.

  • 13 Sep 2025 04:01 PM (IST)

    13 Sep 2025 04:01 PM (IST)

    राष्ट्रभूषण चौकात अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

    छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बळीराम साहेबराव चव्हाण (वय २१, रा. पांगरी, बदनापूर, जि. जालना) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत राम साहेबराव चव्हाण (वय २३) यांनी खडक पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार बळीराम छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरुन गुरुवारी (११ सप्टेंबर) पाहटे चारच्या सुमारास निघाला होता. खडकमाळ आळी परिसरातील राष्ट्रभूषण चौकात भरधाव मोटारीने दुचाकीस्वार बळीराम याला धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या बळीरामचा मृत्यू झाला. या प्रकरणी चारचाकी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक दाढे तपास करत आहेत.

  • 13 Sep 2025 03:59 PM (IST)

    13 Sep 2025 03:59 PM (IST)

    मराठीला दुय्यम स्थान; मनसे चित्रपट सेनेची PVR Inox वर धडक

    नवी मुंबईमध्ये 12 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नवी मुंबई तर्फे वाशी पाम बीच गॅलरिया मॉलमधील PVR Inox येथे आंदोलन करण्यात आले.PVR च्या जाहिरात फलकांवर Movie Jockey चॅटबॉटमध्ये मराठी भाषेला दुय्यम स्थान देण्यात आले असल्याचा आरोप मनसेने केला. मराठी भाषा पर्यायाचा अभाव, तसेच अधिकृत ॲप्लिकेशनमध्ये मराठी भाषेचे प्राधान्य नसल्याबाबत शिष्टमंडळाने व्यवस्थापनाला जाब विचारला.

  • 13 Sep 2025 03:40 PM (IST)

    13 Sep 2025 03:40 PM (IST)

    सदनिकेचे कुलूप तोडून तीन लाखांचे दागिने लांबविले

    सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना चतु:शृंगी भागात घडली. याबाबत एकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कोथरूड भागात राहायला आहेत. चतु:शृंगी परिसरातील एका सोसायटीत त्यांची सदनिका आहे. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. कपाट उचकटून चाेरट्यांनी तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. गुरुवारी (११ सप्टेंबर) सायंकाळी घरफोडी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले असून, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे तपास करत आहेत.
  • 13 Sep 2025 03:30 PM (IST)

    13 Sep 2025 03:30 PM (IST)

    हृदयद्रावक! अपघातात नातवाचा मृत्यू, अंत्यसंस्कारावेळी आजीला हृदयविकाराचा झटका

    सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातून एक अतिशय धक्कदायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नातवाचा मृत्यू सहन न झाल्याने स्मशानभूमीतच आजीनेही आपला जीव सोडला आहे. आजीचं नाव जनाबाई व्हानमाने असे आहे. तर नातवाचा नाव आदित्य व्हॅनमने असे आहे. या मुलाचा मृत्यू कारणे जोरदार धडक दिल्यामुळे अपघाती झाला. या दुर्दैवी घटनेमुळे अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावातील व्हनमाने कुटुंबासह परिसरात शोककळा पसरली आहे.

  • 13 Sep 2025 03:20 PM (IST)

    13 Sep 2025 03:20 PM (IST)

    ईडी कारवाईची भीती दाखवून महिलेची फसवणूक

    सक्त वसुली संचनलयाकडून (ईडी) कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेची ३२ लाख सहा हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ज्येष्ठ महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • 13 Sep 2025 03:08 PM (IST)

    13 Sep 2025 03:08 PM (IST)

    भयानक! TTP दहशतवाद्यांचा सैनिकांच्या बसवर बॉम्ब ब्लास्ट; 12 जवान ठार तर...; कुठे घडली घटना?

    Terrorist Attack In Pakistan: पाकिस्तानला पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याचा सामना करावा लागला आहे. पाकिस्तानच्या दक्षिण वाजिरीस्तान या भागात दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. बॉम्ब ब्लास्ट करत सैनिकांची बस उडवून दिली आहे. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • 13 Sep 2025 03:00 PM (IST)

    13 Sep 2025 03:00 PM (IST)

    जळगाव हादरलं! पती पत्नीच्या वादात मध्यस्थी करणं मामला जीवावर बेतलं

    जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पती- पत्नीच्या वादात मध्यस्थी करणं पत्नीच्या मामाला जीवावर बेतलं आहे. पत्नीच्या मामाला पतीने चाकूने वार करत खून केला आहे. या हल्ल्यात सासरे देखील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण भुसावळ शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

  • 13 Sep 2025 02:40 PM (IST)

    13 Sep 2025 02:40 PM (IST)

    बीड जिल्ह्यातील तणावाची स्थितीपाहता मनाई आदेश लागू

    बीड जिल्ह्यातील सध्याची तणावाची स्थिती लक्षात घेता जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. हा मनाई आदेश २५ सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहे. समाज माध्यमातून होणाऱ्या पोस्टचे पडसाद रस्त्यावर होऊ लागले आहेत. तर बॅनरबाजीमुळेही अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. यासह मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, नवरात्र उत्सवाची सुरुवात या काळात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये.

  • 13 Sep 2025 02:20 PM (IST)

    13 Sep 2025 02:20 PM (IST)

    पुणे-सोलापूर महामार्गावर रीलस्टार प्रतीक शिंदेचा अपघात

    पुणे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. अपघातात तीन गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून लाखो रुपयांची हानी झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हा अपघात रिल स्टार म्हणून ओळखला जाणारा प्रतीक राम शिंदे (वय 24, रा. भादलवाडी, ता. इंदापूर) याच्या फॉर्च्युनर गाडीमुळे घडला असल्याचे समोर आले आहे.

  • 13 Sep 2025 02:00 PM (IST)

    13 Sep 2025 02:00 PM (IST)

    गणपती दर्शनासाठी गुजरातला गेलेला तरुण ठरला अपहरणाचा बळी; पाच दिवसांचा थरार संपला

    गुजरातमध्ये गणपती दर्शनासाठी गेलेल्या एका अल्पवयीन तरुणाला महागात पडलं आहे. पीडित अल्पवयीन मुलगा हा गणपती बघण्यासाठी गुजरातला गेला होता. तेव्हा त्याचा अपहरण झाला. अपहरकर्त्यांनी त्याच्या आईला फोन करून १२ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. बदलापूर ग्रामीण पोलिसांनी त्याची सुटका आलेली असून तीन आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. ही घटना तब्बल पाच दिवसांच्या थरारानंतर उघडकीस आली.

  • 13 Sep 2025 01:40 PM (IST)

    13 Sep 2025 01:40 PM (IST)

    मैत्रीणीसाठी रागाच्या भरात कंपनी कर्मचाऱ्यावर शस्त्राने प्राणघातक हल्ला, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

    पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्रिणीसाठी शास्त्राने प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमी झालेल्या तरुणाचे नाव दिप्तिमान देवव्रत दत्ता (वय 33) असे आहे. तर आरोपीचे नाव शिवलिंग म्हात्रे (वय 25) असे आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत. या परिसरात अश्या अनेक घटना घडताना दिसत आहे.

  • 13 Sep 2025 01:20 PM (IST)

    13 Sep 2025 01:20 PM (IST)

    अंबाजोगाईत पत्नीच्या मारहाणीत पतीचा मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

    बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नीने आपल्या पतीला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. याप्रकरणी पत्नीच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दखल करण्यात आला आहे. पत्नीने पतीला लाथा बुक्क्यांनी गंभीर मारहाण केली आहे. यामध्येच घाव वर्मी लागल्याने पतीचा मृत्यू झाला आहे.

  • 13 Sep 2025 12:55 PM (IST)

    13 Sep 2025 12:55 PM (IST)

    महिलेचे सासरच्या लोकांवर आरोप

    अकलुज येथील पीडित महिलेने आपल्या पतीसह सासरच्या मंडळींविरोधात शारीरिक व मानसिक छळ, धमक्या, बरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याचे धक्कादायक आरोप केले आहेत. या घटनेमुळे अकलुज, सातारा व रायगड परिसरात संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी आरोपींविरोधात तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

  • 13 Sep 2025 12:35 PM (IST)

    13 Sep 2025 12:35 PM (IST)

    दोन मटण दुकान मालकांत हाणामारी

    शिरोलीतून एक मोठी घटना समोर आली आहे. ग्राहक बोलविण्यावरुन दोन मटण दुकान मालकांत हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. गावाच्या मध्यभागी मटण मार्केट आहे. या मटण मार्केटमध्ये एखादे ग्राहक आले की आपल्याच दुकानात मटण खरेदी करावे, यासाठी ग्राहकाला बोलवले जाते. यातून मोठी स्पर्धा मटण विक्री करणारे दुकान मालकांत नेहमी सुरू असते. याच कारणावरून रविवारी ग्राहकाला बोलविण्यावरून मुनाफ चिकन सेंटर व विजय मटण शॉप यांच्यात तुफान हाणामारी झाली. या मारामारीत मुनाफ नजरुद्दीन कवठेकर, रणजित विजय घोटणे, सत्यजित तानाजी घोटणे जखमी झाले. याबाबत मुनाफ कवठेकर व विजय घोटणे यांनी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे.

  • 13 Sep 2025 12:15 PM (IST)

    13 Sep 2025 12:15 PM (IST)

    सोनाली आंदेकरला अटक करण्याची मागणी

    मी सगळ्यांची नावं पोलिसांना दिली. कोणाला सुद्धा माझ्या लहान मुलाची दया आली नाही. लक्ष्मी आंदेकर ती पण आज्जीच आहे ना… पण कुणाला काहीच वाटलं नाही का? वृंदावनी वाडेकरच्याच घरी सगळे असतात. सोनाली वनराज आंदेकरला देखील अटक करा. तिची मुलगी देखील माझ्याऐवढीच आहे. तिला पण माझ्या वेदना कळायला हव्यात. तिला मामी असून देखील तिला कळकळ नाही आली, ऐवढी कठोर माणसं कशी असू शकतात, असं कल्याणी कोमकर यांनी म्हटलं आहे.

  • 13 Sep 2025 11:55 AM (IST)

    13 Sep 2025 11:55 AM (IST)

    गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला ठोकल्या बेड्या

    गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला लोणी काळभोर पोलिसांनी जेरबंद करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्याचा साथीदार मात्र फरार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री साडेनऊ वाजता आंग्रे वस्ती, सार्वजनिक रस्ता, लोणी स्टेशन परिसरात गणेश रावसाहेब गोडसे (वय २५, रा. आंग्रे वस्ती, लोणी काळभोर, मुळगाव सोनेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापुर) व त्याचा साथीदार अक्षय रवि पवार (रा. लोणी काळभोर) हे गांजा विक्रीसाठी थांबले असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावर कारवाई करताना पोलिसांनी पाठलाग करून गोडसे याला पकडले.

  • 13 Sep 2025 11:30 AM (IST)

    13 Sep 2025 11:30 AM (IST)

    पर्वती पोलिसांची मोठी कारवाई

    दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तूल बाळगून फिरणार्‍या गुन्हेगाराला पर्वती पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून २ गावठी बनावटीचे पिस्टल, ४ मॅगझिन व २ जिवंत काडतुसे असे ७१ हजार ४०० रुपयांची शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. ओंमकार दीपक जाधव (वय २२, रा. साई सिद्धी चौक, आंबेगाव पठार) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. ओंमकार जाधव याच्याविरुद्ध २०१६ मध्ये वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. ओंमकार मध्यप्रदेशात गेलेला असताना ही पिस्टल विकत घेतली असून, स्वत:च्या संरक्षणासाठी ही पिस्टल बाळगत असल्याचे ओंमकार जाधव याचे म्हणणे आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक किरण पवार यांनी दिली.

  • 13 Sep 2025 11:10 AM (IST)

    13 Sep 2025 11:10 AM (IST)

    महाबळेश्वर तालुक्यातील धक्कादायक घटना

    महाबळेश्वर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकीवर माकडाने उडी मारल्याने दुचाकी घसरून अपघात झाला आहे. या अपघातात उपचारापूर्वीच एकाचा मृत्यू झाला आहे. आनंद सखाराम जाधव (वय : ५०, रा. देवळी) असे मृताचे नाव आहे. तर त्यांची पत्नी जखमी झाली आहे. महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा रस्त्यावर चिखली परिसरात ही अपघाताची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आनंद जाधव हे गुरुवारी सायंकाळी महाबळेश्वरमधील आपली कामे उरकून पत्नीसोबत दुचाकीवरून देवळीला निघाले होते. तापोळा मुख्य रस्त्यावर चिखली परिसरात दुचाकीवर माकडाने झडप मारली, यामुळे दुचाकीस्वराचा ताबा सुटला व तोल जाऊन जाधव हे पत्नीसह रस्त्यावर कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, गंभीर जखमी अस्वस्थेत त्यांना ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वर येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात जाधव यांची पत्नी देखील जखमी झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेची नोंद गुरुवारी रात्री उशिरा झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच देवळीसह परिसरातील ग्रामस्थांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. या परिसरात खाद्याच्या शोधात असलेल्या एका माकडाने दुचाकीवर झडप टाकल्याने हा अपघात झाला झाला आहे.

Web Title: Maharashtra crime news in marathi live updates jalgaon murder 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 11:09 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • jalgaon Crime
  • Murder Case

संबंधित बातम्या

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना
1

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर तळीरामांवर धडक कारवाई; १०.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त, ४७ आरोपींवर गुन्हे
2

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर तळीरामांवर धडक कारवाई; १०.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त, ४७ आरोपींवर गुन्हे

Fake Gutkha Factory: बनावट गुटख्याचा घरगुती कारखाना उद्ध्वस्त! ३.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त
3

Fake Gutkha Factory: बनावट गुटख्याचा घरगुती कारखाना उद्ध्वस्त! ३.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Kolhapur News : पाणीपुरवठा योजनेत भष्टाचार; उद्घाटनापूर्वीच पाण्याच्या टाकीचे तीनतेरा
4

Kolhapur News : पाणीपुरवठा योजनेत भष्टाचार; उद्घाटनापूर्वीच पाण्याच्या टाकीचे तीनतेरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.