Crime News Live Updates
तीन महिन्यांपूर्वी मुलीचे लग्न झालं. आता झालेलं कर्ज फेडण्यासाठी शेती विकण्याचा पर्याय मुलाने आईला सुचवला मात्र 70 वर्षाच्या आईने मुलास विरोध करत शेती विकू दिली नाही. याचा राग मनात धरून मुलाने आईला गळा आवळून संपवलं. त्यानंतर शेतीतील उसात मृतदेह पुरला. नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार लातूर जिल्ह्यातून समोर आला आहे. रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे ही घटना घडली आहे.