Crime News Live Updates
नालासोपाऱ्यात IITN अकॅडमीच्या शिक्षकाकडून 16 वर्षाच्या विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याबाबतची माहिती पालकांना मिळताच त्यांनी अकॅडमीमध्ये जाऊन शिक्षकाला बेदम चोप दिला आहे. त्यानंतर पालकांनी शिक्षकाला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. राहुल दुबे असे वासनांध शिक्षकांचे नाव असून, नालासोपारा पश्चिम आयआयटीएन अकॅडमीमधील शिक्षक आहे.
25 Aug 2025 05:35 PM (IST)
रांजणगाव गणपती (ता. शिरुर) परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करून चार ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत २१ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला असून चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनिलकुमार हरगोविंद चौधरी (वय ३६), किरण उद्धव गीरी (दोघे रा. रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे), शेखर रमेश दावडे (वय २५ रा. ढोकसांगवी ता. शिरुर जि. पुणे) व नरेश अशोक ईरकर (वय २५ रा. कारेगाव ता. शिरुर जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना रांजणगाव गणपती, कारेगाव आणि ढोकसांगवी येथे अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस हवालदार गणेश आगलावे, नितीन बोस, तसेच पोलीस शिपाई सागर सरवदे व पंडित मुंडे यांच्या पथकाने कारवाई केली.
25 Aug 2025 05:15 PM (IST)
गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद उत्सवादरम्यान शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी शहरातील मुख्य मार्गावरुन पंढरपूर शहर पोलिसांचा रुट मार्च काढण्यात आला. सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर पोलिसांनी शहर पोलिस ठाणे हद्दीतील इंदिरा गांधी चौक, कैकाडी महाराज मठ, जुनी पेठ, मटन मार्केट, नाथ चौक, गांधी रोड, चौफळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेशन रोड असा रूट मार्च घेण्यात आला. यावेळी शहर पोलिस ठाणे येथील सहा पोलिस अधिकारी ३९ पोलिस अंमलदार, एक क्युआरटी पथक, एक आरसीएफ पथक सहभागी झाले होते, अशी माहिती शहर पोलिस निरिक्षक विश्वजित घोडके यांनी दिली.
25 Aug 2025 05:02 PM (IST)
युवतीच्या घरी जावून शिवीगाळ, दमदाटी करत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत संबंधित महिलेने फिर्याद दिली असून, शुभम चिंचकर (वय ३२, रा. कोडोली, ता. सातारा) याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जायपत्रे करत आहेत.
25 Aug 2025 04:40 PM (IST)
लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १३ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास भालचंद्र लक्ष्मण साळुंखे (रा. गोडोली, सातारा) यांना विनाकारण लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच जनार्दन मोरे यांच्या विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलिस हवालदार सुडके करीत आहेत.
25 Aug 2025 04:20 PM (IST)
पुणे शहरात तीन व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारे सायबर चोरट्यांनी पसत्तीस लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काळेपडळ पोलिस ठाण्याच्या हद्तीतील एका ४० वर्षीय महिलेला चोरट्यांनी वर्क फ्रॉम होम देण्याच्या बहाण्याने ऑनलाईन व्यवहार करण्यास सांगून तब्बल १६ लाख ८४ हजारांची फसवणूक केली. हा प्रकार १७ जुले रोजी घडला आहे. दुसऱ्या घटनेत ८९ वर्षीय वृध्द नागरिकाला सायबर चोरट्यांनी ६ लाख ३६ हजारांची युपीआयद्वारे फसवणूक केली. हा प्रकार १५ मे ते २९ जुलै दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसर्या गुन्ह्यात पार्टटाईम जॉब करण्यासाठी लिंकमध्ये अकाउंट तयार करायला सांगुन ऑनलाईन १२ लाख ५७ हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत घोरपडी येथील ५४ वर्षीय व्यक्तीने मुंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार २५ सप्टेंबर २०२४ ते ८ नोव्हेंबर २०२४ दरम्यान घडला.
25 Aug 2025 04:00 PM (IST)
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. विवाहित महिलेला घरी एकटेच पाहून तिच्या घराबाहेर जात तिच्याशी लगट करत विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. मुबारक मोळम्मद शेख (२५, रा. घोरपडेवस्त, लोणी काळभोर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका २८ वर्षीय तरूणीने तक्रार दिली आहे. दोन दिवसांपुर्वी (दि. २२ ऑगस्ट) दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
25 Aug 2025 03:40 PM (IST)
सातारा शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकून दोन जणांवर कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिवराज पेट्रोलपंप परिसरात जुगार प्रकरणी अमोल पंढरीनाथ जगताप (वय ४३, रा. करंजे पेठ, सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ७९० रुपये व रोख रक्कम जप्त केली आहे. दुसरी कारवाई यादोगोपाळ पेठेत जयंत बजरंग इनामदार (वय ४१, रा.मंगळवार पेठ, सातारा) याच्यावर करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून रोख ७२० रुपये व जुगराचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
25 Aug 2025 03:20 PM (IST)
25 Aug 2025 03:00 PM (IST)
दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथे एकाने आपण पोलिस असल्याचे सांगत बतावणी केली. त्यानंतर एका महिलेवर बलात्कार ही केला. आरोपींने या पीडित महिलेस आपण पोलीस आहे. तुझे घर तपासायचे आहे असं सांगत घराची तपासणी केली. त्यानंतर शेजारी असलेल्या घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
25 Aug 2025 02:40 PM (IST)
बीड जिल्ह्यातील चकलांबा पोलीस ठाण्यात धनंजय धसे आणि त्यांचा मुलगा देवाशीष धसे यांच्याविरोधात तब्बल साडेतेरा लाख रुपयांच्या फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, धनंजय धसे हे सध्या बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे स्वीय सहाय्यक (पी.ए.) म्हणून काम पाहत असल्याची माहिती पुढे येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
25 Aug 2025 02:20 PM (IST)
महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असणाऱ्या अथणी तालुक्यातील अनंतपूरममधून धक्कदायक प्रकार समोर आला आहे. आम्हाला परमेश्वराचे बोलावणे आले आहे. त्यामुळे आम्ही ८ सेप्टेंबरला देहत्याग करणार अशी भूमिका काही भक्तांनी घेतली होती. या निर्णयाने एकच खळबळ उडाली आहे. कारण देहत्याग करण्याचा निर्णय घेतलेल्या मार्गिकांमध्ये महाराष्ट्रातील भक्तांची संख्या अधिक होती. अनंतपूर या ठिकाणी रामपाल महाराजांचा मठ आहे. देह त्याग करण्याचा निर्णय घेणारे भक्त रामपाल महाराजांची दीक्षा घेतली होती.
25 Aug 2025 02:00 PM (IST)
तेलंगणातील हैदराबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामुळे संपूर्ण देश पुन्हा एकदा हादरला आहे. एका व्यक्तीने त्याच्या गर्भवती पत्नीची हत्या करून तिच्या शरीराचे अवयव नदीत फेकले आणि तिचे धड घरामध्ये लपवून ठेवले. हत्या झालेल्या महिलेला ही पाच महिन्यांची गर्भवती होती. हत्या केल्यानंतर आरोपीने आपल्या बहिणीला फोन केला आणि सांगितले की त्याची पत्नी बेपत्ता आहे.
25 Aug 2025 01:40 PM (IST)
राजधानी दिल्ली येथून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. दीड वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात अलायचं समोर आलं आहे. शेजाऱ्याने मुलीला घरी नेले काही वेळाने तिच्या आईला तिचा रडण्याचा आवाज आला. आईने दरवाजा उघडताच आईला धक्काच बसला. मुलगी रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळली. 32 वर्षीय आरोपी सुधीर उर्फ बिट्टू दारूच्या नशेत होता. त्याने दारूच्या नशेतच हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे.आरोपीवर बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
25 Aug 2025 01:20 PM (IST)
कोलकाता येथून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. कोलकाता येथील साऊथ साऊथ कोलकाता लॉ कॉलेज येथे सामूहिक बलात्कार झाल्याचं समोर आलं आहे. आधी एग्जॉस्ट फॅनच्या छिद्रातून विद्यार्थिनीचे अश्लील व्हिडीओ चित्रित करण्यात आले. त्यांनतर पीडितेला ब्लॅकमेल करून सामूहिक बलात्कार करण्यात आला.
25 Aug 2025 12:50 PM (IST)
वैभवशाली गणेशोत्सावाने पुण्यनगरीचे वातावरणात भक्तीमय झालेलं आहे. “जय गणेशा”च्या गजराने पुण्यनगरी उजळली जात असताना मात्र, दुसरीकडे शहर "कोयत्याच्या टोकावर थरथरत" आहे. गेल्या काही महिन्यांत घडत असलेल्या कोयत्याचे हल्ले, तोडफोडीचे सत्र अन् रक्तांच्या धारांच्या खेळाने पुणेकरांत दहशतीचे काळे सावट पसरलेले आहे. दोन गटातील वाद आणि त्यामुळे होणारे हल्ले, रस्त्यातील टोळीबाजी आणि किरकोळ वादातून वाहणारे रक्त या सगळ्याने “सुरक्षित पुणे”च्या प्रतिमेला जबर धक्का बसला जात आहे. काही केल्याने घटना पोलिसांना थांबवता येत नसल्याने आता सर्व सामान्य पुणेकर "लाडक्या बप्पा''लाच पुण्यनगरीतला गुन्हेगारीचा खेळ थांबव, अशी आर्त हाक मारू लागले आहे. गेल्या ७ महिन्यात ३३६ कोयत्याने हल्ले व गोळीबाराच्या १० घटना घडल्या आहेत.
25 Aug 2025 12:43 PM (IST)
सुप्रीम कोर्टाने सोमवारी ऐतिहासिक निर्णय देताना नागपूर येथील वसंत संपत दुपारे यांची फाशीची शिक्षा स्थगित केली. यापूर्वी 2014 मध्ये सुप्रीम कोर्टानेच दुपारे यांच्या फाशीवरील पुनर्विचार याचिका फेटाळली होती. त्यानंतर राष्ट्रपतींनीही दयेचा अर्ज नामंजूर केला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच्या निकालालाच स्थगिती दिली आहे.
25 Aug 2025 12:25 PM (IST)
बीड जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मांजरसुंबा-अंबाजोगाई राज्य महामार्गावरील एका हॉटेलबाहेर केवळ किरकोळ वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात तरुण रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाला असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मांजरसुंबा-अंबाजोगाई राज्य महामार्गावर असलेल्या एका हॉटेलबाहेर तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. अगदी किरकोळ कारणावरून मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण झालेल्या तरुणाचे नाव विजय केदार (रा. सांगवी, ता. केज) असे आहे. घटनेच्या वेळी विजय केदार महामार्गावर असलेल्या एका हॉटेलमध्ये गेला होता. त्यावेळी त्याचा वेटरसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका वाढला की हॉटेल मालकाने देखील यात हस्तक्षेप करत विजयवर हल्ला चढवला. हल्ल्यात वेटर आणि हॉटेल मालक दोघांनी मिळून विजयला बेदम मारहाण केली.
25 Aug 2025 12:05 PM (IST)
पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सासवड रस्त्यावर पूर्वी झालेल्या वादातून तरुणावर हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाच्या डोक्यात गज घालून गंभीर जखमी केले आहे. वडकी नाला भागात ही घटना घडली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांकडून पाच जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. विकी सुरेश खोमणे (वय ३८, रा. माळेगाव बुद्रुक, ता. बारामती,) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी ऋषिकेश हनुमंत चव्हाण, मयुर संजय चव्हाण, तेजस तानाजी खंडाळे, सुरज बाबजी खोमणे, अक्षय ऊर्फ गोटू छगन माकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत खोमणे याने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
25 Aug 2025 11:48 AM (IST)
बुलढाण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कुख्यात गुंड शेख हाफिज शेख नफिज उर्फ बाब्याची तिघांनी जुन्या वादातून हत्या केली आहे. लाकडी दांडके व चाकूने हल्ला करुन बाब्याला संपविले आहे. या खुनाच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. बुलढाण्यातील इंदिरानगरमधील कुख्यात गुंड बाब्या अमावस्यानिमित्त सैलानी येथे जत्रेत गेला होता. मध्यरात्रीनंतर त्याचा मृतदेह सैलानीत आढळून आला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला बाब्या आवडत्या पांढऱ्या ड्रेसमध्ये होता. मिळालेल्या माहितीनुसार बाब्या सैलानीत दाखल झाल्यावर आरोपी त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर जुन्या वादातून दोघांमध्ये हाणामारी झाली आणि आरोपींनी बाब्याला लाकडी राफ्टरने मारहाण करून आणि नंतर चाकू खुपसून संपवून टाकले.
25 Aug 2025 11:29 AM (IST)
प्रेमाला विरोध केल्यानंतर अल्पवयीन मुलाने साथीदारांच्या मदतीने प्रेयसीच्या मानलेल्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, पुणे ग्रामीण पोलिसांनी या खूनाचा छडा लावत तिघांना अटक केली आहे. तर तीन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. जुन्या कात्रज बोगद्याजवळील डोंगरावर कात्रजमधील तरुणाचा खून केला होता. सौरभ स्वामी आठवले (वय २५, रा. पंचरत्न सोसायटी, मांगडेवाडी, कात्रज) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी श्रीमंत अनिल गुज्जे (वय २१, रा. खंडोबा मंदिराजवळ, वडगाव मावळ), संगम नामदेव क्षीरसागर (वय १९, रा. वडगाव मावळ), नितीन त्र्यंबक शिंदे (वय १८, रा. गोकुळनगर, कात्रज, मूळ रा. खुठे गाव, ता. औसा, जि. लातूर) यांना अटक केली आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी, सहायक निरीक्षक तुकाराम राठोड, उपनिरीक्षक अजित पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे.
25 Aug 2025 11:27 AM (IST)
पुण्यातून एक चोरीची घटना उघडकीस आली आहे. सिंहगड रस्त्यावरील सोसायटीतील फ्लॅट फोडून साडे आठ लाखांचा ऐवज चोरी झाला होता. याप्रकरणात सुरक्षा रक्षकच चोरटा निघाला असून, याप्रकरणाचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राकेशकुमार मूलचंद सोनी (वय २९, रा. राम अमिलिया, जि. अनुपपूर, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गायकवाड, गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर, उपनिरीक्षक किरण पवार, पोलिस कर्मचारी प्रकाश मरगजे व त्यांच्या पथकाने केली आहे.