Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News Updates : गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचं फिल्मी स्टाईल अपहरण; हत्येचाही प्रयत्न

Crime News Live Updates Marathi : आम्ही राज्यासह देश-विदेशाील गुन्हेगारी संदर्भातल्या ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. ताज्या घडामोडींचे अपडेट वाचण्यासाठी फक्त एक क्लिक करा.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 08, 2025 | 06:33 PM
Crime News Live Updates

Crime News Live Updates

Follow Us
Close
Follow Us:

सोलापुरात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे फिल्मी स्टाईल अपहरण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण करुन हत्येचा प्रयत्न केल्याची माहितीही समोर आली आहे. अपहरणची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांचे 4 पथक तात्काळ शोधासाठी रवाना करण्यात आले होते. काल रात्री 10 च्या सुमारास अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शरणु हांडे असे अपहरण झालेल्या गोपीचंद पडळकर समर्थकाचे नाव आहेत. तर अमित सुरवसे असे अपहरण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

The liveblog has ended.
  • 08 Aug 2025 06:05 PM (IST)

    08 Aug 2025 06:05 PM (IST)

    लोणावळ्यात २ किलो गांजा जप्त

    लोणावळा शहरात अंमली पदार्थांच्या वाढत्या विक्रीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत २ किलो ७० ग्रॅम गांजासह एका आरोपीला अटक केली आहे. तर या प्रकरणातील दुसरा आरोपी सध्या फरार असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. जयचंद चौक परिसरात मोटारसायकलवरून गांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सापळा रचत अब्दुल करीम शेख (वय ३८, रा. गुरव वस्ती, कुसगाव) याला गांजा विकताना रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून २ किलो ७० ग्रॅम गांजा, मोबाईल आणि मोटारसायकल असा १.२० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपी तनवीर शेख याचा शोध सुरू आहे.

  • 08 Aug 2025 06:00 PM (IST)

    08 Aug 2025 06:00 PM (IST)

    विषारी औषध पिलेल्या महिलेचा मृत्यू

    विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, प्रीती विक्रम साळुंखे (रा. शाहूपुरी, सातारा) यांनी विषारी औषध प्राशन केले होते. त्यांचा पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. महिला पोलिस नाईक करपे अधिक तपास करीत आहेत.

  • 08 Aug 2025 05:50 PM (IST)

    08 Aug 2025 05:50 PM (IST)

    मॅफेड्रॉन विक्रीप्रकरणी दोघांना अटक

    अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोघांकडून लाखो रुपयांचे ‘एमडी’ (मॅफेड्रॉन) पावडर जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई मंगळवारी (५ ऑगस्ट) कावेरीनगर भाजी मंडईजवळ, वाकड येथे करण्यात आली. बालाजी भारत चकृपे (३७, दिघी) आणि समाधान गणेश गंगणे (१९, दिघी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

  • 08 Aug 2025 05:35 PM (IST)

    08 Aug 2025 05:35 PM (IST)

    जमिनीच्या वादातून भावांमध्ये मारहाण

    वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून एका भावाने मोठ्या भावाला मारहाण करून जखमी केले. ही घटना बुधवारी (६ ऑगस्ट) दुपारी आल्हाटवस्ती, लवळे येथे घडली. याबाबत रमेश तुकाराम सातव (५९, लवळे, ता. मूळशी) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय तुकाराम सातव (५५, माळवाडी, हडपसर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी मोजणी झाल्यानंतर फिर्यादीने त्यांच्या लहान भाऊ संजय याला, 'आता माझी जमीन मला दे' असे म्हटले. यावर आरोपीने फिर्यादीला 'तुला जमीन देत नाही, काय करायचे ते कर' अशी धमकी दिली आणि शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने हाताने मानेवर चापट मारली आणि गजाने फिर्यादीच्या डाव्या मांडीवर मारून त्यांना जखमी केले. बावधन पोलीस तपास करत आहेत.

  • 08 Aug 2025 05:20 PM (IST)

    08 Aug 2025 05:20 PM (IST)

    लातूरच्या सांगवीतील खळबळजनक घटना

    लातूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहरे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे मुलाने वयोवृद्ध आईचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जमीन विक्रीच्या वादातून ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे सांगवी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुमिंद्रबाई जाधव (वय 70) यांच्या नावे असलेली शेती विकावी, असा आग्रह त्यांचा मुलगा काकासाहेब जाधव (वय 48) मागील काही दिवसांपासून धरत होता.

  • 08 Aug 2025 05:00 PM (IST)

    08 Aug 2025 05:00 PM (IST)

    लातूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

    लातूरमधील रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे जमीन विक्रीच्या वादातून मुलाने वयोवृद्ध आईचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुमिंद्रबाई जाधव (वय 70) यांच्या नावे असलेली शेती विकावी, असा आग्रह त्यांचा मुलगा काकासाहेब जाधव (वय 48) मागील काही दिवसांपासून धरत होता. मात्र आईने ठाम नकार दिल्याने रागाच्या भरात काकासाहेब यांनी 7 ऑगस्ट रोजी शेतातच आईचा तोंड दाबून आणि गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह उसाच्या शेतात पुरून टाकला. सदर घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांचा तपास सुरू झाला. आई आणि मुलांमध्ये शेतजमीन विकण्यावरून वाद असल्याची माहिती मिळाली. मुलगा काका साहेबाचा शोध सुरू झाला. मात्र काकासाहेबांचा तपास लागला नाही. रेणापूर शिवारात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत काकासाहेब जाधव यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह उत्तरी तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, रेणापूर पोलिस पुढील तपास करत आहेत. या दुर्देवी घटनेमुळे सांगवी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  • 08 Aug 2025 04:45 PM (IST)

    08 Aug 2025 04:45 PM (IST)

    रोख रक्कम चोरीप्रकरणी एकास अटक.

    सासवड सोनोरी रस्त्यावरील एका वीटभट्टी मालकाने रोख रक्कम ६० हजार रुपये एका व्यक्तीस देण्यासाठी कामगाराला सांगितले. सदर पैसे घरात ठेवून काही कामानिमित्त मालक बाहेर गेले. मात्र पुन्हा आल्यानंतर ठेवलेले पैसे संबंधित व्यक्तीस न देता परस्पर घेवून पोबारा केला. दरम्यान कामगार पैसे घेवून पळून गेल्याच्या ठिकाणाची माहिती मिळताच सासवड पोलिसांनी नांदेड जिल्ह्यात त्याच्या शेतात जाऊन अटक केली. तसेच त्याच्याकडून रोख रक्कम ताब्यात घेतली आहे.

  • 08 Aug 2025 04:30 PM (IST)

    08 Aug 2025 04:30 PM (IST)

    आयर्लंडमध्ये भारतीय वंशाच्या 6 वर्षांच्या मुलीवर हल्ला

    आयर्लंडमधील वॉटरफोर्ड शहरात एका सहा वर्षांच्या भारतीय वंशाच्या मुलीवर वांशिक हल्ला करण्यात आला. ही घटना सोमवारी (४ ऑगस्ट) संध्याकाळी घडली जेव्हा ती तिच्या घराबाहेर तिच्या मैत्रिणींसोबत खेळत होती. हल्लेखोर १२ ते १४ वयोगटातील होते आणि हल्ला करताना त्यांनी मुलीला सांगितले, “घाणेरडे भारतीय, भारतात परत जा.” त्यांनी मुलीच्या गुप्तांगांवरही हल्ला केला. आयर्लंडमध्ये भारतीय वंशाच्या मुलावर नोंदवलेली ही पहिलीच वांशिक हिंसाचाराची घटना असल्याचे ही म्हटलं जातं आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांत आयर्लंडमध्ये भारतीय नागरिकांवर अनेक हल्ल्यांच्या बातम्या आल्या आहेत.

  • 08 Aug 2025 04:10 PM (IST)

    08 Aug 2025 04:10 PM (IST)

    भाडेकरूकडून सुरक्षा रक्षकाची फसवणूक

    एका भाडेकरूने सुरक्षा रक्षकाची फसवणूक करत त्यांच्या नावावर खोटे कागदपत्र वापरून सहा लाख ५५ हजार रुपयांचे चारचाकी वाहन खरेदी केले. ही घटना संतोषनगर, थेरगाव येथे घडली.  संदेश संकेत जुंद्रे (वय ३५, रा. अभय सीएचएस, चिंचपोकळी, मुंबई) असे गुन्‍हा दाखल करण्‍यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी फिर्यादी जयाजीराव दामोदर शिंदे (वय ६४, रा. जांबेगाव, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी वाकड पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ऑगस्ट २०२४ पासून थेरगाव येथील साई इंडिया पार्कमध्ये आरोपी भाड्याने राहण्यास आला होता. त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून खोट्या कागदपत्रांद्वारे बाणेर येथून वाहन खरेदी करत ६.५५ लाखांची फसवणूक केली.

  • 08 Aug 2025 04:01 PM (IST)

    08 Aug 2025 04:01 PM (IST)

    तुळजापुरात मराठा कार्यकर्त्यांचा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव

    तुळजापुरात मराठा कार्यकर्त्यांचा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव घातल्याचे पाहायला मिळाले. मनोज जरांगे पाटलांना मुंबईला जाण्याची वेळ येऊ देऊ नका? असे निवेदन यावेळी बावनकुळेंना देण्यात आले आहे. सरकार मराठ्यांचा अंत पाहत आहे का? असे सवाल देखील यावेळी विचारण्यात आला. तर मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. मराठा समाजासोबत सरकार उभं आहे. मराठा आरक्षणासाठी सुरुवात देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळापासून सुरू झाली. एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची आरक्षणावर कायम चर्चा होते, असे देखील बावनकुळे यांनी म्हटले आहे.

  • 08 Aug 2025 03:55 PM (IST)

    08 Aug 2025 03:55 PM (IST)

    कुत्र्यांच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलगी जखमी

    वडगाव नगरपंचायत हद्दीतील केशवनगर परिसरात पाच भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात ८ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. ही घटना बुधवारी सायंकाळी सुमारास घडली. प्रियांशु पवन गायकवाड (वय ८ रा. केशवनगर वडगाव मावळ जि.पुणे ) असे जखमी मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहितीनुसार, प्रियांशु ही बुधवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास क्लासला जात असताना तिच्यावर अचानकपणे ५ भटक्या कुत्र्याने हल्ला केला. तीने आरडाओरड करताच परिसरातील तानाजी थडगे यांनी धावून येत तिची कुत्र्याच्या तावडीतून सुटका केली. ती बेशुद्धावस्थेत पडल्याने तीला त्वरित रुग्णालयात दाखल केले. हल्ल्यात त्याच्या पायावर व हातावर पाठीला गंभीर जखमा झाल्या आहेत.

  • 08 Aug 2025 03:40 PM (IST)

    08 Aug 2025 03:40 PM (IST)

    वरवे खुर्दमध्ये भरदिवसा घरफोडी

    भोर तालुक्यातील वरवे खुर्द गावात भरदिवसा घरफोडीची गंभीर घटना घडली. अज्ञात चोरट्याने घराचा कडी-कोंडा तोडून सोनं आणि रोख रक्कम चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी केतन अरुण कांबळे (वय २८, रा. वरवे खुर्द) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. ५)  सकाळी ११ ते दुपारी साडेचारच्या सुमारास फिर्यादी कामानिमित्त घराबाहेर गेले असतान त्यांंच्या वरवे खुर्द येथील राहत्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून सुमारे १ लाख ९० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरी केला. यामध्ये ५५ हजार रोख रक्कम आणि १ लाख ३५ हजार किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे.गावात भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर घटने अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड करत आहेत.

  • 08 Aug 2025 03:25 PM (IST)

    08 Aug 2025 03:25 PM (IST)

    गांजानंतर आता गुटख्यावर कारवाई

    ड्रग्जमुक्त पुण्यासाठी पोलिसांचे आटोकाट प्रयत्न सुरू असताना गांजा तस्कर अन् बंदी असणारा गुटखा विक्रेते मात्र थांबत नसल्याचे दिसत आहे. गांजानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी कारवाईकरून गुटखा व सिगारेट विक्रेत्याला बेड्या ठोकल्या आहेत. बाणेर भागात ही कारवाई केली असून, येथून पोलिसांनी सव्वा दोन लाखांचा माल जप्त केला आहे. भूपेश सेवाराम देवासी (२५), मुकेश सेवाराम देवासी (२८) आणि सतराराम पेकाराम देवासी (२४) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई विकास काशिनाथ भोरे (२८) यांनी तक्रार दिली आहे. विठोबा बालाजी मंदिराजवळ, मुरकुटे पार्क, बाणेर येथे ही कारवाई करण्यात आली.

  • 08 Aug 2025 03:09 PM (IST)

    08 Aug 2025 03:09 PM (IST)

    किशोर शिंदेसह कार्यकर्त्यांवर गुन्हा

    महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी गेल्यानंतर आयुक्तांच्या अधिकाऱ्यांसोबत सुरू असलेल्या बैठकीत घुसून गोंधळ घातल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किशोर शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात किशोर शिंदे, प्रशांत मते, नरेंद्र तांबोळी, अविनाश जाधव, महेश लाड यांच्यासह इतरांवर भारतीय न्याय संहिता १३२, १८९(२), महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत पालिकेचे कर्मचारी अमोल पवार (वय ३५) यांनी तक्रार दिली आहे. शिंदे हे आयुक्तांच्या अंगावर धावून गेले असा दावा प्रशासनाकडून केला गेला. तर, आयुक्तांनी मला आणि मराठी माणसांना गुंड असे संबोधिले असा आरोप शिंदे यांनी करीत, कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केले. दरम्यान, मनसेचे कार्यकर्ते एक निवेदन देण्यासाठी आले होते. तेव्हा हा हायहोल्टेज ड्रामा घडला. त्यानंतर महापालिकेचे अधिकारी रात्री शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पोहोचले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून याप्रकरणी तक्रार दिली.

  • 08 Aug 2025 02:49 PM (IST)

    08 Aug 2025 02:49 PM (IST)

    उत्तरकाशीत लष्कराचे ऑपरेशन ‘धराली’; ३५७ नागरिकांचे रेस्क्यू तर ८ सैनिक अन्…

    Uttrakhand Cloudburst: उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील हर्षिल खोर्‍यात वसलेलं आणि गंगोत्री धामला जाणाऱ्या मार्गावर वसलेलं धराली गाव मंगळवारी दुपारी अवघ्या ३० सेकंदांत भयंकर जलप्रलयाचा साक्षीदार बनलं. अचानक झालेल्या ढगफुटीमुळे गावात मोठं नुकसान झालं आहे. अनेक होमस्टे, हॉटेल्स, घरे मलब्याखाली गाडली गेली आहेत. दरम्यान येथील धराली गावात भारतीय लष्कराचे ऑपरेशन धराली सुरु आहे. याअंतर्गत मलब्याखाली गाडल्या गेलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे.

  • 08 Aug 2025 02:39 PM (IST)

    08 Aug 2025 02:39 PM (IST)

    वनरक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

    चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावातील अल्पवयीन मुलीवर वनरक्षकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रणजीत दुर्योधन, असे आरोपी वनरक्षकाचे नाव आहे. पीडित मुलगी कॉलेज सुटल्यानंतर आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून चंद्रपूरहून गावाकडे जात होती. पोलिसांनी आरोपी वनरक्षकाला गोंदिया इथून अटक केली आहे. बल्लारपूर पोलिस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

  • 08 Aug 2025 02:30 PM (IST)

    08 Aug 2025 02:30 PM (IST)

    वारजे माळवाडीत रिक्षा चालकाची आजोबांना मारहाण

    वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्वंयस्फुर्त वाहतूकीचे नियमन करणाऱ्या एका आजोबांना रिक्षा चालकाने किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 'बस थांब्यावर रिक्षा उभी करू नये. थोडी बाजूला घ्या,' असे सांगितल्याच्या रागातून संतप्त रिक्षाचालकाने ही मारहाण केल्याचे सांगण्यात आले आहे. वारजे माळवाडी बस स्थानक परिसरात बुधवारी सकाळी ही घटना घडली आहे. श्रीकांत किशनराव कुलकर्णी (वय ६५) असे मारहाण झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. ते यात जखमी झाले आहेत. कुलकर्णी त्यांच्या मोकळ्या वेळेत वाहतूक नियंत्रणाचे काम करतात. तसेच, वाहतूक पोलिसांना सहकार्य करत असतात.

  • 08 Aug 2025 02:10 PM (IST)

    08 Aug 2025 02:10 PM (IST)

    कुख्यात गुन्हेगारावर एमपीडीएनुसार कारवाई

    धायरी तसेच नर्हे आणि नांदेड सिटी परिसरातील कुख्यात गुन्हेगारावर एमपीडीएनुसार स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्थानबद्धतेचे आदेश दिले आहेत. त्याला एक वर्षासाठी बुलढाणा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. साईनाथ शिवाजी उभे (वय २३, रा. रायकर मळा, धायरी) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्याचे नाव आहे. साईनाथ हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर घातक शस्त्र बाळगणे, खूनाचा प्रयत्न, दरोडा टाकणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली होती. परंतु, तरीही त्याच्या गुन्हेगारीत काही फरक पडला नाही. त्याची गुन्हेगारीकृत्ये सुरूच होती. २०२१ पासून त्याची ही गुन्हेगारीकृत्ये सुरूच होती. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याच्याविरूद्ध उघडपणे तक्रार करण्यास देखील सर्व सामान्य नागरिक भयग्रस्त होते. यादरम्यान, नांदेड सिटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अतुल भोस यांनी त्याच्यावर एमपीडीएनुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव तयारकरून तो पोलिस आयुक्त यांच्याकडे पाठविला होता. त्यानूसार आयुक्तांनी त्याच्यावर कारवाईचे आदेश दिले.

  • 08 Aug 2025 01:55 PM (IST)

    08 Aug 2025 01:55 PM (IST)

    तरुणाच्या गळ्यातील सोन साखळी हिसकावली

    पुणे शहरात सोन साखळी चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, टिंगरेनगर भागात एका तरुणाच्या गळ्यातील दोन लाखांची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून पोबारा केल्याचा प्रकार घडला. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी ३३ वर्षीय तरुणाने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, दुचाकीवरील दोन अनोळखी चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारदार तरुण धानोरीतील अंबानगरी परिसरात राहण्यास आहे. मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तो टिंगरेनगर येथील फादर मायकल सोसायटीजवळून पायी चालत जात होता. तेव्हा दुचाकीवर पाठिमागून आलेल्या दोन चोरट्यांनी त्याच्याजवळ येत गळ्यातील दोन लाख रुपयांची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावली. तरुणाने आरडाओरडा करून त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु, चोरटे सुसाट दुचाकीवरून पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिस सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यांचा माग काढत आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

  • 08 Aug 2025 01:50 PM (IST)

    08 Aug 2025 01:50 PM (IST)

    सायबर फसवणुकीतील रक्कम तक्रारदाराला परत

    रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथील तक्रारदार मयूर मोहन शेडगे (वय ३०) यांची टेलिग्राम चॅनेलवरून अज्ञाताने विशिष्ट टास्क देऊन ३३५०० रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी रहिमतपूर पोलिस ठाण्याच्या सायबर विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करून ही रक्कम तक्रारदाराला परत करण्यात यश मिळवले.
    याप्रकरणी रहिमतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी यशस्वी तपास केला. मयूर शेडगे यांनी १७ जानेवारी २०२५ रोजी सायबर फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार टेलिग्राम चॅनेलवरून जॉब देतो, असे सांगून अज्ञात व्यक्तीने टास्क दिला होता. तो टास्क पूर्ण करून संबंधित व्यक्तीने शेडगे यांना काही रक्कम व त्याचे व्याज पाठवून दिले. अज्ञाताने फिर्यादीचा विश्वास संपादन करून दुसऱ्या टास्कच्या माध्यमातून त्यांच्याकडून ३३ हजार ५०० रुपये उकळले. मात्र त्यांना रक्कम परत मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने रहिमतपूर पोलिस ठाण्याच्या सायबर विभागाकडे तक्रार दिली. ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यास संबंधित तक्रारदारांनी तक्रार दाखल करावी, असे आवाहन सायबर विभागाने केले आहे. सचिन कांडगे यांच्या निर्देशाप्रमाणे रहिमतपूर पोलिसांनी या तक्रारीचा कौशल्यपूर्ण तपास केला. याबाबत दोन तक्रारी दाखल झाल्या होत्या. या प्रकरणात फिर्यादीचे बँक खाते गोठवण्यात आले. न्यायालयाचे आदेश प्राप्त करून तक्रारदाराला फसवणूक झालेली रक्कम पुन्हा माघारी देण्यात आली. सायबर विभागाचे दीपक देशमुख यांनी या तपास कामात सहकार्य केले.

  • 08 Aug 2025 01:40 PM (IST)

    08 Aug 2025 01:40 PM (IST)

    कुख्यात गुन्हेगारांचा गृहप्रकल्पात जबरदस्तीने प्रवेश

    खूनाच्या गुन्ह्यातून जामीनावर बाहेर आलेल्या तीन गुन्हेगारांनी इतरांना सोबत घेऊन बेकायदेशीर जमाव जमवत एका नियोजित गृहप्रकल्पात बेकायदेशीररित्या प्रवेश करण्याचा प्रयत्न करत ५ लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली असून, इतर फरार झाले आहेत. राजु तुकाराम अस्वले (वय २७, रा. चंदननगर), हिमेश सुभाष मोरे (वय १८), आकाश संजय मोरे (वय २४), अंकुश अशोक अडसूळ (वय २८, रा. चंदननगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, त्यांचे इतर सहा ते सात साथीदार पसार झाले आहेत. याबाबत ५१ वर्षीय सुरक्षा रक्षकाने तक्रार दिली आहे.

  • 08 Aug 2025 01:25 PM (IST)

    08 Aug 2025 01:25 PM (IST)

    खासगी यू ट्यूबच्या माध्यमातून पेपर फोडले

    महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे आयोजित केल्या जाणार्‍या तीसरी ते नववीच्या परिक्षेचे पेपर व त्यांची उत्तरे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची कोणतीही परवानगी न घेता प्रसारीत झाली असल्याचे समोर आले आहे. हे पेपर खासगी यु ट्यूब चॅनेलवरून फोडण्यात आले आहेत. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात कैलासन सर मॅथ्स, म मराठी, एस. जे. ट्युशन क्लासेस या तीन खासगी युट्युब चॅनलची नावे समोर आली आहेत. याबाबत सहायक संचालक संगिता प्रभाकर शिंदे (५०, रा. हडपसर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 08 Aug 2025 01:10 PM (IST)

    08 Aug 2025 01:10 PM (IST)

    भाजपा नेत्या नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी

    भाजपाच्या अमरावतीच्या नेत्या नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. धमकी देणाऱ्याने व्हिडीओद्वारे त्यांना धमकी दिली असून यामुळे अमरावतीत पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. भाजपाच्या फायरब्रँड नेत्या नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना याआधी अनेक वेळा धमक्या देण्यात आलेल्या आहेत. या प्रकरणात पोलिस यंत्रणा तपास करीत आहेत. भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर सोशल मीडियावर रिल्स तयार करून त्यांना गळा कापण्याची आणि जीवाने मारण्याची धमकी दिलेली आहे यात अश्लिल शिवीगाळ केल्याचे उघडकीस आले आहे. यापूर्वीही अनेकवेळा नवनीत राणा यांना जीवे मारण्याच्या धमक्या आलेल्या आहेत. अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.

  • 08 Aug 2025 12:50 PM (IST)

    08 Aug 2025 12:50 PM (IST)

    पुण्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या

    ससून रुग्णालयाच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी रात्री वसतिगृहातील एका खोलीत तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ज्योती कृष्णकुमार मीना (वय २३, रा. राजस्थान) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

  • 08 Aug 2025 12:35 PM (IST)

    08 Aug 2025 12:35 PM (IST)

    काँग्रेसच्या बड्या नेत्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल

    काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते तसेच माजी नगरसेवक गोपाळ तिवारी यांच्यासह पाच जणांवर विश्रामबाग पोलिसांनी खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. बोर्ड लावल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून हा प्रकार घडला असून, दोघांनी दिलेल्या तक्रारीनुसार परस्पर विरोधी गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत. नारायण पेठेतील केळकर रस्त्यावर तिवारी यांचे मुरलीधर व्हेज हे हॉटेल आहे. त्यापासून जवळच असलेल्या निघोजकर मंगल कार्यालयाजवळ मंगळवारी (दि ५) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

  • 08 Aug 2025 12:20 PM (IST)

    08 Aug 2025 12:20 PM (IST)

    पतीनं केली पत्नीची हत्या

    पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (५ ऑगस्ट) रात्री खराबवाडी, ता. खेड येथे घडली आहे. याप्रकरणी एका महिलेने महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सचिन रामआसरे यादव (२३, अलाहाबाद, उत्तरप्रदेश, सध्या चाकण, ता. खेड) याला अटक करण्यात आली आहे.

  • 08 Aug 2025 12:01 PM (IST)

    08 Aug 2025 12:01 PM (IST)

    18 लाखाच्या फसवणूकप्रकरणी दाेघांना ठोकल्या बेड्या

    केवळ कागदोपत्री बोगस रेकॉर्ड तयार करुन महानगरपालिकेची अठरा लाखाची फसवणूक केल्याप्रकरणात आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने महापालिकेतील लेखा विभागातील विश्‍वजित जयकुमार पाटील (वय ४९, रा. कोरोची) आणि सेवानिवृत्त कर्मचारी मुकूंद अमृत कांबळे (वय ४१, रा. कामगार चाळ) या दोघांना अटक केली आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिस उपअधिक्षक सुवर्णा पत्की यांनी दिली. या दोघांनाही न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

  • 08 Aug 2025 11:40 AM (IST)

    08 Aug 2025 11:40 AM (IST)

    चिपरीतील तरुणाच्या खूनाचा लागला छडा

    जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एक मोठी कारवाई केली आहे. चिपरी (ता. शिरोळ) येथे तरुणाचा निघृण खुन केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केवळ सहा तासांत तिन्ही आरोपींना चिक्कोडी (जि. बेळगाव, कर्नाटक) येथून शिताफीने अटक केली आहे.दिनांक ६ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास चिपरी गावात घोडावत गेस्ट हाऊस व ऑईल मिलच्या दरम्यान रस्त्यावर संदेश लक्ष्मण शेळके (रा. माळभाग, चिपरी) याचा अज्ञात कारणावरून धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी त्याचे काका भगवान अण्णा शेळके यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित चिक्कोडी येथे असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे शोध पथकाने तत्काळ तेथे धाव घेत सापळा रचला. युवराज रावसाहेब माळी (वय ३०, रा. फिल्टर हाऊसजवळ, चिपरी), सुरज बाबासो ढाले (वय ३०, मूळ गाव खोची, ता. हातकणंगले) गणेश संभाजी माळी (वय २५, रा. माळभाग, चिपरी) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता संशयित आरोपी युवराज माळी याने मयत शेळके यांच्या बहिणीने माळी याच्या आईला अपशब्द वापरल्याचा राग मनात धरून संदेश याचा कोयत्याने वार करून खून केल्याची कबुली दिली आहे.

  • 08 Aug 2025 11:22 AM (IST)

    08 Aug 2025 11:22 AM (IST)

    महिलेचे तब्बल 11 लाखांचे दागिने चोरले

    बावधन परिसरातील एक ज्येष्ठ महिलेने पीएमटी तसेच रिक्षा प्रवास सुरू केल्यानंतर या प्रवासात त्यांच्या पिशवीतून अज्ञात चोरट्याने तब्बल ११ लाखांचे दागिने चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुपारी साडे बारा ते अडीच या कालावधीत त्या प्रवासात होत्या. याप्रकरणी ६० वर्षीय महिलेने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना ५ ऑगस्ट रोजी घडली आहे.

Web Title: Maharashtra crime news in marathi live updates solapur crime

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2025 | 11:21 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक
1

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान
2

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे
3

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे

Pimpri Chinchwad crime news: पिंपरी – चिंचवडमध्ये बेकायदा पिस्तुलांचा वापर, पाच जण वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक
4

Pimpri Chinchwad crime news: पिंपरी – चिंचवडमध्ये बेकायदा पिस्तुलांचा वापर, पाच जण वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.