Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिरा रोड ड्रग्ज प्रकरणात मोठा पर्दाफाश; तेलंगणातील MD कारखाना उद्ध्वस्त, 6.22 कोटींचा मुद्देमाल जप्त

मिरा रोड येथील एमडी ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी तेलंगणातील जहीराबाद येथे सुरू असलेला एमडी ड्रग्ज निर्मिती कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत 6.22 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आतापर्यंत या प्रकरणात एकूण 20.72 कोटी रुपयांचे ड्रग्ज, रसायने आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 02, 2026 | 03:03 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • तेलंगणातील जहीराबाद येथे सुरू असलेला एमडी ड्रग्ज कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला.
  • कारवाईदरम्यान 6.22 कोटी रुपयांचे ड्रग्ज, रसायने आणि प्रयोगशाळेचे साहित्य जप्त.
  • मिरा रोड ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 20.72 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
भाईंदर/विजय काते: मिरा रोड येथील एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थ प्रकरणाच्या तपासात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ ने तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात सुरू असलेला एमडी ड्रग्ज तयार करण्याचा गुप्त कारखाना उद्ध्वस्त करत तब्बल ६.२२ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे आंतरराज्यीय अंमली पदार्थ रॅकेटचा मोठा भांडाफोड झाला असून, आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणात २०.७२ कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या तांत्रिक तपासातून समोर आलेल्या धक्कादायक माहितीनंतर ही धाडसी कारवाई करण्यात आली.

कशी केली कारवाई

नयानगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यानुसार, ४ एप्रिल २०२६ रोजी मिरा रोड पूर्व येथील छेडा आदर्श बिल्डिंगमधील एका घरावर टाकलेल्या छाप्यात १ किलो ३२४ ग्रॅम वजनाचा एमडी अंमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. या पदार्थाची बाजारातील किंमत तब्बल २ कोटी ६६ लाख १७ हजार २८० रुपये इतकी होती. या प्रकरणात श्रीमती फिरदोस अरबाज कुरेशी व तिचा पती अरबाज वकील कुरेशी यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ कडे सोपविण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी यापूर्वीच १५ आरोपींना अटक केली होती. तसेच मिरा रोड, आग्रीपाडा, मालवणी आणि मनोरी परिसरातून एमडी ड्रग्ज, त्याच्या निर्मितीसाठी लागणारी रसायने आणि प्रयोगशाळेतील साहित्य असा सुमारे १३.६५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.तपासादरम्यान आरोपी संदीप विरास्वामी नायडू याला २८ एप्रिल रोजी रायगड जिल्ह्यातील खालापूर येथून अटक करण्यात आली. त्यानंतर २९ मे रोजी हैदराबाद येथून नसीर ऊर्फ बाबा जानीमिया शेख आणि मेहमूद मेहबूब खान या आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

Solapur Crime: संतापजनक! 53 वर्षीय मौलानाने १० वर्षीय चिमुरडीवर केले अत्याचार; मदरशात घडला प्रकार

या आरोपींकडे केलेल्या सखोल चौकशीतून तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील जहीराबाद तालुक्यातील पिचारगडी तांडा येथे दोन एकर परिसरात उभारलेल्या फार्महाऊसमध्ये एमडी ड्रग्ज तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी तातडीने तेथे धाड टाकून कारखाना उद्ध्वस्त केला.
कारवाईदरम्यान पोलिसांनी ३ किलो एमडी ड्रग्ज, क्लोरोफॉर्म, अॅसिटोन, मोनोमिथाइलअमाईन, हायड्रोक्लोरिक अॅसिड तसेच एनडीपीएस कायद्याअंतर्गत नियंत्रित असलेले आर-ब्रोमो यांसह एकूण २,२९३ लिटर रसायने जप्त केली. याशिवाय ड्रग्ज निर्मितीसाठी वापरले जाणारे प्रयोगशाळेतील साहित्यही जप्त करण्यात आले. या सर्व मुद्देमालाची किंमत सुमारे ६.२२ कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अंमली पदार्थांच्या या आंतरराज्यीय नेटवर्कमधील आणखी आरोपींचा शोध घेतला जात आहे.

कोणी केली कारवाई?

पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगर्डे यांच्यासह पथकाने ही उल्लेखनीय कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

30 हून अधिक घरफोड्या करणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या; पोलिसांनी पाठलाग करुन पकडले

💡

Frequently Asked Questions

  • Que: पोलिसांनी कारवाई कुठे केली?

    Ans: तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील जहीराबाद तालुक्यातील पिचारगडी तांडा येथील फार्महाऊसवर कारवाई करण्यात आली.

  • Que: या कारवाईत किती मुद्देमाल जप्त करण्यात आला?

    Ans: या कारवाईत सुमारे 6.22 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

  • Que: मिरा रोड ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत किती मुद्देमाल जप्त झाला आहे?

    Ans: आतापर्यंत एकूण 20.72 कोटी रुपयांचे ड्रग्ज, रसायने आणि संबंधित साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Web Title: Major breakthrough in mira road drugs case md manufacturing unit in telangana dismantled contraband worth 622 crore seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • crime
  • Drugs
  • mira bhaindar

संबंधित बातम्या

Ambarnath Crime: थरकाप उडवणारी घटना! वरवंट्याने डोक्यावर वार, गुप्तांगावर…; 7 वर्षीय मुलाची आईच्या प्रियकराकडून हत्या
1

Ambarnath Crime: थरकाप उडवणारी घटना! वरवंट्याने डोक्यावर वार, गुप्तांगावर…; 7 वर्षीय मुलाची आईच्या प्रियकराकडून हत्या

Mumbai Crime: पंचर काढताना चोराने मारला डल्ला; 111 लाख 55 हजार रुपये केले लंपास; अवघ्या २४ तासात आरोपी जेरबंद
2

Mumbai Crime: पंचर काढताना चोराने मारला डल्ला; 111 लाख 55 हजार रुपये केले लंपास; अवघ्या २४ तासात आरोपी जेरबंद

Bengaluru Crime : Gemini AI ला विचारून रचला तिहेरी हत्येचा कट; आधी आंधळं कसं….; लिव्ह-इन पार्टनरसह दोघे अटकेत
3

Bengaluru Crime : Gemini AI ला विचारून रचला तिहेरी हत्येचा कट; आधी आंधळं कसं….; लिव्ह-इन पार्टनरसह दोघे अटकेत

Karnataka Crime: ‘संपत्ती कशी वाटायची’ चिठ्ठीत लिहिलं अन् संपूर्ण कुटुंब संपवलं; म्हैसूरमधील धक्कादायक घटना
4

Karnataka Crime: ‘संपत्ती कशी वाटायची’ चिठ्ठीत लिहिलं अन् संपूर्ण कुटुंब संपवलं; म्हैसूरमधील धक्कादायक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.