Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amit Shah : ड्रग्जविरोधात आवाज उठवणाऱ्या विक्रमजीतच्या कुटुंबीयांची अमित शाह यांनी घेतली भेट

Amit Shah : पंजाबमध्ये नशाविरोधात आवाज उठवणाऱ्या विक्रमजीत सिंह यांच्या कुटुंबीयांची अमित शाह यांनी भेट घेतली. कुटुंबीयांनी निष्पक्ष तपास, सरकारी नोकरी आणि आर्थिक मदतीची मागणी केली.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 20, 2026 | 03:31 PM
Amit Saha : नशेविरोधात आवाज उठवणाऱ्या विक्रमजीतच्या कुटुंबीयांची अमित शाह यांनी घेतली भेट

Amit Saha : नशेविरोधात आवाज उठवणाऱ्या विक्रमजीतच्या कुटुंबीयांची अमित शाह यांनी घेतली भेट

Follow Us
Follow Us:
  • अमित शहा पंजाबच्या एकदिवसाच्या दौऱ्यावर 
  • नशाविक्रीला विरोध केल्याने हत्या झाल्याचा आरोप
  • परविंदर सिंह झोटा प्रकरण सीबीआयकडे सोपवणार
पंजाब आणि अमली पदार्थ असं समिकरण गेली अनेक वर्षांपासून सुरू आहे. हे समिकरण एवढं मोठं आहे की, बॉलीवूड देखील त्याच्या मोहात पडलं व ‘उडता पंजाब’ नावाचा चित्रपटच काढला. काही अनभिज्ञ नागरिकांना या शिर्षकाचं गणितच कळलं नाही, पण चित्रपट पाहिल्यानंतर वस्तुस्थिती समोर आली.

पंजाबमधील अमली पदार्थ्यांची तस्करी दिवसेंदिवस वाढत आहे. आता पंजाबमधील काही तरुणांनी या अमली पदार्थ तस्करीविरोधात बंड पुकारले असून अमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळ्या मात्र या तरुणांची दिवसाढवळ्या सर्वांदेखत हत्या करत आहे. विक्रमजीत सिंग हा देखील त्यापैकी एक.

अमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळ्यांनी विक्रमजीत सिंगची हत्या केल्याचं बोललं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी मंगळवारी विक्रमजीतच्या कुटुंबाची भेट सुमारे 15 मिनिटे चर्चा केली. या वेळी त्याच्या कुटुंबीयांनी निष्पक्ष तपास, सरकारी नोकरी आणि आर्थिक मदत यासह विविध मागण्यांचे निवेदन त्यांना दिल्याचे सांगण्यात येत आहे.

अमित शाह यांच्या पंजाब दौऱ्याचा हा महत्त्वाचा भाग आहे. राज्यातील अमली पदार्थांच्या समस्येविरोधात लढणाऱ्या आणि या समस्येशी संबंधित हिंसाचारात जीव गमावलेल्या तीन व्यक्तींच्या कुटुंबीयांची ते भेट घेणार आहेत. यामध्ये गुरुदासपूरमधील विक्रमजीत सिंग यांच्यासह मानसा येथील नशाविरोधी कार्यकर्ते परविंदर सिंग झोटा आणि संगरूरमधील गुलजार सिंग यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे.

नशाविक्रीला विरोध केल्याने हत्या झाल्याचा आरोप

विक्रमजीत सिंग यांची १५ ऑक्टोबर रोजी गुरुदासपूर जिल्ह्यातील श्री हरगोबिंदपूर साहिब परिसरातील मारी पन्नवा गावाजवळ कथितरीत्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अमली पदार्थांच्या विक्रीला विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे पंजाबमधील अमली पदार्थांच्या तस्करीचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या हिंसाचाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

नशेच्या व्यापारात सहभागी असलेल्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी राज्यात जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने पंजाब सरकारकडून अलीकडील मृत्यूंच्या घटनांबाबत सविस्तर अहवालही मागवला आहे.

मोठी बातमी ! शपथपत्र खोटे असल्यास आता गुन्हा दाखल होणार; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

परविंदर सिंह झोटा प्रकरण सीबीआयकडे सोपवणार

अमित शाह यांच्या पंजाब दौऱ्यापूर्वी आम आदमी पक्षाच्या सरकारने नशाविरोधी कार्यकर्ते परविंदर सिंह झोटा यांच्या कुटुंबीयांना पाठिंबा दर्शवला. कुटुंबीयांच्या मागणीचा आदर करून हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली.

मंगळवारी सकाळी ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये मान यांनी झोटा यांच्या वडिलांसह संपूर्ण कुटुंबाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याचे म्हटले. तसेच कुटुंबीयांच्या मागणीनुसार प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Ashutosh Ranka And Saurav Das News: आशुतोष रांका आणि सौरभ दास यांच्या जामीन अर्ज फेटाळला: न्यायालयीन कोठडीत वाढ

दरम्यान, पंजाब भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सीबीआय चौकशीचा आदेश देण्यास सरकारने खूप उशीर केल्याची टीका केली.

अमित शाह यांच्या या एकदिवसीय दौऱ्यात लुधियानातील दरेसी मैदानावर आयोजित दसरा उत्सवात सहभागी होण्याचाही कार्यक्रम आहे. या वेळी अमली पदार्थांविरोधातील जनजागृतीचा संदेश दिला जाण्याची अपेक्षा आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमित शाह यांनी पंजाबमध्ये कोणाची भेट घेतली?

    Ans: अमित शाह यांनी अमली पदार्थांच्या विक्रीला विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर हत्या झालेल्या विक्रमजीत सिंह यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

  • Que: विक्रमजीत सिंह यांच्या कुटुंबीयांनी कोणत्या मागण्या केल्या?

    Ans: कुटुंबीयांनी निष्पक्ष तपास, सरकारी नोकरी आणि आर्थिक मदत या प्रमुख मागण्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

  • Que: परविंदर सिंह झोटा प्रकरणाबाबत पंजाब सरकारने काय निर्णय घेतला?

    Ans: मुख्यमंत्री भगवंत मान यांनी कुटुंबीयांच्या मागणीनुसार हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात येत असल्याचे जाहीर केले.

Web Title: Amit shah meets vikramjit singh family punjab drugs case rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Amit saha
  • Drugs
  • Punjab

संबंधित बातम्या

MD Drugs Case: एमडी ड्रग्स विक्रीप्रकरणी पोलीस हवालदारालाच अटक! प्रकाश पवारसह दोघांना बेड्या; ९.२ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त
1

MD Drugs Case: एमडी ड्रग्स विक्रीप्रकरणी पोलीस हवालदारालाच अटक! प्रकाश पवारसह दोघांना बेड्या; ९.२ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त

Asian Champions Trophy साठी भारतीय हॉकी संघ जाहीर; कृष्ण पाठकचे पुनरागमन
2

Asian Champions Trophy साठी भारतीय हॉकी संघ जाहीर; कृष्ण पाठकचे पुनरागमन

Crime News: नशेविरोधात आवाज उठवणं पडलं महागात; फेसबुक LIVEमध्येच कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या
3

Crime News: नशेविरोधात आवाज उठवणं पडलं महागात; फेसबुक LIVEमध्येच कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.