
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
श्रेणिक मिलिंद टाकळे (वय २५, कसबा सांगाव, ता. कागल, जि. कोल्हापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचा नाव आहे. श्रेणिक आपल्या दहा मित्रांसोबत शनिवारी पर्यटनासाठी मालवणमध्ये आला होता. हे सगळे मित्र वायरी येथील एका रिसॉल्टमध्ये उतरले होते. रविवार दुपारी काही मित्र खोलीमध्ये होते तर काही मित्र स्वीमिंगचा आनंद लुटत होते. छोट्या स्वीमिंगपूलमध्ये लहान मुलांसाठी आनंद लुटण्याच्या चार फुटांच्या भागामध्ये श्रेणिक याने आठ ते दहा फुटांवरून उडी घेतली. श्रेणिक याने उडी घेतल्याने तो थेट पुलाच्या तळाशी जाऊन आपटला. यात त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याने तो जागीच मृत्यू झाला.
मध्यरात्री सराईत गुन्हेगार अन् पोलिसांत थरार, पोलिस अधिकाऱ्यावर चाकूने वार; नेमकं काय घडलं?
त्याच्या मित्रांना तत्काळ त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. श्रेणिक हा अविवाहित होता. त्याच्या कुटुंबियांना दुर्घटनेची माहिती देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्यात आला. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. श्रेणिक यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत विच्छेदन करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे.
आधी प्रेमविवाह केला अन् नंतर हुंड्यासाठी छळ झाला; अखेर नवविवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आंबेगाव परिसरात प्रेमविवाह केलेल्या २० वर्षीय तरुणीने कथित हुंड्याच्या छळाला कंटाळून कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी पती, सासू व नणंदेवर गुन्हा नोंदवला आहे.
याबाबत मृत तरुणीच्या आईने आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, पती अजित दशरथ पवार (वय २५), सासू अनुसया दशरथ पवार (वय ५५) आणि नणंद अलका लहू जाधव (वय ३०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृषी विभागाचा दणका, खत विक्रीचे 107 परवाने निलंबित; तब्बल 7 केंद्रांवर गुन्हे दाखल
Ans: मृत तरुणाचे नाव श्रेणिक मिलिंद टाकळे (वय 25) असे आहे.
Ans: स्वीमिंग पूलमध्ये 8 ते 10 फूट उंचीवरून उडी मारताना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ही दुर्घटना घडली.
Ans: पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.