धक्कादायक ! दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या आईलाच संपवलं; डोक्यात वरवंटा घातला अन्...
कोल्हापूर : आईने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने या रागातून जन्मदात्या आईच्या डोक्यात दगडी वरवंटा घालून निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात घडली. सावित्री अरुण निकम (वय ५३) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा अरुण निकम याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण निकम याला दारूचे व्यसन असल्याने तो पूर्णतः दारूच्या आहारी गेला होता. दारू पिऊन सतत तो घरी आईला त्रासही देत होता. बुधवारी सकाळी त्याने आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, आईने त्याला पैसे दिले नसल्याने रागाच्या भरात घरात असलेला दगडी वरवंटा घेऊन त्याने आईच्या डोक्यात हाणला. यामध्ये आई क्षणार्धात जमिनीवर कोसळून त्याच ठिकाणी मृत्यू झाला. कोल्हापुरातील साळुंखे पार्क परिसरामध्ये ही घटना घडली.
दरम्यान, राजारामपुरी पोलिसांनी खून करणारा नराधम मुलगा विजय निकमला घटनास्थळावरून अटक केली आहे. आईचा खून केल्याने कोल्हापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आईचा खून केल्याचे समजताच परिसरांनी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. खून झालेल्या ठिकाणी पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमकडून तपासणी आणि पंचनामा केला. डोक्यात वरंवटा घातल्याने सावित्रीबाई यांच्या मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
रायगडमध्ये घडली खुनाची घटना
दुसऱ्या एका घटनेत, रायगड येथे एका २३ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. आधी इन्स्टाग्रामवर बनावट नावाने खाते उघडून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर त्याला भेटायला बोलावून अपहरण केले आणि जंगलात नेऊन ओढणीने गळा आवळून त्याची हत्या केली. एवढेच नाही तर ओळख पटू नये म्हणून आरोपींनी त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर केमिकल टाकले आणि मोबाईल फोडून टाकला. ही हत्या आणि दुसरं तिसरं कोणी नाही तर त्याच्या पत्नीनेच आपल्या प्रियकर आणि मैत्रिणीसोबत मिळून केली.
हेदेखील वाचा : Jalgaon Crime: जळगावात रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा, पोलिसांनी विधीसंघर्षित बालकासह ६ जणांना केलं जेरबंद