जळगाव: जळगाव जिल्ह्यातून मुक्ताईनगर व वरणगाव शिवारातील पेट्रोल पंपावर गेल्या आठवड्यात सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. विशेष म्हणजे हा पेट्रोल पंप केंद्रीयमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीचा असल्याने पोलिसांनी तातडीने आपली तपासाची चक्रे फिरवत सशस्त्र दोराड्याप्रकरणी पोलिसांनी आता सहा जणांची टोळी जेरबंद केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
९ ऑक्टोबर रोजी मुक्ताईनगर येथील रक्षा टोफ्युअल, कर्की फाटा येथील मनुभाई आशीर्वाद आणि वरणगावजवळील तळवेल फाटा येथील सय्यद पेट्रोल पंपावर बनदुकींचा धाक दाखवत दरोडा टाकण्यात आला होता. आरोपींनी रोख रक्कमसह मोबाईल आणि सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण 1 लाख 33 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता जळगाव पोलिसांच्या गुन्हे शाखेने विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पथकांनी नाशिक व अकोला येथे छापे टाकून ६ जणांच्या टोळीला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सचिन भालेराव, पंकज गायकवाड, हर्षल व देवेंद्र बावस्कर, प्रदुम्न विरघट आणि एक विधी संघर्षित बालक असे आहे. सध्या सर्व आरोपीची मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.
गुगलवर नंबर शोधन पडलं महागात! वॉशिंग मशीनच्या नावाखाली मोबाईल हॅक, जळगावमध्ये ४.६५ लाखांची फसवणूक
जळगावमधून एक सायबर फसवणूक झाल्याची बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीला गुगलवर नंबर शोधणं एवढं महागात पडलं आहे की तब्बल ४ लाख ६५ हजार रुपयांचा गंडा बसला घरगुती वॉशिंग मशीन खराब झाल्याने कंपनीचा कस्टमर केअर नंबर शोधत असताना गुगलवर सर्च केलेल्या नंबरवर कॉल केल्यावर मोबाईल हॅक झाला. आणि फसवणूक झाली. हे सर्व फसवणूक कॉल दरम्यान आलेल्या ओटीपीमुळे ऑटोमॅटिक डाउनलोड झालेल्या APK फाईलमुळे घडले. पीडित निलेश सराफ यांनी तात्काळ सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून तपास सुरु आहे.
सराफ यांना याची कल्पना नसताना ही फाईल इंस्टॉल होऊन गेली आणि त्यांचा मोबाईल हॅक झाला. हॅकर्सनी त्यांच्या बँक खात्यांमध्ये प्रवेश करून विविध व्यवहार केले. केवळ काही तासांतच त्यांच्या खात्यातून ४ लाख ६५ हजार रुपये उडवले गेले. यात दोन बँक खात्यांमधील बचत रक्कम आणि एका क्रेडिट कार्डमधील मर्यादा यांचा समावेश आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसांकडून तपास सुरू आहे.