Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! पत्नीवर कोयत्याने सपासप वार करून हत्या; पंढरपुरातील कोर्टीत खळबळ

मनीषा नवनाथ गोडसे (वय ३७) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.२६) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आरोपी नवनाथ गोडसे याने पत्नी मनीषा गोडसे यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 28, 2026 | 09:11 AM
धक्कादायक ! पत्नीवर कोयत्याने सपासप वार करून हत्या; पंढरपुरातील कोर्टीत खळबळ

धक्कादायक ! पत्नीवर कोयत्याने सपासप वार करून हत्या; पंढरपुरातील कोर्टीत खळबळ

Follow Us
Follow Us:

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील पडोळे मळा परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे. पत्नीवर कोयत्याने सपासप वार करून तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी आरोपी पती नवनाथ गोडसे याच्याविरुद्ध पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, नातेवाईकांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

मनीषा नवनाथ गोडसे (वय ३७) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.२६) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आरोपी नवनाथ गोडसे याने पत्नी मनीषा गोडसे यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मनीषा यांना नातेवाईक आणि मुलांनी तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

Ketan Agrawal Murder Case : ‘केतनचे डोके होते ठेचलेले, हातापायांवरही जखमा’; गायकवाड यांनी केला धक्कादायक खुलासा

या घटनेनंतर पडोळे मळा परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपीला दारूचे व्यसन असल्याची चर्चा असून, नेमक्या कोणत्या कारणाचा तपास पोलीस करत आहेत.

नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी

मयताची बहीण संगीता जाधव यांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. माझ्या बहिणीचा अत्यंत निर्दयीपणे खून करण्यात आला. अशा नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आमच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यापूर्वीही केला होता हल्ला

मयताचे भाऊ सुनील सुखदेव देवमारे यांनीही आरोपीविरोधात गंभीर आरोप केले. लग्नानंतर तो सतत माझ्या बहिणीचा छळ आणि मारहाण करत होता. यापूर्वीही त्याने तिला पेटत्या चुलीत ढकलून दिले होते. त्या वेळी ती गंभीर भाजली होती. आता कोयत्याने वार करून तिचा जीव घेतला. अशा व्यक्तीला कठोरातील कठोर शिक्षा म्हणजे फाशीच झाली पाहिजे,अशी मागणी त्यांनी केली.

कौटुंबिक हिंसाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

या घटनेमुळे कौटुंबिक हिंसाचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्वंकष तपास करत असून, आरोपीविरुद्ध कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नातेवाईकांसह नागरिकांतूनही जोर धरत आहे.

Web Title: Man murder his wife incident in pandharpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 09:11 AM

Topics:  

  • Murder Case
  • Pandharpur crime

संबंधित बातम्या

Bihar : सतत रडत होते बाळ, आवाज सहन न झाल्याने आईनेच कोयत्याने चिरला ६ महिन्यांच्या मुलीचा गळा; घटनेनंतर आत्महत्येचा प्रयत्न
1

Bihar : सतत रडत होते बाळ, आवाज सहन न झाल्याने आईनेच कोयत्याने चिरला ६ महिन्यांच्या मुलीचा गळा; घटनेनंतर आत्महत्येचा प्रयत्न

पूर्ववैमनस्यातून मित्रानेच केला मित्राचा धारदार हत्याराने खून; दोघे एकत्र पार्टीला बसले अन् नंतर अचानक…
2

पूर्ववैमनस्यातून मित्रानेच केला मित्राचा धारदार हत्याराने खून; दोघे एकत्र पार्टीला बसले अन् नंतर अचानक…

‘माझ्या मुलाला न्याय द्या…’, केतनच्या वडिलांच्या आक्रोशापुढे मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, प्रकरणात उज्वल निकम यांची एंट्री
3

‘माझ्या मुलाला न्याय द्या…’, केतनच्या वडिलांच्या आक्रोशापुढे मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, प्रकरणात उज्वल निकम यांची एंट्री

Ketan Agrawal Murder Case: ‘केतनला टक्कल होतं अन् तो विग वापरायचा…’, सिया गोयलचा पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा, खरं कारण आलं समोर
4

Ketan Agrawal Murder Case: ‘केतनला टक्कल होतं अन् तो विग वापरायचा…’, सिया गोयलचा पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा, खरं कारण आलं समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.