सौजन्य फोटो - सोशल मिडीया
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साने चौक परिसरात नेहमीप्रमाणे नागरिकांची वर्दळ सुरू होती. लोक रस्त्यावर ये-जा करत होते आणि काही जण आपली दुकानं बंद करत होते. अशातच एका मवाली आणि उद्धट गावगुंडाने दुचाकीस्वाराला लक्ष्य करत त्याच्यावर अचानक कोयत्याने वार केले. सुदैवाने, या भीषण हल्ल्यात दुचाकीस्वाराने कमालीचे प्रसंगावधान राखल्यामुळे त्याचे प्राण वाचले आणि तो थोडक्यात बचावला.
मात्र, या थरारक घटनेचा व्हिडिओ परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सध्या तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण हातात धारदार हत्यार (कोयता) घेऊन अत्यंत त्वेषाने दुचाकीचा पाठलाग करताना दिसत आहे. हा तरुण दुचाकीस्वरावर हल्लाही करतो, पण काही इंचाने वार चुकतो. जर हा वार दुचाकीस्वराला लागला असता, तर कदाचित मोठा अनर्थ घडला असता.
या जीवघेण्या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव संबंधित दुचाकीस्वाराने चिखली पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात उघडपणे हातात कोयते बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या अशा मुठभर गुंडांचा चिखली पोलिसांनी कसून शोध सुरू केला असून, लवकरच आरोपीला जेरबंद करण्यात येईल, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.
Ans: पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साने चौक परिसरात ही घटना घडली.
Ans: हल्लेखोर तरुणाने हातात धारदार कोयता घेऊन धावत्या दुचाकीस्वारावर वार करण्याचा प्रयत्न केला.
Ans: अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नसली, तरी व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही व्हिडिओच्या आधारे चिखली पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.






