Man Steals More Than 22 Lakh Cash In Mega Mart In Womens Gate Up Nrps
महिलेच्या वेशात मेगा मार्टमध्ये घुसून 22 लाखांहून अधिक रोकड चोरली; मात्र, पुरुषांच्या चप्पलनं केला पर्दाफाश, ‘अशी’ झाली चोराला अटक
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या आलमबागमध्ये असलेल्या विशाल मेगा मार्टमधून मास्क घातलेल्या एका व्यक्तीने लाखो रुपयांची चोरी केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. तपासानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
जगभरात विचित्र पद्धतीने चोरी (Theft) करण्याच्या घटना उघडकीस येत असतात. अनेकदा अशा काही घटना घडतात की चोर चोरी करायला जातो आणि स्व:त अडचणीत अडकतो. मग त्यालाच कुणाच्या तरी मदतीची गरज भासते. अशा घटनांबद्दल ऐकून आपल्याला हसू आवरत नाही. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधून उघडकीस (Uttar Pradesh Crimre News) आली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका व्यक्तीने एका मेगा मार्टमध्ये महिलेच्या गेटअपमध्ये प्रवेश करून 22 लाखांहून अधिकची रोकड चोरून नेली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी तपास केला असता आरोपीने पायात त्याने पुरुषांची चप्पल घातल्याचे दिसले. या चप्पलीवरुन आरोपीची ओळख पटली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
[read_also content=”खोटपणा आला अंगाशी, विग घालून टक्कल लपवणाऱ्या नवरदेवाची फजिती, लग्नाच्या मांडवात सत्य झालं उघड, मग झाली तुडवातुडवी https://www.navarashtra.com/crime/bald-groom-beaten-by-bride-family-for-allegedly-traying-to-do-second-marriage-in-gaya-bihar-nrps-430327.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती महिलेल्या वेशात विशाल मेगा मार्टमध्ये दाखल झाला होता. मार्टच्या मुख्य स्टोअर रूममध्ये रोख रक्कम जमा करण्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेरा दुसऱ्या दिशेने फिरवण्यात आला. यानंतर लॉकरमधून 22 लाखांहून अधिक रुपये काढण्यात आले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
चोराने केला महिलेचा गेटअप
चोरी करण्यासाठी चोराने महिलेचा वेश धारण केला होता. मात्र त्याच्या एका चूकीने त्याच बिंग फुटलं.
त्याने महिलेचा गेटअप केला होता. मात्र तो महिलेची चप्पल घालण्यास विसरला. त्याने पायात पुरुषांची चप्पल घातली होती, त्यामुळे त्याची ओळख उघड झाली. पोलिसांनी तपास करून आरोपींची ओळख पटवली. यानंतर त्याला अटक करण्यात आली.
चोरी करणारा मेगा मार्टचाच कर्मचारी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमागे दुसरे तिसरे कोणी नसून विशाल मेगा मार्टमध्ये गेल्या ६ वर्षांपासून काम करणारा वीर सिंग होता. त्याने ही घटना अतिशय त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने घडवून आणली. 22 लाखांहून अधिक रुपयांची चोरी केल्यानंतर त्यांनी मार्टमधूनच एक साउंड विकत घेतला, ज्यामध्ये एक बॉक्स सापडला. वीरसिंगने त्याच पेटीत पैसे ठेवले. यानंतर तो बिलिंग काउंटरवर जाऊन बारकोड स्कॅन करून बाहेर गेला. मात्र, त्याच्या एका चुकीने त्याला आता तुरुंगाची हवा खावी लागत आहे.
Web Title: Man steals more than 22 lakh cash in mega mart in womens gate up nrps