Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चाकूचा धाक दाखवला अन् मोबाईल पळवून नेला; रस्त्याने जाताना तरूणाला अडवलं

दोन तरुण नागपूर येथे अग्निवीरच्या भरतीसाठी गेले होते. रविवारी ते नागपूरवरून रेल्वेने जऊळका येथे येत होते. मात्र, जऊळका येथून घरी जाण्यासाठी कुठलेच वाहन उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी आपल्या मित्राला दुचाकी घेऊन जऊळका स्टेशन येथे बोलाविले. किन्हीराजा येथील सदर तरुण आपल्या मित्राला घेण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जात असताना जऊळका येथील तीन ते चार जणांनी त्याला रेल्वे स्टेशन येथे अडविले व त्याचा मोबाईल मागितला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 08, 2024 | 03:05 PM
चाकूचा धाक दाखवला अन् मोबाईल पळवून नेला

चाकूचा धाक दाखवला अन् मोबाईल पळवून नेला

Follow Us
Follow Us:

वाशीम : मित्राला घेण्यासाठी दुचाकीने जात असलेल्या तरुणाला तीन ते चार जणांनी अडवले. त्याला चाकूचा धाक दाखवत त्याचा मोबाईल फोनही लुटून नेला. ही घटना जऊळका येथील रेल्वे स्टेशनजवळ घडली. याबद्दल जाब विचारणाऱ्या तरुणावरही चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुण सुदैवाने बचावला.

हेदेखील वाचा : तब्बल 100 सीसीटीव्ही तपासून लावला ‘त्या’ ट्रकचालकाचा शोध, असा अडकला जाळ्यात

जऊळका पोलिस स्टेशनच्या हद्दीत किन्हिराजा येथील दोन तरुण नागपूर येथे अग्निवीरच्या भरतीसाठी गेले होते. रविवारी ते नागपूरवरून रेल्वेने जऊळका येथे येत होते. मात्र, जऊळका येथून घरी जाण्यासाठी कुठलेच वाहन उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी आपल्या मित्राला दुचाकी घेऊन जऊळका स्टेशन येथे बोलाविले. किन्हीराजा येथील सदर तरुण आपल्या मित्राला घेण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जात असताना जऊळका येथील तीन ते चार जणांनी त्याला रेल्वे स्टेशन येथे अडविले व त्याचा मोबाईल मागितला.

हेदेखील वाचा : प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणाची हत्या; दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने पहिल्या प्रियकराला संपवलं

या तरुणाला वाटले त्यांना कोणाला कॉल करायचा असेल. त्यामुळे त्याने मोबाईल दिला. त्यानंतर त्यांनी त्याचा पासवर्ड विचारला असता त्यांना पासवर्ड सुध्दा सांगितला. मात्र, पासवर्ड मिळताच ते तीन ते चार जण मोबाईल परत न करताच तेथून निघाले. त्यामुळे या तरुणाने ‘माझा मोबाईल कुठे घेऊन जाता?’ असा प्रश्न करत त्याने आपला मोबाईल त्यांना परत मागितला. मात्र, मोबाईल परत मागताच त्यांनी त्याला ‘तू इथून निघून जा’, असे म्हणत आपल्या जवळील चाकू दाखवला आणि तेथून पळून गेले.

Web Title: Man threatened with a knife and stole the mobile phone incident in washim nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2024 | 03:05 PM

Topics:  

  • Washim news

संबंधित बातम्या

Handball Tournament: अजित-ओमची भरारी! गुरुकुलच्या दोन शिलेदारांची थेट महाराष्ट्राच्या राष्ट्रीय संघात निवड
1

Handball Tournament: अजित-ओमची भरारी! गुरुकुलच्या दोन शिलेदारांची थेट महाराष्ट्राच्या राष्ट्रीय संघात निवड

Washim News: मत्स्य व्यावसायिकांना मदत देणार, मंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आढावा
2

Washim News: मत्स्य व्यावसायिकांना मदत देणार, मंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आढावा

Washim: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी शेतकऱ्यांच्या जाणल्या समस्या, रणथम शिवारात अंधारात टॉर्चच्या उजेडात केली पीक पाहणी
3

Washim: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी शेतकऱ्यांच्या जाणल्या समस्या, रणथम शिवारात अंधारात टॉर्चच्या उजेडात केली पीक पाहणी

Washim: मतदार नोंदणीसाठी सहकार्य करा, तहसीलदार राजेंद्र पाटील यांचे आवाहन, विशेष मतदार सेवा अभियान
4

Washim: मतदार नोंदणीसाठी सहकार्य करा, तहसीलदार राजेंद्र पाटील यांचे आवाहन, विशेष मतदार सेवा अभियान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.