
Chandrashekhar Bawankule
यावेळी शेतकऱ्यांनी वीजपुरवठ्याच्या समस्या, पीकविम्याची रक्कम, घरकुल अनुदान तसेच कर्जासाठी बँकांकडून येणाऱ्या अडचणी मांडल्या. पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा मुद्दा मांडला. तसेच शेतातील वीजतार चोरीच्या घटनांमुळेही अडचणी निर्माण होत असल्याचे सांगितले, वीजपुरवठा सुरळीत नसल्याने शेतीच्या कामांवर परिणाम होत असल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनाला आणून दिले.
महसूलमंत्री बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेत संबंधित प्रशासकीय यंत्रणेला आवश्यक कार्यवाहीच्या सूचना दिल्या. यावेळी महसूल, महावितरण, कृषी, भूमिअभिलेख यांसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
कारंजा येथे देखील पावसाच्या दीर्घ खंडामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करून प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे मदत देण्याची मागणी होत आहे. बांबर्डी गीत ज्ञानेश्वर की यांच्या शेतातील है दृश्य केवळ एका शेतकऱ्याची व्यथा नसून, पावसाच्या दडीने खरीप हंगामावर आलेल्या संकटाचे जिवंत उदाहरण ठरत आहे. शेतक-याने घाम गाळून पिकविलेल्या सोयाबीनमध्येच आता जनावरे चरण्याची वेळ आली. त्यामुळे शासनाने या गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
Washim: मतदार नोंदणीसाठी सहकार्य करा, तहसीलदार राजेंद्र पाटील यांचे आवाहन, विशेष मतदार सेवा अभियान