
representative image
विशेष मतदार सेवा अभियानांतर्गत नागरिकांनी आपल्या कुटुंबातील सर्व पात्र सदस्यांची नावे मतदार यादीत आहेत की नाही, याची खात्री करावी आणि आवश्यक ती दुरुस्ती करून घ्यावी, हे आजच तपासा व एकाही पात्र मतदाराची नोंदणी सुटू नये, याकरिता मतदार नोंदणी व दुरुस्तीसाठी प्रशासनाला सहकार्य करा, असे जाहीर आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले. ऑनलाइन अर्जासाठी संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा १९५० या मतदार हेल्पलाईनवर संपर्क साधावा. या विशेष अभियानामध्ये कारंजा विधानसभा मतदारसंघातील सर्व पात्र नागरिकांनी सहभागी होऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन कारंजा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे व मानोरा तहसीलदार राजेंद्र पाटील, महसूल अधिकारी, मानोरा शरद मोघाड यांनी केले.
नवीन मतदार नोंदणी तरुणाईसाठी सुवर्णसंधी – ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण झाले आहे, त्यांनी त्वरित नाच नोंदवून घ्यावे, नाद तपासणीः मतदार यादीत तुमचे नाच सुरक्षित आहे की नाही, हे आजच तपासा, चुका दुरुस्त कराः नाव, वय, जन्मतारीख, लिंग किंवा फत्यामध्ये काही चूक असल्यास ती दुरुस्त करून घ्या. पत्ता बदला जर तुम्ही तुमचे घर बदलले असेल, तर नवीन पत्ता मतदार यादीत अपडेट करा, नाव वगाद्रमों कुटुंबातील मृत किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित व्यक्तीचे नाव वादीतून कमी करण्यासाठी अर्ज करा.
नागरिकांच्या सुविधेसाठी खास शनिवार आणि रविवारी विशेष शिबिरांचे व्ायोजन विशेष शिबिरांचे वेळापत्रक ४ ते १० ऑक्टोबर, ११ ऑक्टोचर रोजी स्थळः तुमचे संबंधित मतदान केंद्र किंवा निश्चित मतदार सेवा केंद्र.
नमुना ६: नवीन मतदार नोदणीसाठी, नमुना ८ः दुरुस्ती किंवा पत्ता बदलण्यासाठी, नमुना ७: नाव वगळणे किंवा हरकतीसाठी.