Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

20 हजाराची लाच घेणं भोवलं; पंढरपुरात मंडळ अधिकाऱ्याला रंगेहात पकडले

२० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पंढरपूर तालुक्यातील खर्डी मंडळाचे मंडळ अधिकारी दिलीप दिगंबर सरवदे (वय ५६) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 09, 2025 | 03:02 PM
20 हजाराची लाच घेणं भोवलं; पंढरपुरात मंडळ अधिकाऱ्याला रंगेहात पकडले

20 हजाराची लाच घेणं भोवलं; पंढरपुरात मंडळ अधिकाऱ्याला रंगेहात पकडले

Follow Us
Close
Follow Us:
  • २० हजारांची लाच घेणं भोवलं
  • मंडळ अधिकाऱ्याला रंगेहात पकडले
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
पंढरपूर/नवनाथ खिलारे : शेतजमिनीचे बिनशेतीकरण करण्यासाठी आवश्यक असलेला भूसंपादन नसल्याचा अहवाल तहसील कार्यालयास पाठविण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पंढरपूर तालुक्यातील खर्डी मंडळाचे मंडळ अधिकारी दिलीप दिगंबर सरवदे (वय ५६) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या प्रकरणात तुकाराम आसबे (वय ४५, रा. तावशी) या खासगी एजंटचीही भूमिका उघडकीस आली असून, त्याच्याविरुद्धही गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

तक्रारदार यांनी प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे शेतजमिनीचे बिनशेती करण्यासाठी अर्ज सादर केला होता. या अर्जाची चौकशी करून भूसंपादन नसल्याचा अहवाल तहसील कार्यालयास पाठविण्यासाठी आरोपी मंडळ अधिकारी सरवदे यांनी सुरुवातीला ५ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले होते. त्यानंतर उर्वरित २० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. या तक्रारीची दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ रोजी पडताळणी करण्यात आली असता, खासगी व्यक्ती तुकाराम आसबे याने मंडळ अधिकारी सरवदे यांच्यासाठीच लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी रचलेल्या सापळ्यात आरोपी सरवदे यांनी स्वतः २० हजार रुपयांची लाच स्वीकारली आणि त्याच वेळी एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात अटक केली आहे.

या कारवाईनंतर पंढरपूर शहर पोलीस ठाणे (सोलापूर ग्रामीण) येथे आरोपीविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ (सुधारित) कलम ७ व ७अ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. संपूर्ण मोहिम शिरीष सरदेशपांडे (पोलीस उपायुक्त / अधीक्षक, एसीबी पुणे) व अजित पाटील (अपर पोलीस अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले, पोलीस निरीक्षक रविंद्र लांभाते व पोलीस नाईक संतोष नरोटे, पोकों गजानन किलगी, चापोह राहूल गायकवाड या टीमने यशस्वी कारवाई केली.

“कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने काम करणारा खासगी एजंट जर कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाच मागत असेल, तर नागरिकांनी अजिबात भीती न बाळगता तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. अशा तक्रारी गोपनीय ठेवल्या जातील व कठोर कारवाई केली जाईल,” — प्रशांत चौगुले, पोलीस उपअधीक्षक, एसीबी सोलापूर

एसीबी सोलापूर कार्यालय नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असून, टोल फ्री क्रमांक १०६४, तसेच ऑनलाईन तक्रार पोर्टल व मोबाइल अ‍ॅपद्वारे तक्रार नोंदविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Web Title: Mandal officer caught red handed while taking bribe in pandharpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 03:01 PM

Topics:  

  • Bribe News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

तरुणावर तलवारीसह लोखंडी रॉडने हल्ला; उधारीचे पैसे मागितल्याचा आला राग अन्…
1

तरुणावर तलवारीसह लोखंडी रॉडने हल्ला; उधारीचे पैसे मागितल्याचा आला राग अन्…

शालेय सहलींसाठी फक्त ‘लालपरी’, खासगी बस वापरल्यास…; सहायक परिवहन आयुक्तांचे आदेश
2

शालेय सहलींसाठी फक्त ‘लालपरी’, खासगी बस वापरल्यास…; सहायक परिवहन आयुक्तांचे आदेश

Marriage agents racket: सावधान! भावनांच्या जाळ्यात अडकवून मांडला जातोय विवाहांचा बाजार; एजंटांकडून लाखोंची लूट उघड
3

Marriage agents racket: सावधान! भावनांच्या जाळ्यात अडकवून मांडला जातोय विवाहांचा बाजार; एजंटांकडून लाखोंची लूट उघड

गोध्रातील टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका; तिघांना ठोकल्या बेड्या
4

गोध्रातील टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका; तिघांना ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.