Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाहतूक कोंडी कमी होणार! विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल पुणेकरांच्या सेवेत

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पित करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 08, 2026 | 06:25 PM
वाहतूक कोंडी कमी होणार! विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल पुणेकरांच्या सेवेत

वाहतूक कोंडी कमी होणार! विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल पुणेकरांच्या सेवेत

Follow Us
Follow Us:

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पित करण्यात आला आहे. या पुलामुळे विद्यापीठ चौक परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

 

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. तसेच लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुण्यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरासाठी सक्षम पायाभूत सुविधा अत्यावश्यक आहेत. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शासनाकडून बहुआयामी उपाययोजना करण्यात येत आहेत. विद्यापीठ चौकातील जुना पूल पाडून आधुनिक दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेताना अनेक अडचणी आणि मतभेद होते; मात्र सर्वांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे.

या प्रकल्पासाठी दिवंगत अजित पवार यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, सुरुवातीला या निर्णयावर टीकाही झाली होती; मात्र शहराच्या दीर्घकालीन हिताचा विचार करून हा प्रकल्प राबविण्यात आला. आता या पुलामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. या पुलाला अजित पवार यांचे नाव देण्याबाबत व्यक्त झालेल्या भावना लक्षात घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

पुणे हे देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक असून आयटी क्षेत्रासोबतच ‘ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स’ (GCC) क्षेत्रातही शहराने मोठी झेप घेतली आहे. या विकासाला चालना देण्यासाठी मजबूत पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. शहरातील रस्त्यांसाठी उपलब्ध जागा मर्यादित असल्याने उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, भुयारी मार्ग आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार अशा विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी अनेक वर्षांपासून मोठी समस्या होती. या समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा एकात्मिक दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. वरच्या स्तरावर मेट्रो मार्ग आणि खालच्या स्तरावर रस्ते वाहतुकीसाठी उड्डाणपूल अशी रचना करण्यात आली आहे.

पीएमआरडीएच्या माध्यमातून सुमारे २७७ कोटी रुपये खर्च करून १,७६३ मीटर लांबीचा हा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. औंध, बाणेर, पाषाण आणि शिवाजीनगर या भागांतील वाहतुकीसाठी स्वतंत्र रॅम्प व जोडरस्ते तयार करण्यात आले असून त्यामुळे या परिसरातील वाहतूक अधिक वेगवान आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

हे सुद्धा वाचा : वाहतूक कोंडीतून होणार सुटका? पुणे शहराबाहेरही विस्तारणार मेट्रोचे जाळे

Web Title: Integrated double decker flyover at vidyapeeth chowk in pune inaugurated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 06:25 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • pune news
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
1

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!
2

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय
3

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय

चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश
4

चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.