Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोहोळमध्ये वृद्धेवर चाकूने हल्ला करून मंगळसूत्र लंपास; आरोपीला काही तासांतच बेड्या

खैरूनिस्सा यांच्या गळ्याला चाकू लावून त्यांना धमकावले आणि त्यांच्या गळ्यातील १०५००० रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने तोडण्याचा प्रयत्न केला. वृद्ध असतानाही खैरूनिस्सा यांनी चोराचा धडाडीने प्रतिकार केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 07, 2026 | 11:02 AM
मोहोळमध्ये वृद्धेवर चाकूने हल्ला करून मंगळसूत्र लंपास; आरोपीला काही तासांतच बेड्या

मोहोळमध्ये वृद्धेवर चाकूने हल्ला करून मंगळसूत्र लंपास; आरोपीला काही तासांतच बेड्या

Follow Us
Follow Us:

​मोहोळ : मोहोळ शहरातील आदर्श चौक परिसरात चोरीची घटना घडली. एका ७६ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून, चाकूचा धाक दाखवत मंगळसूत्र चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मोहोळ पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.५) पहाटेच्या सुमारास घडली होती.

​याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदर्श चौक, मोहोळ येथे राहणाऱ्या खैरूनिस्सा जाफर शेख (वय ७६) या ५ मे रोजी पहाटे ५ वाजता नमाज पठण करण्यासाठी उठल्या होत्या. यावेळी बुरखा परिधान केलेल्या एका अज्ञात इसमाने त्यांच्या घरात प्रवेश केला. त्याने खैरूनिस्सा यांच्या गळ्याला चाकू लावून त्यांना धमकावले आणि त्यांच्या गळ्यातील १०५००० रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने तोडण्याचा प्रयत्न केला. वृद्ध असतानाही खैरूनिस्सा यांनी चोराचा धडाडीने प्रतिकार केला. या झटापटीत संशयित आरोपीच्या तोंडावर असलेला बुरखा खाली पडला आणि त्यांनी त्याला ओळखले. त्यानंतर आरोपी मंगळसूत्र कापून तेथून पसार झाला.
​
​दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवली. पीडित महिलेने दिलेल्या वर्णनावरून पोलिसांनी गफुरशाह इब्राहिम शेख या संशयिताला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्याच्याकडून ​गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केला. ​मंगळसूत्रातील काही सोन्याचे मणी हस्तगत केले आहेत.
​
​याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हा तपास सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर आणि मोहोळचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नवनाथ पाटील व त्यांचे पथक करत आहेत.

‘माझ्या नराधम बापाला फाशीच द्या’; पर्वती अत्याचार प्रकरणातील आईचा टाहो, चिमुरडीने सांगितलेला थरार ऐकून जळेल काळजाचं पाणी

बारामतीत दरोडा

दुसऱ्या एका घटनेत, बनावट फेसबुक अकाउंटवरून स्वस्त दरात गहू देण्याच्या आमिषाने व्यापाऱ्याला जाळ्यात ओढून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत मारहाण करून रोख रक्कम व दागिने लुटणाऱ्या टोळीला बारामती तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद करत धडाकेबाज कामगिरी केली आहे. रवी संजय माने (वंजारवाडी, बारामती), श्रीकांत अर्जुन घुले (ढेकळवाडी, बारामती), अभिषेक भाऊसो ठोंबरे (ढेकळवाडी, बारामती), अतुल मोहन भोलणकर (वंजारवाडी, बारामती) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Web Title: Mangalsutra snatched after elderly woman attacked with a knife in mohol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 11:02 AM

Topics:  

  • crime news
  • Gold Theft

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.