Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Mumbai Morcha: पोलिसांचा आंदोलनाला नकार; मनोज जरांगेंची तिरपी चाल, आता थेट हायकोर्टात जाण्याची तयारी!

Manoj Jarange Mumbai Morcha: गेल्या वर्षीच्या मराठा आंदोलनादरम्यान दक्षिण मुंबईत सुमारे 5 हजार वाहने अनधिकृतपणे उभी राहिल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा पोलिसांचा आक्षेप आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 15, 2026 | 10:17 AM
Manoj Jarange Patil, Manoj Jarange Mumbai Morcha, Azad Maidan Protest,

Manoj Jarange Patil, Manoj Jarange Mumbai Morcha, Azad Maidan Protest,

Follow Us
Follow Us:
  • मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाचा आज १८ वा दिवस.
  • १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मोजक्या सहकाऱ्यांसह मुंबईकडे कूच.आझाद मैदानावर ५० जणांच्या आंदोलनासाठी पोलिसांकडे नवा अर्ज दाखल
Manoj Jarange Patil Mumbai Morcha: मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाचा आज 18 वा दिवस आहे. जरांगे पाटील आज (15 सप्टेंबर) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आपल्या काही मोजक्या समर्थकांसह अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी यापूर्वी परवानगी नाकारल्यानंतर आता जरांगे यांच्या वतीने पुन्हा एकदा अर्ज दाखल करण्यात आला आहे.

जरांगे पाटील यांच्या नव्या अर्जातून 50 जणांना आंदोलन करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आंदोलनासाठी पोलिसांनी घालून दिलेले सर्व नियम आणि अटी पाळण्यात येतील. तसेच 18 सप्टेंबर रोजी दिलेल्या वेळेतच आंदोलन करण्यात येईल, असेही अर्जात नमूद करण्यात आले आहे.

Abhijeet Dipke On MPSC Protest: पेपरफुटीविरोधात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले; ‘CJP’चे अभिजित दीपकेंची मोठी

आज दुपारपर्यंत या अर्जावर पोलिस काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे. पण पोलिसांनी निर्णय निर्णय न घेतल्यास मनोज जरांगे पाटील दुपारी न्यायालयात अर्ज दाखल करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

परवानगी न मिळाल्यास हायकोर्टात जाणार?

मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावरील दुसऱ्यांदा आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुढे काय भूमिका घेतात, याबाबत उत्सुकता आहे. यापूर्वी त्यांनी मुंबईत आपण एकट्याने उपोषणासाठी जाणार असल्याचे जाहीर केले होते. आपल्यासोबत इतर कोणीही मुंबईला येणार नसल्याचेही त्यांनी म्हटले होते.

मुंबई पोलिसांनी कायदेशीर आणि सुरक्षेच्या कारणांचा हवाला देत परवानगी नाकारली आहे. मात्र, आझाद मैदानावर आंदोलन करण्याच्या भूमिकेवर जरांगे ठाम आहेत. परवानगी मिळाली नाही, तर उच्च न्यायालयात (High Court) दाद मागण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

दरम्यान, नव्या अर्जात केवळ 50 जणांना आंदोलनासाठी परवानगी देण्याची मागणी करण्यात आल्याने पोलिसांकडून यावेळी काय निर्णय घेतला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी का नाकारली?

गेल्या वर्षीच्या मराठा आंदोलनादरम्यान दक्षिण मुंबईत सुमारे 5 हजार वाहने अनधिकृतपणे उभी राहिल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा पोलिसांचा आक्षेप आहे.

कालपासून म्हणजेच 14 सप्टेंबरपासून मुंबईत गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. या काळात शहरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने परिस्थिती संवेदनशील असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला, डोक्यात मारला दगडी खलबत्ता; पत्नी गंभीर जखमी

आझाद मैदानातील जागेची मर्यादा

आझाद मैदानातील सुमारे 7 हजार चौरस मीटर जागेत नियमांनुसार कमाल 5 हजार आंदोलकांना सामावून घेता येते. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी मोठ्या संख्येने मुंबईत येण्याचे आवाहन केल्याने पोलिसांकडून गर्दी नियंत्रणाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

वाहतूक आणि रुग्णसेवेचा प्रश्न

मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल झाल्यास दक्षिण मुंबईतील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या परिसरातील जी.टी., कामा, सेंट जॉर्ज आणि बॉम्बे हॉस्पिटल यांसारखी रुग्णालये, न्यायालये तसेच आर्थिक केंद्रांच्या कामकाजावरही परिणाम होऊ शकतो, अशी प्रशासनाची चिंता आहे. आता मनोज जरांगे पाटील यांच्या नव्या अर्जावर मुंबई पोलिस काय निर्णय घेतात आणि परवानगी न मिळाल्यास ते उच्च न्यायालयात कोणती भूमिका मांडतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

 

 

 

Web Title: Manoj jarange patil mumbai march 15 september azad maidan permission high court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 10:17 AM

Topics:  

  • Manoj Jarange Patil

संबंधित बातम्या

Manoj Jarange : जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या सर्व अटी मान्य, आता मुंबईत उपोषणाला परवानगी मिळणार?
1

Manoj Jarange : जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या सर्व अटी मान्य, आता मुंबईत उपोषणाला परवानगी मिळणार?

Manoj Jarange Patil : ‘मंत्र्यांनी जरांगेंचे पाय चेपून द्यावेत’; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात, म्हणाले ‘सरकारमध्ये दम नाही’
2

Manoj Jarange Patil : ‘मंत्र्यांनी जरांगेंचे पाय चेपून द्यावेत’; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात, म्हणाले ‘सरकारमध्ये दम नाही’

Manoj Jarange Patil : ‘हे दिवस आंदोलनाचे नाहीत’; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बावनकुळेंची जरांगेंना विनंती
3

Manoj Jarange Patil : ‘हे दिवस आंदोलनाचे नाहीत’; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बावनकुळेंची जरांगेंना विनंती

Manoj Jarange Mumbai Protest:  सलग दोनदा अर्ज फेटाळल्याने जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष; मराठा आंदोलनाची रणनीती बदलणार?
4

Manoj Jarange Mumbai Protest: सलग दोनदा अर्ज फेटाळल्याने जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष; मराठा आंदोलनाची रणनीती बदलणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.