पेपरफुटीविरोधात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले; 'CJP'चे अभिजित दीपकेंची मोठी घोषणा
‘एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिवांच्या राजीनाम्याची मागणी करणारे आंदोलन पुढे नेले जाईल. पण २४ सप्टेंबरपर्यंत मागणी मान्य न झाल्यास एमपीएससी परीक्षार्थींशी संवाद साधण्यासाठी राज्यव्यापी दौरा केला जाईल, असे सीजेपीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता; विदर्भासह कोकणातही दिलासा मिळणार
अभिजित दीपके आणि सीजेपी सदस्य या आंदोलकांमध्ये सहभागी होणार असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. एमपीएससी परीक्षार्थीसोबत झालेल्या बैठकीनंतर दीपके यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे की, ‘सीजेपी आणि मी या लढ्यात एमपीएससी परीक्षार्थीच्या पाठीशी आहोत. एमपीएससीच्या उच्च अधिकाऱ्यांचे राजीनामे होईपर्यंत आम्ही परीक्षार्थीसोबत उभे राहू. दरम्यान, भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणावी तसेच विविध परीक्षांमधील कथित पेपरफूट आणि अनियमिततेवर कारवाई करावी, या मागणीसाठी एमपीएससी परीक्षार्थीनी राज्याच्या विविध भागांत आंदोलने करण्यात येत आहेत.
Maharashtra Politics : भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय अनंता पावशे यांचा शिंदेंच्या
एमपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. पेपरफुटी, भरती प्रक्रिया आणि विद्याथ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी स्पर्धा परीक्षार्थीनी नुकताच विविध ठिकाणी आक्रोश मोर्चे काढले होते. यामध्ये हजारोंच्या संख्ये परीक्षार्थी सहभागी झाले होते. मागण्या मान्य न झाल्यास पुण्यात जंतरमंतरची पुनरावृत्ती करण्याचा थेट इशारा यावेळी देण्यात आला होता.






