Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पश्चिम बंगाल हादरले! मैत्रिणीसोबत जेवायला गेली अन्…; MBBS विद्यार्थिनी सामूहिक बलात्काराची शिकार

विद्यार्थिनी तिच्या एका मैत्रिणीसोबत रात्रीचे जेवण करण्यासाठी कॉलेज परिसरातून बाहेर गेली होती. यावेळी तीन तरुण त्यांच्याजवळ आले. आरोपींना पाहून पीडितेची मैत्रीण घाबरली आणि घटनास्थळावरून पळून गेली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 11, 2025 | 06:11 PM
पश्चिम बंगाल हादरले! मैत्रिणीसोबत जेवायला गेली अन्...; (Photo Credit- X)

पश्चिम बंगाल हादरले! मैत्रिणीसोबत जेवायला गेली अन्...; (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • पश्चिम बंगाल हादरले!
  • मैत्रिणीसोबत जेवायला गेली अन्…;
  • MBBS विद्यार्थिनी सामूहिक बलात्काराची शिकार

West Bengal: पश्चिम बंगालमधील बर्धमान जिल्ह्यातील दुर्गापूर येथे एका मेडिकल कॉलेजच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची (Gangrape) संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित तरुणी ओडिशाच्या जलेश्वरची रहिवासी आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

नेमकी घटना

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी रात्री ८ ते ८.३० दरम्यान घडली. ही विद्यार्थिनी तिच्या एका मैत्रिणीसोबत रात्रीचे जेवण करण्यासाठी कॉलेज परिसरातून बाहेर गेली होती. यावेळी तीन तरुण त्यांच्याजवळ आले. आरोपींना पाहून पीडितेची मैत्रीण घाबरली आणि घटनास्थळावरून पळून गेली. या तिन्ही आरोपींनी पीडितेचा मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि तिला जबरदस्तीने जवळच्या जंगलात नेले, जिथे त्यांनी तिला आपल्या वासनेला बळी पाडले. या क्रूर कृत्यानंतर आरोपींनी पीडितेला कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. इतकेच नाही, तर मोबाईल परत हवा असल्यास पैसे देण्याची धमकीही त्यांनी दिली.

Durgapur, West Bengal | The victim’s father says, “At 10 PM, her friend called us and said that your daughter has been raped. We live in Jaleshwar. My daughter was studying here. Yesterday, one of her classmates took her out on the pretext of getting something to eat, but when… https://t.co/Rf1Z3KOXaA pic.twitter.com/6dcDP0Dviu — ANI (@ANI) October 11, 2025

Keral Crime: बायकोचा गळा दाबून हत्या केली, मृतदेह ६० किमी दूर खड्ड्यात फेकला, इराणी महिलेसोबत…; अंगावर काटा आणणरी घटना

पीडितेची प्रकृती नाजूक

या घटनेनंतर पीडितेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. तिच्यावर दुर्गापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच शनिवारी सकाळी पीडितेचे पालक ओडिशाहून दुर्गापूरला पोहोचले. पीडितेच्या वडिलांनी तीव्र संताप व्यक्त करत, “या कॉलेजच्या सुरक्षिततेबद्दल ऐकून मुलीला इथे पाठवले होते, पण आता जे घडले त्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला आहे. या गुन्ह्यातील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” अशी मागणी केली. पीडितेच्या आईनेही पोलिसांकडून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

तपासात महत्त्वाचे पुरावे, NCW कडून दखल

पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून घेतला असून, प्राथमिक तपासात अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. तपास अधिकाऱ्यांच्या मते, हल्लेखोरांनी या गुन्ह्याची योजना आधीच आखली होती. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पीडितेच्या मैत्रिणीचीही चौकशी केली जात आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळी पुरावे गोळा केले आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाचे (NCW) एक पथक पीडिता आणि तिच्या कुटुंबाला भेटण्यासाठी रवाना झाले आहे.

राज्यात महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित

NCW सदस्या अर्चना मजुमदार यांनी पश्चिम बंगालमधील महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांवर चिंता व्यक्त केली आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पाऊले उचलण्याचे आवाहन केले. दरम्यान, पश्चिम बंगालच्या आरोग्य विभागानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, खाजगी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. या घटनेमुळे राज्यात महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

तू मला खूप आवडते, मी तुला नोकरी लावतो अन्…; पुण्यातील संतापजनक प्रकार

Web Title: Mbbs student gang raped in west bengal after going out for lunch with friend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2025 | 06:02 PM

Topics:  

  • gang raped
  • Nation News
  • West bengal

संबंधित बातम्या

Dipawali Firecrackers: फटाक्यांच्या मुद्द्यावर केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये; सरकारने सुप्रीम कोर्टाकडे केली ‘ही’ मागणी
1

Dipawali Firecrackers: फटाक्यांच्या मुद्द्यावर केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये; सरकारने सुप्रीम कोर्टाकडे केली ‘ही’ मागणी

‘मुंबई हल्ल्यावेळी काँग्रेसने गुडघे टेकले, विदेशी दबावामुळे…’, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2

‘मुंबई हल्ल्यावेळी काँग्रेसने गुडघे टेकले, विदेशी दबावामुळे…’, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला

Bihar Election 2025: आचारसंहिता म्हणजे काय? निवडणूक काळात राजकीय पक्ष आणि प्रशासनाला कोणत्या नियमांचे करावे लागते पालन
3

Bihar Election 2025: आचारसंहिता म्हणजे काय? निवडणूक काळात राजकीय पक्ष आणि प्रशासनाला कोणत्या नियमांचे करावे लागते पालन

पश्चिम बंगालमध्ये गुंडा राज? दगड, काठ्या घेऊन BJP नेत्यावर प्राणघातक हल्ला; Video बघून म्हणाल…
4

पश्चिम बंगालमध्ये गुंडा राज? दगड, काठ्या घेऊन BJP नेत्यावर प्राणघातक हल्ला; Video बघून म्हणाल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.