केरळ: केरळच्या कोट्टायमच्या भागात अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. या घटनेने त्या भागात दहशत निर्माण झाली आहे. स्वतःच्या बायकोसोबत कोणी अस करेल का ? हा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होईल. नवरा बायको म्हटल की संसार दोघांनी पुढे न्यायचा असतो. मात्र याच संसारात नवऱ्याने माती कालवली आणि बायकोचा गळा दाबून जीव घेतला. ही घटना आहे केरळ राज्यातील कोट्टायम या भागातील या घटनेने सगळ्यांना धक्का बसला आहे.
Beed: पवनचक्की टॉवर प्रकरणात पोलिस-शेतकरी आमनेसामने, तुझं कॅरेक्टर खराब करून टाकतो…; व्हिडिओ व्हायरल
या घटनेतील आरोपी सॅम जॉर्ज याने आपल्या पत्नीचा गळा आवळून जीव घेतला. पण त्या नंतर त्याने जे केल ते मात्र धक्कादायक होत. कारण त्याने स्वतःच्या बायकोचा मृतदेह हा खोल खड्डड्यात फेकून दिला. ज्यावेळी पोलिसांनी तपास केला तेव्हा हे सत्य बाहेर आल आहे. तुम्ही विचार पण करणार नाहीत एवढ भयानक कट त्याने रचला आहे. आपल्या पत्नीचा मृतदेह कारच्या डिक्कीत ठेवला आणि जवळपास घरापासून दूर ६० किलोमीटर खोल खड्ड्यात फेकून दिला. रात्रीच्या १ वाजता त्याने गाडीत घालून मृतदेह फेकून दिला. सॅम जॉर्ज ( वय ५९ ) अस आरोपी पतीच नाव आहे. जेसी सॅम ( वय ५० ) अस महिलेचं नाव आहे.
सॅमची इराणी महिलेसोबत संबंध ?
सॅमला एका विद्यापीठात इराणी महिलेसोबत पाहील गेल. जी एम जी विद्यापीठात ती योगाच शिक्षण घेत आहे. तिला या घटनेची कोणतीही माहिती नव्हती. तिला सॅमने विद्यापीठात शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी मदत केल्याचीही माहिती आहे. तिने या प्रकरणात महत्वाचे पुरावे पण पोलिसाना दिले आहेत.
सॅमने गुन्हा केला कबूल
सॅमला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर सखोल चौकशी केली. चौकशी करून त्याने हो मोबाईल खोल पाण्यात फेकून दिला होता. तो मोबाईल पोलिसांना मिळाला आहे. पोलीस तपासात त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. मात्र सॅमने स्वतःच्या बायकोला मारण्याचा का प्लान केला हे अजूनही बाहेर आलेल नाही. ते आता पोलीस तपासात बाहेर येईल. सॅमचे इराणी महिलेसोबत संबंध होते की मैत्री अजून कळू शकल नाही. मात्र या घटनेने केरळ राज्यात सगळीकडे चर्चा सुरू आहे.
ED ची मोठी कारवाई! 17,000 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल अंबानी ग्रुपच्या सीएफओला अटक