नजर चुकवून एटीएममध्ये कार्ड अदलाबदल करून करायचे फसवणूक; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
पुण्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. ब्रेकअपनंतर वैतागलेल्या एका तरुणाने प्रेयसीला लग्नासाठी मानसिक त्रास देत तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ पॉर्न साईटवर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी २४ वर्षीय तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली आहे. आरोपी बॉयफ्रेंडवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारत-पाकिस्तान युद्धदरम्यान तरुणाने Google वर सर्च केलं…, ATS कडून तरुणावर कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी तरुण दोघेही मूळचे कोल्हापूरचे. दोघांमध्ये अनेक वर्षांपासून प्प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या वर्षभरापासून त्यांच्यात काही कारणामुळे मतभेद झाले आणि तरुणीने प्रेमसंबंध तोडले. ब्रेकअपनंतर पीडित तरुणीने आयटी क्षेत्रात नोकरीस सुरुवात केली. ती हातात पुण्यात एका कंपनीत काम करत आहे.
तरुणीने ब्रेकअपकेल्यानंतर आरोपी तरुण सतत फोन आणि मेसेज करून लग्नासाठी सतत त्रास देत होता. पीडित तरुणीने त्याला नकार दिल्यानंतर आरोपीने संतप्त होऊन दोघांचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी दिली. त्याचप्रमाणे तिला सतत अश्लील मेसेज आणि कॉल्स करून मानसिक छळ सुरु केला होता. या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने अखेर अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तरुणावर माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) आणि भारतीय दंड विधानातील कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
ऑन ड्युटी पोलिसाला भरधाव कंटेनरने चिरडले…; वाढदिवसाच्या दिवशी करावे लागले अंत्यसंस्कार