तळेगाव दाभाडे फाटा पुणे मुंबई महामार्गावर ऑन ड्युटी वाहतूक पोलिसाला कंटेनरने चिरडले (फोटो - टीम नवराष्ट्र)
वडगाव मावळ : पुणे मुंबई महामार्गावर वडगाव तळेगाव फाटा चौकात कर्तव्यावर असणाऱ्या एका वाहतूक पोलिसाचा मृत्यू झाला आहे. त्यांना ऑन ड्युटी असताना भरधाव कंटेनरने चिरडले. या अपघातमध्ये वाहतूक पोलिसाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि.13) रात्री 9:40 वा. वडगाव तळेगाव दाभाडे फाटा पुणे मुंबई महामार्गावर घडली. यामुळे वडगाव मावळमध्ये हळहळ व्यक्त केली.
वाहतूक पोलीस मिथुन वसंत धेंडे (वय 49) रा. उरुळी कांचन पुणे सध्या वडगाव पोलीस स्टेशन ता.मावळ जि.पुणे असे अपघातात मृत्यू झालेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. वडगाव मावळ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई बाजू कडून चाकणकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनर चालकाने वाहतूक नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसाला चिरडले. यात वाहतूक पोलीस मिथुन धेंडे यांचा जागीच मृत्यू झाला. कंटेनर चालक चाकण बाजूला वेगाने निघून गेला. कंटेनर चालक हा कार्ला फाटा येथून धोकादायक भरधाव वाहन चालवत असतानाचा, एका तरुणाने व्हिडिओ काढला. पोलिसांना माहिती दिली. पुणे ग्रामीण कंट्रोल वरून कंटेनर थांबविण्याचे आदेश झाल्याने कंटेनर थांबवत असताना, भरभाव वेगाने वाहतूक पोलिसांना चिरडले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या अपघाताचा तपास वडगाव मावळ पोलीस करत आहे.१४ मे रोजी धेंडे यांचा वाढदिवस होता. या अपघाती निधनाने वडगाव मावळमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. यामुळे रात्रीच्या वेळी वाहतूक नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिथुन धेंडे यांचा बुधवारी (14 मे) वाढदिवस होता. त्यांच्या कुटुंबीय आणि मित्र परिवाराने त्यांच्या वाढदिवसाचे नियोजन केले होते. मात्र वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांच्यावर काळाने घाला घातला. वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याने मित्र परिवाराकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. धेंडे यांच्यावर त्यांच्या मूळ गावी उरुळी कांचन येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वडगाव मावळ भागातील औद्योगिक क्षेत्रातील असलेल्या नवलाख उंब्रे हद्दीतील डोंगरावर सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या चौघांवर मधमाश्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि.६ मे) सकाळी घडली. हनुमंत बबूशा कोयते (44) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दत्ता कडलक, लक्ष्मण कदम, एकनाथ धायबर (सर्व रा. नवलाख उंबरे, ता. मावळ) अशी जखमींची नावे आहेत.तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवलाख उंब्रे हद्दीतील डोंगरावर दररोज स्थानिक नागरिक मॉर्निंग वॉक सकाळी फिरण्यासाठी जातात. मंगळवारी सकाळी हनुमंत कोयते, दत्ता कडलक, लक्ष्मण कदम, एकनाथ धायबर हे चौघेजण मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. डोंगर चढत असताना डोंगरमधील तामकडा येथे अचानक चौघांवर मधमाश्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात हनुमंत कोयते यांचा मृत्यू झाला. तर तिघेजण जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.