ATS ( फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA)
भारताने ‘ऑपेरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानचे तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी टाळ्यांचा यशस्वीपणे नायनाट करण्यात आला. यांनतर देखील पाकिस्तानने आपल्या कुरापती सुरूच ठेवल्या. मात्र प्रत्येकवेळी भारताने अधिक आक्रमक आणि ठाम प्रतिसाद देत पाकिस्तानला माघारी हटवले. आता भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. मात्र याकाळात मालेगावमध्ये झालेल्या संशयास्पद इंटरनेट अॅक्टिव्हिटीमुळे खळबळ उडाली आहे. दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि सायबर सेलच्या संयुक्त कारवाईत एका 45 वर्षीय यंत्रमाग मालक तरुणाला पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची सुमारे सहा तास कसून चौकशी करण्यात आली आहे.
काल मंगळवारी (दि. 13 मे) सकाळपासूनच एटीएस पथकातील एक वरिष्ठ अधिकारी आणि तीन कर्मचारी मालेगाव शहरात गुप्तपणे कार्यरत होते. सायबर सेलकडून मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आझादनगर पोलीस ठाणे हद्दीतील गुरुवार वॉर्ड परिसरातील घरावर छापा टाकून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले.
इसमाची कसून चौकशी
चौकशी दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये काही संशयास्पद वेबसाईट सर्च केल्याचे निष्पन्न झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समजले. यामध्ये काही वेबसाईट्स पाकिस्तानमधील असल्याचा संशय असून ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे पाकिस्तानमधील कोणत्या व्यक्तींसोबत संपर्क आहेत का? या बाबत चौकशी केली जात आहे.