बँकेतून पैसे काढले अन् बाजारात भामट्यांनी डाव साधला! (Photo Credit - AI)
लुबाळ यांनी खरेदी केलेली वस्तु पिशवीत ठेवण्यासाठी पिशवी उघडली असता पिशवीला कटर मारल्याने ती फाटल्याचे त्यांच्या लक्षात आले, त्यांनी त्वरित पिशवीतील इतर वस्तुंच्या खाली ठेवलेली रोकड तपासुन पाहिली असता नेमकी रोकडच पिशवीतुन गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांना अक्षरशा रडु कोसळले, त्यांची पैसे गेल्याने होत असलेली घालमेल नेमकी बाजारात उभे असलेल्या सामाजिक कार्यकर्ते धनाजी शिंदे यांनी पाहिली त्यांना सदर इसम ओळखीचा वाटल्याने त्यांनी त्याला जवळ बोलावुन त्यांची आस्थेवाईक चौकशी केली असता लुबाळ यांनी फाटलेली पिशवी दाखवत घडला प्रकार कथित केला.
Satara News: अर्जांच्या पाठपुराव्याला पालकमंत्री कार्यालयाचा वेग; वर्षभरात १,२३६ प्रकरणे मार्गी
लुबाळ यांनी शेतीकामासाठी कर्ज काढले होते, मात्र कर्जाची रक्कम त्यांच्या कामी येण्यापुर्वीच चोरट्यांनी लांबवल्याने बुडत्याचा पाय अधिक खोलात अशी अवस्था त्यांची झाली आहे. लुबाळ यांच्यावर बेतलेला प्रसंग ऐकुन शिंदे यांनी त्यांना पोलीस स्टेशन ला जाण्याचा सल्ला देत पोलीस स्टेशनला फोन करुन त्यांची फिर्याद नोंद करुन घेण्याची विनंती अधिकार्यांना करीत बाजारात पोलीस तैनात करण्याच्या सुचना ही दिल्या शिंदे यांच्या फोनमुळे पोलीस स्टेशन चे कर्मचारी बाजारात आले खरे मात्र तोवर चोरट्यांनी डाव साधला होता.
म्हसवड शहराचा अठवडी बाजार हा माण तालुक्यात सर्वात मोठा बाजार असल्याने या बाजारात वरचेवर अशा चोरीच्या घटना घडत असल्याने पोलीसांनी यादिवशी येथे पोलीस गस्त सुरु ठेवावी अशी जोरदार मागणी म्हसवडकर जनतेतुन होत आहे.
दरम्यान लुबाळ यांनी पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली असुन पोलीस तपास सुरु आहे.
अंकुश लुबाळ हे सामान्य शेतकरी असल्याने त्यांचा पेहराव पाहुनच चोरट्यांनी त्यांना टार्गेट केले असण्याची शक्यता असुन त्यांच्यावर पाळत ठेवुन त्यांचा बँकेपासुनच चोरट्यांनी पाठलाग करुन संधी मिळताच डाव साधला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





