Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: मंगेशकर रुग्णालयाच्या बेफिकरीमुळे गर्भवतीचा मृत्यू; बावनकुळे म्हणाले, “… ही तर मुघलशाही”

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने रुग्णाच्या उपचारासाठी १० लाख रुपयांची मागणी केली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 04, 2025 | 02:10 PM
Pune News: मंगेशकर रुग्णालयाच्या बेफिकरीमुळे गर्भवतीचा मृत्यू; बावनकुळे म्हणाले, "... ही तर मुघलशाही"

Pune News: मंगेशकर रुग्णालयाच्या बेफिकरीमुळे गर्भवतीचा मृत्यू; बावनकुळे म्हणाले, "... ही तर मुघलशाही"

Follow Us
Follow Us:

पुणे: शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने रुग्णाच्या उपचारासाठी १० लाख रुपयांची मागणी केली होती. महिलेला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्यानंतर रुग्णाकडे उपचारांसाठी दहा लाखांची मागणी केली होती. हातात असलेले अडीच लाख भरायला तयार असतानाही प्रशासन महिलेला दाखल करण्यास तयार नव्हते. दरम्यान आता यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मंगेशकर रूग्णालायतील प्रकरणावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “कालच्या प्रकरणानंतर आंदोलन करणे हा सर्वांचा अधिकार आहे. कालच जो प्रकार घडला त्यांनंतर सरकार रूग्णालयावर कारवाई करेल. मुजोरी करणे ही मुघलशाही आहे. मात्र या प्रकरणात नेमकी काय चूक झाली आहे ते सरकार तपासणार आहे.”

पुढे बोलताना मंत्री बावनकुळे म्हणाले, “सर्वसामान्य नागरिकांना उपचार मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. या प्रकरणातील जबाबदार व्यक्तीला आम्ही सोडणार नाही. कोणालाही या प्रकरणात माफ केले जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. माझे जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही हे मी सांगतो. शंभर टक्के कारवाई होणारच, हे मी संजय राऊत यांना सांगतो.”

भाजप आमदाराच्या ‘पीए’लाच फटका, गर्भवतीचा मृत्यू

 

सुशांत भिसे हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहतात. त्यांची पत्नी मोनाली या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या.  दरम्यान अचानक रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्या तत्काळ जवळ असलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी गेल्या होत्या. परंतु, त्यांना क्रिटीकल परिस्थिती असून, डिपॉझिट म्हणून १० लाख रुपये भरा असे सांगितले. तरच पुढील प्रक्रिया सुरू करू म्हणून उपचारासाठी दाखलकरून घेतले नाही. त्यांनी ३ लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली. नंतर मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून रुग्णालय प्रशासनाला संपर्क देखील करण्यात आला.

मात्र, तरीही रुग्णालय प्रशासनाने याबाबत काहीही पावले उचलली नाही. सकाळी ९ वाजता आलेली महिला दुपारी दोनपर्यंत त्याच ठिकाणी होती, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. नंतर महिला अतिरक्तस्त्राव होत असल्याने वाकड येथील एका रुग्णालयात दाखल झाली. त्याठिकाणी उपचार सुरू झाल्यानंतर महिलेला दोन जुळ्या मुली झाल्या. परंतु, मोनाली यांचा मृत्यू झाला.

दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची आडमुठी भूमिका; भाजप आमदाराच्या ‘पीए’लाच फटका, गर्भवतीचा मृत्यू

दरम्यान, गुरूवारी याबाबत आमदार अमित गोरखे यांनी माध्यमांशी संवाद साधत दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या या कारभाराबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी अश्या अनेक तक्रारी माझ्याकडे आलेल्या असल्याचे सांगितले. त्यांनी हा गंभीर गुन्हा केला असून, त्याबाबत अधिवेशनात हा प्रश्न मांडणार असून, मुख्यमंत्र्यांना कडक कारवाईबाबत मागणी करणार असल्याचे म्हटले आहे. हे रुग्णालय ट्रस्ट म्हणून गरिबांसाठी आहे. परंतु, त्यांच्याकडून असे होत आहे.

 

Web Title: Minister chandrashekhar bawankule said take action against mangeshkar hospital about pregnant women death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 02:07 PM

Topics:  

  • Chandrasekhar Bawankule
  • crime news
  • Hospital News
  • Pune

संबंधित बातम्या

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
1

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
2

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
3

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम
4

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.