crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
नाशिकमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. यात अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एकावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
समोर आलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची संतापजनक घटना नाशिकमध्ये घडल्याचे समोर आले आहे. यात अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर या नराधमाने लग्नास नकार दिला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने याबाबत तक्रार दिली आहे. ज्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीवर नाशिकच्या उपनगर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या दिपककुमार रमेशकुमार पाल असे या संशयिताचे नाव आहे. संशयित दिपककुमार पालने २०२४ पासून मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तसेच लग्नाचे आमिष देत ती घरी एकटी असतांना तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. मुलीने लग्नाबाबत विचारले असता संशयित टाळाटाळ करत असल्याने मुलीने भेटण्यास नकार दिला. संशयिताने मुलीसह तिच्या आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देत तिच्याशी आठ वेळा संबंध ठेवले. यातून ती गरोदर राहिली. संशयिताने लग्नास नकार दिलाय. याप्रकरणी पोलीस अधिक तपास पोलिस करीत आहेत.
कर्करोग झाला म्हणून प्रेयसी सोडून गेली, बदला घेण्यासाठी प्रियकर चेतनने रचला घातक कट
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, वरुषिता आणि चेतन प्रेमसंबंधात होते. चेतन एका मल्टी-नेटवर्किंग फर्ममध्ये काम करत होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघेही मित्र बनले. चेतनने वरुषिताला नोकरी मिळवून देण्याचे आश्वासनही दिले. पण अचानक चेतनला कर्करोग झाल्याचे निदान झाले. कर्करोगाने त्यांच्या नात्यात अंतर निर्माण करायला सुरुवात केली. वरुषिता दुसऱ्या मुलाशी संबंध सुरू केले. चेतनला याचा खूप राग आला.
वरुषिता दुसऱ्या मुलाशी संबंधात होती आणि अचानक कळले की ती ८ महिन्यांची गर्भवती आहे. वरुषिता यांच्या कुटुंबाने त्यांना चेतनशी लग्न करण्यास सांगितले. वरुषिता यांच्या काकूंनी त्यांना चेतनशी लग्न करण्यास सांगितले, परंतु चेतन सहमत झाला नाही आणि त्याऐवजी त्यांनी वरुषिता यांना मारण्याचा कट रचला.
१७ ऑगस्ट रोजी वरुषिता गर्भवती असल्याचे कळल्यापासून चेतन एक भयानक कट रचण्यात व्यस्त होता. त्याने वरुषिता यांना गोनारजवळील एका निर्जन ठिकाणी बोलावले. दोघांमध्ये वाद झाला आणि चेतनने तिचा गळा दाबला. तो आधीच सोबत पेट्रोल घेऊन आला होता. त्याने वरुषिताचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. मंगळवारी तेथून जाणाऱ्या दोन लोकांना अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
Crime News : टोळक्याकडून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न; डोक्यात दगड घातला अन्…