बीड: बीड जिल्ह्यातील शहरालगत असलेल्या पालवान गावात एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. शिवसेनेच्या एका नेत्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. मध्यरात्री मदत मागण्याच्या बहाण्याने त्यांना घराबाहेर बोलावण्यात आले आणि मग दबा धरून असलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. शिवसेनेच्या वैधकीय मदत कक्षाचे बीड समन्वयक विलास भारत मस्के (वय ३२) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आर्थिक व्यवहारातून व्यावसायिक भागीदारानेच हा हल्ला घडवून आणल्याचा संशय म्हस्के यांनी व्यक्त केला आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी विलास मस्के रात्रीच्या सुमारास आपल्या घरामध्ये झोपलेले होते. मध्यरात्री त्यांच्या घराचा दरवाजा कुणीतरी वाजवला. यावेळी विलास मस्के यांच्या बहिणीने दार उघडले, तेव्हा यावेळी मस्के यांच्या बहिणीने दार उघडले असता, एका अनोळखी व्यक्तीने ‘गाडीतील पेट्रोल संपले आहे, पेट्रोल हवे आहे,’ असे सांगितले. अपरात्री एक अनोळखी व्यक्ती मदत मागत असल्याने विलास मस्के बाहेर आले. ते बाहेर येताच दबा धरून बसलेल्या अन्य चार ते पाच जणांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी डोक्यावर व हातावर वार केल्याने म्हस्के गंभीर जखमी झाले.
या प्रकरणी विलास मस्के यांनी आपल्या व्यावसायिक भागीदारावर संशय व्यक्त केला आहे. आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातूनच हा हल्ला घडवून आणल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पोलिसांचीही म्हणणे आहे. हल्ल्यात सामील असलेले पाच अनोळखी जण अद्याप फरार आहेत. विलास म्हस्के यांच्या तक्रारीवरून व्यावसायिक भागीदारासह पाच अनोळखी हल्लेखोरांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत असून आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीने रोखली बंदूक, पोलिसांकडून गोळीबार
नांदेड शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नांदेड शहरातील पोलीस आणि आरोपीमध्ये रात्रीच्या सुमारास गोळीबार झाल्याचं समोर आलं आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस गेले असता तेव्हा गुन्हेगाराने चक्क पोलिसांवर रिवाल्वर रोखली. पोलिसांनी देखील त्याला प्रत्युत्तर देत गोळीबार केला. यात आरोपी पसार झाला आहे. नांदेड शहरातील कौठा भागात हा थरार घडला आहे.