अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्व परिसरात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेचे संपूर्ण कल्याण शहर हादरुन गेलं होतं. मात्र आता याची पुनरावृत्ती होताना दिसत आहे.
कल्याण पश्चिम येथील खडकपाडा परिसरात काळू नदीच्या किनारी शुटींग सुरु होते. शूटींग पाहण्यासाठी गेलेल्या एका 11 वर्षांच्या मुलीवर 21 वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केले आहेत. शूटींग पाहण्यासाठी आलेल्य़ा मुलीला किराणा मालाच्या दुकानदाराने दुकानात बोलावलं. त्यानंतर या दुकान मालकाने तिला रात्रभर डांबून ठेवलं. आरोपीने रात्रभर या मुलीवर लैंगिक अत्याचार केले.
पिडीत मुलगी जेव्हा दुसऱ्य़ा दिवशी घरी परतली तेव्हा तिने तिच्या आईला तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. यानंतर पिडीतेच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. मुलीवर लैगिंक अत्याचार करणारा आरोपी गणेश म्हात्रे (२१)या अटक केली आहे.
काळू नदीच्या आसपास राहणारी या पिडित मुलीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. आई भाजीपाला विकून उदर निर्वाह करते. सोमवारी संध्याकाळी मुलगी मैत्रीणीकडे जाऊन येते असं सांगून मुलगी घरातून बाहेर पडली ते घरी आलीच नाही. त्यानंतर सगळीकडे तिची शोधाशोध करण्यात आली. दुसऱ्या मुलगी घरी आल्यावर पालकांनी तिची चौकशी केली. तेव्ही तिने तिच्या पालकांना सांगितले की, काळू नदी किनारी शूटींग सुरु होते. ते पाहण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी किराणा मालाचे दुकान आहे.
दुकानदार गणेश म्हात्रे यांनी पिडीत मुलीला दुकानाजवळ थांबायला सांगितले. ती थांबायला तयार नव्हती. त्याने तिला जबरदस्ती करुन दुकानाच्या आत घेतले. दुकानाचे शटर लावू तिला कोंडून ठेवले. आरडाओरडा करशील तर तुझी बदनामी होईल. त्याचबरोबर कोणाला काही सांगितले तर तुला मारु टाकेन अशी धमकी देत तिच्यावर दोन वेळा लैगिंक अत्याचार केला. मुलीच्या पालकांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी गणेश म्हात्रे याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.