Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayander Crime : MD ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 13.61 कोटींचा मुद्देमाल जप्त, 10आरोपी अटकेत

Mira Bhayander Crime : परिसरात व्यावसायिक स्वरूपात MD ड्रग्सची खरेदी-विक्री करणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-4 ला यश आले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 11, 2026 | 07:01 PM
Mira Bhayander Crime : MD ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 13.61 कोटींचा मुद्देमाल जप्त, 10आरोपी अटकेत
Follow Us
Follow Us:
  • MD ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश
  • 13.61 कोटींचा मुद्देमाल जप्त, 10आरोपी अटकेत
मिरा रोड/ विजय काते: परिसरात व्यावसायिक स्वरूपात MD ड्रग्सची खरेदी-विक्री करणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-4 ला यश आले आहे. या कारवाईत आतापर्यंत तब्बल 6 किलो 773 ग्रॅम वजनाचा अंदाजे 13कोटी 61 लाख 38 हजार 480 रुपयांचा एमडी अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारे 3.05 वाजण्याच्या सुमारास नयानगर, मिरा रोड पूर्व येथील छेडा आदर्श बिल्डिंग परिसरातील एका घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान श्रीमती फिरदोस अरबाज कुरेशी यांच्या घरातून 1 किलो 324 ग्रॅम वजनाचा अंदाजे 2 कोटी 66 लाख 17 हजार280 रुपये किंमतीचा MD ड्रग्स जप्त करण्यात आला. तपासादरम्यान हा अंमली पदार्थ तिचा पती अरबाज वकील कुरेशी याचा असल्याचे निष्पन्न झाले.

ग्रामीण भागात एमडी तयार करण्याचा कट उधळला! वाघोली पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल…

याप्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1995 अंतर्गत कलम 8(क), 21(क), 22(क) आणि 29प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पुढे नेत गुन्हे प्रकटीकरण शाखेने मुंबई, मिरा रोड आणि गुजरात येथून एकामागोमाग एक अशा एकूण 10 आरोपींना अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अरबाज कुरेशी, मोईज खान, अरमान राईन, सुनिल यादव, मोहम्मद वसिम शेख, इरफान कुडीया, मोहम्मद अराफत अन्सारी, खालदा अन्सारी आणि आकाश यादव यांचा समावेश आहे.ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपआयुक्त संदीप डोईफोडे आणि सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-4 चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख आणि त्यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई यशस्वी केली.मीरा भाईंदर परिसर दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याचं विदारक दृश्य पाहायला मिळत आहे. राजरोजपणे परिसरात अमली पदार्थांची विक्री होत असते. कित्येक वेळा नयानगर पोलीस ठाण्यात याप्रकणाबाबत गुन्ह्याची नोंद झाली आहे. मात्र एवढं होऊनही गैर प्रकार करणाऱ्य़ांना कायद्याचा धाक राहिलेला नाही.

Jalgaon Crime: इन्स्टाग्रामवरील प्रेमासाठी बांगलादेशातून थेट जळगावात आली तरुणी; तरुण-तरुणीवर गुन्हा दाखल

 

 

Web Title: Mira bhayander crime md drugs racket busted rs 1361 crore worth of goods seized 10 accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 07:01 PM

Topics:  

  • crime news
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.