Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayander : रक्षक होतायत भक्षक ! वाहतूक पोलिसांकडूनच हप्त्याची मागणी; वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह एपीआयवर गुन्हा

मिरा रोड परिसरात कार्यरत असलेल्या एका महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याकडे दरमहा ठराविक रक्कम (हप्ता) देण्याची मागणी केल्याप्रकरणीवरिष्ठ पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 31, 2026 | 01:46 PM
Mira Bhayander : रक्षक होतायत भक्षक ! वाहतूक पोलिसांकडूनच हप्त्याची मागणी; वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह एपीआयवर गुन्हा
Follow Us
Follow Us:
  • वाहतूक पोलिसांकडूनच हप्त्याची मागणी;
  • वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह एपीआयवर गुन्हा
भाईंदर/ विजय काते: मिरा-भाईंदर शहरातील वाहतूक व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. मिरा रोड परिसरात कार्यरत असलेल्या एका महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याकडे दरमहा ठराविक रक्कम (हप्ता) देण्याची मागणी केल्याप्रकरणी काशिमीरा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर इंगोले आणि त्यांच्या सहायक पोलीस निरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील वाहतूक नियंत्रण सुरळीत ठेवण्यासाठी काशिमीरा वाहतूक शाखा कार्यरत असून विविध चौकांमध्ये शंभरहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात आहेत. हे कर्मचारी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करून शासनाच्या महसुलात भर घालतात. मात्र, काही ठिकाणी नियमभंग करणाऱ्यांकडून रोख रक्कम घेऊन कारवाई टाळल्याच्या तक्रारी अधूनमधून समोर येत असतात.दरम्यान, एका महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याकडूनच वरिष्ठांकडून मासिक हप्त्याची मागणी होत असल्याचा गंभीर आरोप पुढे आला. संबंधित महिलेने यासंदर्भात पुरावे गोळा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) लेखी तक्रार दाखल केली होती.

Kolhapur Crime: 20 गुंठे जमिनीच्या वादातून भावाचा संताप अनावर; वडील आणि भावाची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या

या तक्रारीची दखल घेत पोलीस आयुक्तालयाने सहायक पोलीस आयुक्त दयानंद सावंत यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. प्राथमिक चौकशीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर इंगोले यांनी पैशांची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सावंत यांनी सविस्तर अहवाल सादर केला. त्यानुसार काशिमीरा पोलीस ठाण्यात संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली.

कामकाजावर प्रश्नचिन्ह, ‘हप्ता’ पद्धतीचा आरोप
या प्रकरणामुळे वाहतूक पोलिसांच्या कामकाजावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. संबंधित महिला कर्मचाऱ्याने आपल्या तक्रारीत इतर काही कर्मचारीही वरिष्ठांना दरमहा ठराविक रक्कम देत असल्याचा उल्लेख केला आहे. ही ‘हप्ता’ पद्धत नवीन नसून पूर्वीपासून सुरू असल्याचा दावा देखील तिने केला आहे. आपण ही रक्कम देण्यास नकार दिल्यामुळेच आपल्यावर दबाव टाकण्यात आला, असेही महिलेने नमूद केले आहे.या घटनेमुळे पोलीस दलातील अंतर्गत शिस्त, पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा रंगली असून पुढील चौकशीत आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Mumbai Crime: नालासोपाऱ्यात धक्कादायक घटना! पोत्यात सापडला शिरविरहित मृतदेह; टॅटूमुळे ओळख पटली

Web Title: Mira bhayander traffic police demand installments case filed against api along with senior police inspector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • Bhayander
  • crime news
  • Mira Road

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.