शहराच्या माजी आमदार आणि माजी महापौर गीता जैन यांच्या विरोधात ठाणे न्यायालयाने सरकारी कामात अडथळा आणणे आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.
भाईंदर पश्चिमेतील जागृत देवस्थान म्हणून धारावी देवी मंदिराची ख्याती आहे. नवरात्रोत्सवात मोठ्या श्रद्धेने, आणि भक्ती भावाने भाविक देवीच्या दर्शनाला येतात.
मोदी पटेल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे पन्नासावे वर्ष असल्याने उत्सव मोठ्या उत्साहात आणि धामधुमीत साजरा करण्यात आला. मिरवणुकीदरम्यान रस्त्याच्या नाक्यावर झाडावर बांधलेल्या विद्युत तारेला हात लागून मृत्यू झाला.
भाईंदरमधील मच्छीमारांच्या म्हणण्यानुसार बाजारात ओल्या बोंबिलांना मागणी जास्त होती. ओल्या बोंबीलची अधिक विक्री झाल्याने सुक्या मासळीकडे दुर्लक्ष झालं आहे.
भाईंदर पूर्वमधील इंद्रलोक परिसरात आज दुपारी एक गंभीर घटना घडली. तपोवन शाळेच्या मागील भागात एका खाजगी बिल्डरकडून सुरू असलेल्या पायलिंगच्या कामादरम्यान अचानक जमीन खचली आणि संपूर्ण रस्ता ढासळला.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उभारलेला भाईंदर पाडा उड्डाण पुल वाहतूकीसाठी खुला करण्यात आला असून या पुलामुळे घोडबंदर मार्गावरील प्रवास काहीसा वेगवान झाला आहे.