Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Road Crime : मीरा रोड चाकू हल्ला प्रकरणाला दहशतवादाचा अँगल? ATS तपासात धक्कादायक माहिती उघड

मीरा रोड येथील चाकू हल्ला प्रकरणात दहशतवादाचा अँगल समोर येत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. ATS च्या तपासात काही धक्कादायक माहिती उघडकीस आली असून प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 29, 2026 | 06:35 PM
मीरा रोड चाकू हल्ला प्रकरणाला दहशतवादाचा अँगल? ATS तपासात धक्कादायक माहिती उघड

मीरा रोड चाकू हल्ला प्रकरणाला दहशतवादाचा अँगल? ATS तपासात धक्कादायक माहिती उघड

Follow Us
Follow Us:
  • मीरा रोड चाकू हल्ला प्रकरणाला दहशतवादाचा अँगल?
  • ATS तपासात धक्कादायक माहिती उघड
  • डेटा नष्ट करण्याचा असल्याचा संशय व्यक्त
भाईंदर : मीरा रोडच्या नया नगर परिसरात दोन सिक्युरिटी गार्डवर झालेल्या चाकू हल्ल्याच्या प्रकरणात तपासाला गंभीर वळण मिळाले असून, दहशतवादविरोधी पथक (ATS) तपासात काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी जैब जुबेर अन्सारी याने तपास यंत्रणांपासून पुरावे लपवण्यासाठी स्वतःचा मोबाईल फॉरमॅट केल्याची माहिती ATS च्या सूत्रांकडून मिळाली आहे. यामागचा उद्देश फोनमधील महत्वाची माहिती व डेटा नष्ट करण्याचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

तसेच, आरोपीने वापरलेला दुसरा मोबाईल फोन कुठेतरी फेकून दिल्याचेही तपासात निष्पन्न झाले असून, त्या मोबाईलचा शोध ATSकडून सुरू आहे. या फोनमधून अधिक महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Pune Crime News: पर्यटन व्हिसावर येऊन ख्रिश्चन धर्माचा प्रसार; कॅब चालकाच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांकडून देश सोडण्याचे आदेश

दरम्यान, आरोपीच्या घराची झडती घेतली असता ATSला एक हस्तलिखित पत्र सापडले आहे. या पत्रातील मजकूर अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून, त्यामध्ये आरोपीने ISIS या दहशतवादी संघटनेप्रती निष्ठा (बैअत) व्यक्त केल्याचे नमूद केले आहे.
याच पत्रामध्ये “लोन वुल्फ हल्ल्यां”चा उल्लेख करत भविष्यातील संभाव्य हल्ल्यांचे संकेत दिल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. तसेच, ‘बिलाद अल-हिंदमध्ये खरा जिहाद पाहायला मिळेल’ अशा स्वरूपाचे विधानही या पत्रात आढळले आहे. युवकांना इस्लामिक स्टेटमध्ये सामील होण्याचे आवाहन केल्याचेही यात नमूद असल्याची माहिती आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर, हा हल्ला केवळ व्यक्तिगत कारणातून झाला की त्यामागे कोणताही मोठा कट किंवा दहशतवादी प्रेरणा आहे का, याचा सखोल तपास ATSकडून सुरू आहे. दरम्यान, जखमी सिक्युरिटी गार्डवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे मीरा रोड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणाचा तपास पुढे जात असताना आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Jharkhand Crime: धक्कादायक! नवरदेवाने दिला गॉगल घालायला नकार, मामा चिडला आणि…; नेमक काय घडल?

Web Title: Mira road knife attack terror angle ats investigation shocking details news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 06:35 PM

Topics:  

  • ats
  • crime
  • Mira Road

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.