Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बार्शी हादरली! 14 महिन्याच्या लेकराला विष पाजून आईने घेतला गळफास

२५ वर्षीय विवाहितेने आपल्या चिमुकल्या १४ महिन्यांच्या बाळाला आधी विष पाजले. त्यानंतर स्वत: घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 10, 2025 | 12:56 PM
बार्शी हादरली! 14 महिन्याच्या लेकराला विष पाजून आईने घेतला गळफास

बार्शी हादरली! 14 महिन्याच्या लेकराला विष पाजून आईने घेतला गळफास

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यासह देशभरात आत्महत्येच्या घटना वाढल्या
  • लेकराला विष पाजून आईने घेतला गळफास
  • बार्शीतील धक्कादायक घटना
बार्शी : राज्यासह देशभरात आत्महत्येच्या घटना वाढल्या आहे. दररोज वेगवेगळ्या भागात कोणीतरी आत्महत्या केल्याचे उघडकीस येत आहे. अशातच आता सोलापूर जिल्ह्यातीतील बार्शीतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाणी प्लॉट परिसरात २५ वर्षीय विवाहितेने आपल्या चिमुकल्या १४ महिन्यांच्या बाळाला आधी विष पाजले. त्यानंतर स्वत: घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुलाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळाले असून, त्याची प्रकृती सध्या गंभीर आहे. मृत महिलेचे नाव अंकिता वैभव उकिरडे (वय २५) असे आहे. तर तिच्या मुलाचे नाव अन्विक वैभव उकिरडे (वय १४ महिने) असे आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ७) सकाळी उघडकीस आली आहे.

अंकिताचे चार वर्षांपूर्वी वैभव विकास उकिरडे याच्यासोबत लग्न झाले होते. घटनेच्या दिवशी घरातील सर्व सदस्य कामानिमित्त बाहेर गेले होते. अंकिता ही मुलासह घरात एकटीच होती. नेहमीप्रमाणे घरकामासाठी आलेल्या महिलेने घरात कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने खिडकीतून पाहिले असता, अंकिताने गळफास घेतलेले धक्कादायक दृश्य तिला दिसले. तर, लहान अन्विक बाजूला अत्यवस्थ अवस्थेत पडलेला होता. महिलेने आरडाओरडा करून नातेवाईक व शेजाऱ्यांना बोलावले.

बाळाचा जीव वाचला; मात्र प्रकृती गंभीर

अन्विकला तातडीने बार्शीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर सध्या त्याला पुढील उपचारांसाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. त्याची स्थिती गंभीर असून उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

अंकिताने टोकाचे पाऊल का उचलले?

अंकिता हिने आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक व मानसिक ताणतणावांच्या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत. नुकतीच बार्शी शहरात एका विवाहितेची विवाहबाह्य संबंधांच्या मुद्द्यावरून हत्या झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बार्शी शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

Web Title: Mother commits suicide by poisoning her young child

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 12:55 PM

Topics:  

  • Barshi Police
  • crime news
  • Sucide News

संबंधित बातम्या

कारवाईचा थरार! 5 कोटींच्या खंडणीची मागणी अन्…; कराड पोलिसांनी 5 आरोपींना थेट…
1

कारवाईचा थरार! 5 कोटींच्या खंडणीची मागणी अन्…; कराड पोलिसांनी 5 आरोपींना थेट…

Crime News: ‘डिजिटल अरेस्ट’ करून गृहिणीला २५ लाखांचा गंडा; मुंबई पोलीस आणि ईडी अधिकारी असल्याचा बनाव
2

Crime News: ‘डिजिटल अरेस्ट’ करून गृहिणीला २५ लाखांचा गंडा; मुंबई पोलीस आणि ईडी अधिकारी असल्याचा बनाव

Waluj MIDC Fraud Case: वाळूज एमआयडीसीत मोठी फसवणूक! पाईप सप्लायरला ९१ लाखांचा गंडा; पुण्यातील उद्योजक पती-पत्नीवर गुन्हा दाखल
3

Waluj MIDC Fraud Case: वाळूज एमआयडीसीत मोठी फसवणूक! पाईप सप्लायरला ९१ लाखांचा गंडा; पुण्यातील उद्योजक पती-पत्नीवर गुन्हा दाखल

अडीच हजारांची लाच घेणं भोवलं; आरटीओ अधिकाऱ्यासह दोघांना रंगेहात पकडले
4

अडीच हजारांची लाच घेणं भोवलं; आरटीओ अधिकाऱ्यासह दोघांना रंगेहात पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.