Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime : प्रेमात अंधळी आई…! लेकीच्या बॉयफ्रेंडला बघताच झाली वेडीपिसी, मास्टर प्लॅन बनवला अन् केला भयानक गुन्हा!

एका जन्मदाता आईच लेकीच्या बॉयफ्रेंडच्या प्रेमात अंधळी झाल्याचे समोर आलं आहे. आईचे तिच्याच मुलीच्या प्रियकराशी संबंध होते. पुढे जे घडले ते धक्कादायक होते. चला जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण काय आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 12, 2025 | 05:07 PM
प्रेमात अंधळी आई...! लेकीच्या बॉयफ्रेंडला बघताच झाली वेडीपिसी, मास्टर प्लॅन बनवला अन् केला भयानक गुन्हा! (फोटो सौजन्य-X)

प्रेमात अंधळी आई...! लेकीच्या बॉयफ्रेंडला बघताच झाली वेडीपिसी, मास्टर प्लॅन बनवला अन् केला भयानक गुन्हा! (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Mumbai Crime News Marathi: ‘आई’ हा शब्द प्रेम, माया आणि आपुलकीचे प्रतीक आहे. ती मुलांच्या सुख-दुःखात सोबत असते, त्यांना चांगले-वाईट शिकवते आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करते. पण मुंबईतून अशी एक घटना समोर येते, ज्यामधून आई आणि लेकीच्या नात्यावरचा विश्वासच उडून जाईल. अशी आई जिचं पोटच्या मुलीच्या प्रियकराशीचं प्रेम संबंध ठेवते. एवढेच नाही तर आई प्रेमात इतकी वेडी झाली की तिने स्वतःच्या घरातून सोन्याचे दागिने चोरले, पण घरातून पळून गेली नाही, तर असा खेळ खेळला की लोकांना सत्य कळल्यावर धक्का बसला.

मुलगी संजीवनी कोमकर अन् वडील बंडू आंदेकर यांच्यातील वाद काय होता? आयुषच्या आईने सगळंच सांगितलं

नेमकं काय आहे प्रकरण?

हे प्रकरण असे आहे की, रमेश धोंडू हळदीवे मुंबईतील गोरेगाव पूर्व येथे त्याच्या कुटुंबासह राहतो. उर्मिला आणि रमेशचे लग्न १८ वर्षांपासून झाले होते. रमेशची पत्नी उर्मिला हिने एके दिवशी तिच्या पतीला सांगितले की तिचे दागिने कपाटातून गायब झाले आहेत. एवढेच नाही तर पत्नीने तिच्याच पतीवर चोरीचा आरोप केला आणि नंतर दिंडोशी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली.

आईचा प्रियकर हा मुलीचा प्रियकर…

दरम्यान, कोणताही बाह्य संशयित नसल्याने पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांच्या कॉल रेकॉर्ड आणि फोन लोकेशनची तपासणी सुरू केली. तपासात असे दिसून आले की उर्मिला सतत दुसऱ्या एका पुरूषाच्या संपर्कात होती. ज्याच्याबरोबर ती घरातून पळून जाण्याचा विचार करत होती. उर्मिलाने १०० ग्रॅमपेक्षा जास्त सोन्याचे दागिने चोरले, ते विकले आणि सुमारे १० लाख रुपये तिच्या प्रियकराच्या खात्यात ट्रान्सफर केले. पण या सर्वांमध्ये सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे उर्मिलाचा प्रियकर दुसरा तिसरा कोणी नसून तिच्या १८ वर्षांच्या मुलीचा प्रियकर होता. ती सतत त्याच्याशी बोलत होती आणि पळून जाण्याचा विचार करत होती.

मुलीच्या प्रियकराने कबूल केले…

सत्य बाहेर आल्यानंतर उर्मिलाच्या मुलीच्या प्रियकराला ताब्यात घेण्यात आले, ज्याने चौकशीदरम्यान कबूल केले की उर्मिलाने त्याला चोरीचे काही दागिने दिले होते. मुलाची चौकशी केली असता, उर्मिलाने चोरीची आणि तिच्या पतीला सोडून जाण्याची तिची योजना कबूल केली. कबुली दिल्यानंतर पोलिसांनी उर्मिलाने ओळखलेल्या दागिन्यांच्या दुकानातून चोरीचे दागिने जप्त केले. उर्मिला आणि तिच्या मुलीच्या प्रियकराला दोघांनाही अटक करण्यात आली आहे. उर्मिलाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आणि तिच्या प्रियकराच्या भूमिकेची अधिक चौकशी सुरू आहे.

Raigad Crime: इंस्टाग्रामवरून ओळख, प्रेम आणि लग्नाचं आमिष; अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यावर नकार

Web Title: Mother fall in love with daughters boyfriend mumbai stole gold from home the shocking thing happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 05:07 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Raigad Crime: इंस्टाग्रामवरून ओळख, प्रेम आणि लग्नाचं आमिष; अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यावर नकार
1

Raigad Crime: इंस्टाग्रामवरून ओळख, प्रेम आणि लग्नाचं आमिष; अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यावर नकार

अजित पवारांनी कॉल केलेल्या गावातील मुरूम उपसा अवैधच; अहवालात गोष्टी उघड
2

अजित पवारांनी कॉल केलेल्या गावातील मुरूम उपसा अवैधच; अहवालात गोष्टी उघड

Bomb threat: दिल्लीनंतर आता मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बची धमकी, संपूर्ण कॅम्पस रिकामा
3

Bomb threat: दिल्लीनंतर आता मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बची धमकी, संपूर्ण कॅम्पस रिकामा

Dhule News: साक्रीतील आश्रमशाळेत आजाराचा कहर, 61 विद्यार्थी आजारी, 12 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू
4

Dhule News: साक्रीतील आश्रमशाळेत आजाराचा कहर, 61 विद्यार्थी आजारी, 12 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.