crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
माढा तालुक्यातील कुर्डू गावात पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांचा अजित पवार यांच्यासोबतचा ऑडियो कॉल व्हायरल झाला होता. त्याला कारण होत गावातील मुरूम उपसा, मुरूम उपसा होत असल्याप्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी गावात जाऊन पाहणी केली होती. पाहणी दरम्यान मुरूम अवैध उपसा होत असल्याचं समोर आल. मात्र पंचनामे करायला अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी अडवणूक केली. सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Bomb threat: दिल्लीनंतर आता मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बची धमकी, संपूर्ण कॅम्पस रिकामा
अजित पवारांचा कॉल व्हायरल झाल्यानंतर गावातील प्रकरण चव्हाट्यावर आल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून अहवाल मागितल होता. त्या नंतर जिल्हाधिकारी यांनी माढा चे तहसीलदार यांना आदेश देत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र आता अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे काय आहे अहवालात पाहूयात.
अहवालात नक्की काय
आता अहवालातच अवैध असल्याचं म्हटल आहे . मात्र गावची बदनामी केली म्हणून आज गावकऱ्यांनी बंद ची हाक दिली होती. अवैध कामांवर कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. अजित पवारांचा झालेला व्हायरल कॉल आणि त्या नंतर गावातील उघडकीस आलेला प्रकार चर्चेत आला. ज्या कार्यकर्त्याने अजित पवारांना कॉल लावून दिला होता त्याचा ही वीडियो व्हायरल झाला होता. मात्र अजित पवारांना अवैध काम असताना चुकीची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांनी दिली अशी चर्चा आहे. आता तहसीलदाराच्या अहवालानंतर काय कारवाई होते ते पाहणे महत्वाचं ठरलं आहे.
‘एकच बैठक’ लावण्यावरून वाद आणि थेट कला केंद्राबाहेर गोळीबार
सोलापूर जिल्ह्यातील माढ्यातील वेणेगाव येथील जय मल्हार कला केंद्राच्या बाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. यात एक जण जखमी झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेत गोळीबार नेमका कोणी केला याची माहिती समोर आलेली नाही आहे.
एकच बैठक लावण्याच्या कारणावरुन हा दोन गटात वाद झाला. याच वादाचे रुपांतर टोकाच्या भांडणात झाले. या भांडणात थेट एका तरुणाच्या डाव्या बाजूच्या मांडीवर गोळीबार करण्यात आला.यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहे.