रायगड : रायगडच्या उरणमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला Instagram वरून ओळख निर्माण करून घेणे महागात पडले आहे. एका १६ वर्षीय मुलासोबत तिची ओळख झाली. नंतर ही ओळख मैत्रीत झाली, नंतर प्रेमसंबंधात निर्माण झाली. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. ती गरोदर राहताच त्या अल्पवयीन मुलाने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
धक्कादायक ! अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मुलाचा जन्मदात्या आईनेच केला खून
नेमकं काय घडलं?
उरण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी आणि मुलगा या दोघांनी आपले शिक्षण अर्धवट सोडले. २०२४ च्या जानेवारीमध्ये दोघांची instagram वर ओळख झाली. त्यांनतर त्यांची ही ओळख मैत्रीत नंतर प्रेमसंबंधात निर्माण झाले. पीडित मुलीच्या आई- वडिलांनी काही महिन्यांपूर्वी याबाबतची माहिती समजली त्यांनी अल्पवयीन मुलाच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयाची भेट घेतली होती. त्यावेळी अल्पवयीन मुलाने पीडित मुली सोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी पिढीत मुलीच्या आई- वडिलांनी मुलीचे वय पूर्ण झाल्यानंतर तिचं लग्न लावून देण्याची तयारी दर्शवली. तो पर्यंत पीडित मुलीला अल्पवयीन मुलाच्या घरी ठेवले होते. ती मुलाच्या घरी वास्तव्यास जातांना पीडित मुलगी गरोदर राहिली. त्यामुळे अल्पवयीन मुलाने व त्याच्या कुटुंबीयांनी पीडित मुली सोबत लग्न करण्यास नकार दिला. तिला घरातून बाहेर हाकलून दिले.
पोलिसांनी गुन्हा नोंदवला
मुलगी आई- वडिलांच्या घरी परत आल्यानंतर तिने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर रसायनी पोलीस ठाण्यात आई वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर अल्पवयीन मुलाविरोधात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी तसेच पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उरण पोलीस करत आहे. उरण पोलीस या प्रकरणातील अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले असून बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे.
समुद्रकिनारी सापडली चरस असलेली गोणी; 55 लाखांचा माल जप्त
अंमली पदार्थांनी भरलेली गोणी अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडल्याने एकत खळबळ उडाली आहे. मुरुड पोलीस ठाणे हद्दीतील काशीद समुद्रकिनारी 55 लाख 74 हजार रुपये किमतीचे 11.148 किलो वजनाचे चरस सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 31 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5:30 च्या सुमारास गुप्त बातमीदाराकडून मुरुड पोलिसांना काशीद समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पद प्लास्टिक गोणी असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे मुरुड पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी खात्री केली असता, त्यांना प्लास्टिक गोणीमध्ये चरस सदृश्य अंमली पदार्थ आढळून आला.
अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं अन् फूस लावून पळवलं; आरोपीवर पोलिसांत गुन्हा दाखल