crime (फोटो सौजन्य: social media )
बीड : बीड जिल्ह्यातील परळी येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. परळी रेल्वे स्थानकात अवघ्या चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (31 ऑगस्ट) रोजी दुपारी घडली आहे. पोलिसांनी आरोपी अटक केली आहे.
Nagpur News :खळबळजनक! शासकीय कंत्राटदाराचे टोकाचे पाऊल; कारण काय? नागपूर येथील घटना
नेमकं काय घडलं?
पंढरपूर येथील एक दाम्पत्य रोजगाराच्या शोधात बीड जिल्ह्यातील परळी येथे आले होते. रेल्वेने परळीत दाखल झाल्यानंतर वडील काही वेळासाठी स्टेशनच्या बाहेर गेले होते. तर आई रेल्वे स्थानक परिसरातच थांबली होती. त्यांच्यासोबत चार वर्षांची चिमुरडीही होती. आईआजारी असल्यामुळे ती रेल्वे स्थानकावरच झोपून गेली. याचीच संधी साधत नराधम व्यक्तीने चिमुकलीला एका जवळील ठिकाणी घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केला.
अत्याचारानंतर पीडित बालिका रडत आईकडे परत आली. आईने विचारपूस केल्यानंतर चिमुलीने घडलेली सगळीबाब सांगितली. चिमुलीच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तक्रार दाखल केली. घटनेनंतर पीडित बालिकेला तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच संभाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, त्यात एक इसम पीडित बालिकेला सोबत नेत्यांना दिसून आला. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत परळी शहरातील बरकत नगर भागातील संशयित आरोपीला अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला आज (1 सप्टेंबर) न्यायालयात हजर केले जाणार आहे. या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.
बडतर्फ पोलीस अधिकार्याने उचलले टोकाचे पाऊल;बीडच्या अंबाजोगाईतील घटना
बीड जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर येत आहे. बडतर्फ पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.ही घटना आंबाजोगाई येथील राहत्या घरात आत्महत्या केले आहे. सर्व कुटुंबीय गौरी-गणपतीच्या सणासाठी नागदरा या गावी गेले होते. त्यावेळेस ते घरात एकटेच होते. त्यांनी रात्री गळफास घेत आत्महत्या केली.
प्रेयसीवर गोळीबार करण्याचा प्रयत्न; तरुणीने केला आरडाओरडा अन्…