नागपूर: नागपूरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. शासकीय कंत्राटदराने गळ्याला दोर लावतात आपले जीवन संपवले. आत्महत्या करणाऱ्या कंत्राटदाराचे नाव पीव्ही वर्मा असे आहे. वेळेत थकीत बिलाची रक्कम न मिळाल्याने त्याने आत्महत्या केल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. जवळपास तीस कोटी रुपयांची त्यांचे थकीत बिल बिल शासनाकडे प्रलंबित होते. त्यामुळे ते आर्थिक संकटात सापडले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंत्राटदार पीव्ही वर्मा यांचे सध्या वर्धा जिल्ह्यातील एमआयडी देवळी येथे काम सुरु होते. या दरम्यान जवळपास तीस कोटी रुपयांची त्यांची थकीत बिल शासनाकडे प्रलंबित होती. त्यामुळे आर्थिक संकटात दोर लावून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी नागपूरच्या राजनगर येथील राहत्या घरी आत्महत्या केली.
कंत्राटदार संघटनेची मागणी काय?
राज्यभरात जवळपास 90 हजार कोटी कंत्राटदाराचे बिल थकीत असून बहुतांश कंत्राटदार आर्थिक संकटात असल्याची प्रतिक्रिया राज्य कंत्राटदार संघटनेच्या एम सरोदे यांनी दिलीय. त्यातूनच हि दुर्दैवी घटना घडल्याचे ते म्हणाले. सोबतच पोलिसांनी आणि शासनाने यात लक्ष घालावे अशी मागणी कंत्राटदार संघटनेकडून करण्यात आली आहे.
खळबळजनक! विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर
आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. तरुणाच्या त्रासामुळे एका विवाहितीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येरवडा भागात घडली आहे. तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणासह त्याच्या पत्नीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याबाबत विवाहित तरुणीच्या आईने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार आरोपी पंकज रवींद्र पाटील, त्याची पत्नी रुपाली (दोघे रा. गोडबोले वस्ती, मांजरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, विवाहापूर्वी आत्महत्या केलेल्या तरुणीची आरोपी पंकज पाटील याच्याशी ओळख झाली होती. दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. विवाहानंतर तरुणीने त्याच्याशी असलेले प्रेमसंबंध तोडले होते. पाटीलने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तरुणीच्या पतीच्या मोबाइल क्रमांकावर पाटीलने तरुणीबरोबर काढलेली छायाचित्रे पाठविली. घटनेनंतर तरुणी मानसिक तणावाखाली होती. पाटील आणि त्याच्या पत्नीच्या त्रासामुळे तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणीच्या आईने याबाबत तक्रार दिल्यानंतर पाटील दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक मिथुन सावंत करत आहेत.
प्रेयसीवर गोळीबार करण्याचा प्रयत्न; तरुणीने केला आरडाओरडा अन्…