गर्भवतीची चिमुकलीसह विहिरीत उडी
West Bengal News In Marathi: देशाच्या वेगवेगळ्या भागांमधून आत्महत्येच्या दररोज बातम्या वाचायला मिळतात. आता पश्चिम बंगालमधूनही असाच एक प्रकार समोर आला आहे, जो हृदयद्रावक आहे.खोट्या आरोपामुळे एका सात वर्षीय मुलांने टोकाचं पाऊल उचललं आहे.
पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूरमध्ये एका १३ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली. एवढेच नाही तर त्याने एक सुसाईड नोटही लिहिली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरातील लोकांना धक्का बसला आहे. सातवीच्या वर्गात शिकणारा कृष्णेंदु दास याने सुसाईड नोटमध्ये त्याच्या आईसाठी एक संदेश लिहिला आहे, ज्यामध्ये तो म्हणतो, ‘आई, मी चोरी केलेली नाही.’ नेमकं काय आहे प्रकरण?
रविवारी दुपारी बाकुळदा हायस्कूलमधील सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या कृष्णेंदूवर गोसाईंबार बाजारातील एका मिठाईच्या दुकानातून चिप्सचे तीन पॅकेट चोरल्याचा आरोप होता. हे दुकान शुभंकर दीक्षित नावाच्या एका नागरी स्वयंसेवकाचे होते. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, जेव्हा शुभंकरने कृष्णेंदुला दुरून चिप्सच्या पॅकेटसह पाहिले तेव्हा तो लगेच त्याच्या मागे धावला. जेव्हा शुभंकरने त्याला थांबवले तेव्हा कृष्णेंदूने तीन पॅकेटसाठी २० रुपये दिले तर एका पॅकेटची किंमत फक्त ५ रुपये होती. पैसे घेतल्यानंतर, शुभंकरने त्याला पुन्हा दुकानात आणले आणि सार्वजनिकरित्या माफी मागण्यास भाग पाडले.
यानंतर, कृष्णेंदुची आई त्याला दुकानात घेऊन गेली आणि तिथे त्याला सर्वांसमोर फटकारले. या घटनेमुळे मानसिकरित्या दुखावलेल्या कृष्णेंदु घरी परतल्यावर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. कृष्णेंदु यांना गंभीर अवस्थेत तामलुक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते परंतु गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
दुकानदाराने केलेल्या मारहाण आणि सार्वजनिक अपमानामुळे कृष्णेंदुने आत्महत्या केल्याचे त्याच्या कुटुंबाचे म्हणणे आहे. घटनेपासून शुभंकर दीक्षित फरार आहे. कुटुंबाचा असाही विश्वास आहे की आईने जाहीरपणे केलेली टीका मुलाच्या आत्मसन्मानाला खूप दुखावते. या प्रकरणात अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. पोलिसांनी हा अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंदवला आहे. तक्रार दाखल होताच सविस्तर तपास सुरू केला जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.