Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संतोष देशमुख हत्येप्रकरणावरुन खासदार सोनवणेंचा गंभीर आरोप; म्हणाले, हे सगळे आरोपी…

बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पकडलेले सगळे आरोपी पुण्यातच कसे सापडले? असा प्रश्न करत बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी या हत्या प्रकरणाचे पुणे कनेक्शन असल्याचा आरोप केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 16, 2025 | 12:42 PM
संतोष देशमुख हत्येप्रकरणावरुन खासदार सोनवणेंचा गंभीर आरोप; म्हणाले, हे सगळे आरोपी...

संतोष देशमुख हत्येप्रकरणावरुन खासदार सोनवणेंचा गंभीर आरोप; म्हणाले, हे सगळे आरोपी...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पकडलेले सगळे आरोपी पुण्यातच कसे सापडले? असा प्रश्न करत बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी या हत्या प्रकरणाचे पुणे कनेक्शन असल्याचा आरोप केला आहे. पोलीस तपासात हे सगळे बाहेर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तोपर्यंत बीडमध्ये सामाजिक सलोखा राखावा, असे आवाहनही त्यांनी बीडमधील जनतेला केले आहे.

पुण्यात खासदार सोनवणे आले होते. पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भाष्य केले. या हत्येत पकडलेल्या आरोपींना पोलिसांनी मोक्का लावला. तशी जनतेचीच मागणी होती. मोक्का लावला म्हणून कोणी बीडमध्ये मोर्चा काढत असतील तर ते अयोग्य आहे. तिथे जमावबंदी आहे. त्यामुळे ती मोडली जात असेल तर पोलिसांनी त्याची दखल घ्यावी.

पोलिस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. २९ नोव्हेंबरपासूनचा घटनाक्रम तपासला जात आहे. खंडणी कोणी मागितली? मध्यस्थी कोणी केली? किडनॅपिंग कोणी केले? सगळे आरोपी पुण्यातच कसे सापडले? हे सर्व आता तपासात पुढे येईल. बीडचे जिल्हा पोलिस अधीक्षक यावर लक्ष ठेवून आहेत. हा एकच गुन्हा नाही, असे अनेक गुन्हे आता बाहेर येतील. आमची मागणी गुन्हेगारांना शिक्षा व्हावी अशी आहे. ती होईपर्यंत आम्हीही यावर लक्ष ठेवून आहोत, असे सोनवणेही म्हणाले.

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी विरोधी कायदा (मोक्का) लावावा अशी बीडमधील जनतेची मागणी होती. पोलिसांना तपासात तसे काही सापडले असेल, त्यामुळे त्यांनी मोक्का लावला, असे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगितले. मोक्का लावला म्हणून जमावबंदी आदेश मोडून कोणी मोर्चा काढत असेल तर पोलिस त्यांच्यावरही कारवाई करतील, असेही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा : लग्नाच्या आमिषाने अनेक महिलांची फसवणूक; पुण्यातून आरोपीला घेतले ताब्यात

वाल्मिक कराडला ७ दिवसांची पोलीस कोठडी

गेल्या काही दिवसांपासून बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आलेलं आहे, तर या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. वाल्मिक कराडवरही महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) कारवाई करण्यात आलेली आहे. मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडला एसआयटीने ताब्यात घेतलं. त्यानंतर आज वाल्मिक कराडला एसआयटीने बीडच्या न्यायालयात हजर केलं. यावेळी न्यायालयात एसआयटी आणि सरकारी वकिलांसह वाल्मिक कराडच्या वकिलांनी न्यायालयासमोर आपआपली बाजू मांडली. यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराडला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, वाल्मिक कराडला ७ दिवसांनी पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

Web Title: Mp bajrang sonwane has made a serious allegation regarding the santosh deshmukh murder case nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2025 | 12:42 PM

Topics:  

  • maharashtra
  • pune news
  • Santosh Deshmukh Murder
  • Walmik Karad

संबंधित बातम्या

शेती सुधारणांची चुकलेली दिशा! सरकारी योजना का फसल्या? वाचा सविस्तर
1

शेती सुधारणांची चुकलेली दिशा! सरकारी योजना का फसल्या? वाचा सविस्तर

Siddhivinayak Temple Trust : पूरग्रस्तांच्या मदतीला धावला सिद्धिविनायकचा बाप्पा! ट्रस्टकडून “एवढ्या” कोटींची मदत
2

Siddhivinayak Temple Trust : पूरग्रस्तांच्या मदतीला धावला सिद्धिविनायकचा बाप्पा! ट्रस्टकडून “एवढ्या” कोटींची मदत

आशियाई आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राच्या लेकीने भारताच्या नावावर केली चार पदके
3

आशियाई आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राच्या लेकीने भारताच्या नावावर केली चार पदके

नवरात्रोत्सवानिमित्त आरोग्य धात्रींचा पुण्यात विशेष सन्मान; भाजप वैद्यकीय आघाडीचा अनोखा उपक्रम
4

नवरात्रोत्सवानिमित्त आरोग्य धात्रींचा पुण्यात विशेष सन्मान; भाजप वैद्यकीय आघाडीचा अनोखा उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.