
सून आणि सासरे एकत्र करत होते..., नातवाने असं काही पाहिलं की रागाच्या भरात उचललं टोकाचं पाऊल
मध्य प्रदेशातील रेवा येथील बिछिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बद्राओं गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नातवाने आपल्याच आजोबांना काठ्यांनी बेदम मारहाण केली. सासरा आणि सून एकत्र दारू पित होते. याचवेळी नातू घटनास्थळी पोहोचतो. त्याच्या आईला आजोबांसोबत दारू पिताना पाहून तो संतापला आणि त्याने आजोबावर हल्ला केला. ही घटना शनिवारी दुपारी घडली.
सासरे त्यांच्या सुनेसोबत दारू पित होते. जेव्हा त्यांचा नातू करण आला आणि त्याने त्याच्या आईला आजोबांसोबत दारू पिताना पाहिले तेव्हाच त्याचा राग अनावर होतो. रागाच्या भरात त्यांच्यामध्ये वाद सुरु होते. करण राग पाहता आजोबा त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतात. पण करण शांत होण्याचं नाव घेत नाही. जेव्हा त्याच्या आजोबांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा करणचा राग अनावर झालेला असते. नातवाने जवळ पडलेली एक जड काठीने वृद्ध आजोबांवर हल्ला केला. आजोबांना जीव जाईपर्यंत या काठीने मारत राहिला. या मारहाणीमुळे आजोबांचा जागीच जीव गेला. या घटनेनंतर जवळच्या लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण करण संतापला होता.
आजोबांचा जागीच मृत्यू झाला आणि आरोपी नातू गुन्हा केल्यानंतर तेथून पळून गेला. दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येमुळे परिसरात घबराट पसरली आहे. माहिती मिळताच बिछिया पोलीस स्टेशन तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांसह फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची कसून तपासणी केली आणि पुरावे गोळा केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मृताच्या दुसऱ्या नातवाने पोलिसांना घटनेची कहाणी सांगितली, ज्यात किरकोळ वादामुळे करणने कसे प्राणघातक पाऊल उचलले याचे वर्णन केले. पोलिसांनी आरोपी करणविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे आणि त्याचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापे टाकत आहेत. या घटनेमुळे गावकरी हादरले आहेत.