लग्नाच्या आधीपण विवाहितेच्या मागे
आरोपीचं नाव सुशांत मापरे असे आहे. सुशांत मापरे याच मृताच्या पत्नीवर एकतर्फी प्रेम होत. खरंतर आरोपीचं प्रेम महिलेच्या लग्नाआधीपासून होत, पण तीच लग्न दीपक सोबत झालं. याचाच राग आरोपी सुशांतला होता. याच रागातून त्याने दिपकची हत्या केली.
राहत्या घरातच सुरु होता वेश्याव्यवसाय; 1000 रुपये घेऊन महिलेकडे पाठवलं अन्…
आरोपीला अटक
१४ डिसेंबर रोजी दिपकचा मृतदेह परिसरातील नागरिकांना आढळून आला. नागरिकांनी मृतदेह आढळल्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळावर दाखल झाले. त्वरित तपास सुरु केला. तपासादरम्यान, त्यांना आरोपीविरुद्ध पुरावे सापडले आणि त्यांनी आरोपी सुशांतला ताब्यात घेतले. सुशांतच्या अटकेनंतर त्याची कठोर चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान, आरोपीने एकतर्फी प्रेमातून दिपकची हत्या केल्याचं कबूल केलं. आता या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
येरवडा जेलमध्ये कैद्यांमध्ये हाणामारी, फरशीने डोके-कंबर फोडली; हाणामारीत आरोपीचा मृत्यू
महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा तुरुंग हा पुण्यातील येरवडा मध्यवर्ती तुरुंग आहे. हा तुरुंग महासुरक्षित तुरुंग आहे असल्याचे म्हंटले जाते. परंतु आता याच कारागृहातून हाणामारी झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. हाणामारीत एका आरोपीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही घटना १५ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. मृत्यू झालेल्या आरपीचा नाव विशाल कांबळे असे आहे.
काय घडलं नेमकं?
कारागृहातील कैद्यांनी विशालच्या डोके आणि कमरेवर फरशीने वार केले. मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आकाश चंडालिया आणि दीपक रेड्डी असे आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विशालला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात दाखल केलेल्या विशालचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाराक क्रमांक १ मध्ये आरोपीला मारहाण झाल्याची माहिती मिळाली आहे. आरोपी विशालच्या मृत्यूने येरवडा कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कैद्यांमध्ये खळबळ
पुण्यातील येरवडा कारागृहातून सुटल्यानंतर गुन्हेगारांनी रॅली किंवा ‘रोड शो’केल्याचे अनेकदा समोर आलं आहे. आता कारागृहातच हाणामारी होऊन आरोपीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे कैद्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पुण्यातील येरवडा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Ans: आरोपी सुशांत मापरेचं मृताच्या पत्नीवर एकतर्फी प्रेम होतं. तिचं लग्न दुसऱ्याशी झाल्याने रागातून त्याने पतीची हत्या केली.
Ans: मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पुरावे मिळाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
Ans: होय, पोलिस चौकशीत आरोपीने एकतर्फी प्रेमातून हत्या केल्याची कबुली दिली आहे.






