Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Accident: दादरनंतर आता कांदिवलीत बेस्ट बसचा कहर; भरधाव बसने दोघांना उडवलं; थरार CCTV मध्ये कैद

मुंबईतील कांदिवली येथे भरधाव बेस्ट बसने दोन पादचाऱ्यांना जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात 24 वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांकडून चालक आणि बसच्या तांत्रिक बाबींचा तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 10, 2026 | 02:54 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कांदिवलीतील पोईसर डेपोजवळ भरधाव बेस्ट बसने दोन पादचाऱ्यांना धडक दिली.
  • अपघातात सोनम मौर्य गंभीर जखमी, तर आदर्श यादव किरकोळ जखमी झाला.
  • संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद; पोलिसांकडून तपास सुरू.
मुंबई: मुंबईतील दादर येथील भीषण अपघाताची घटना ताजी असतानाच आता कांदिवलीत पुन्हा एकदा बेस्ट बसच्या बेफाम वेगाने थरार निर्माण केला आहे. भरधाव बेस्ट बसने दोन पादचाऱ्यांना जोरदार धडक दिल्याचे समोर आले आहे. या भीषण अपघातात 24 वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना ८ जून रोजी सकाळच्या सुमारास ११ वाजून ४० मिनिटांनी कांदिवलीच्या पोईसर डेपोजवळ घडली.

कसा झाला अपघात?

सोनम मौर्य (वय २४) आणि आदर्श हिरालाल यादव (वय २४) या अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. अपघाताच्या वेळी बसवर इव्ही ट्रान्स कंपनीचे चालक आणि बेस्टचे वाहक कर्तव्यावर होते. सोनम आणि आदर्श हे दोघेही रस्ता ओलांडत होते. त्यावेळी गोराई डेपोच्या बसने या दोघांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर बसच्या वाहकाने तातडीने दोन्ही जखमींना उपचारासाठी जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले.

Mumbai Accident: 17 जूनला गावी जाणार होता… पण त्याआधीच मुंबईत काळाने गाठलं; BEST बस अपघातात तरुणाचा मृत्यू

तरुणीची प्रकृती चिंताजनक

या अपघातात सोनमच्या डोक्याला आणि पायाला अत्यंत गंभीर दुखापत झाली आहे. ती अद्याप बेशुद्ध अवस्थेत आहे. तिच्यावर सध्या शताब्दी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. तर आदर्शच्या खांद्याला आणि उजव्या डोळ्याजवळ किरकोळ दुखापत झाली असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात प्राथमिक उपचार केले जात आहेत.

सीसीटीव्ही फुटेज समोर

या अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. हा अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला की बसमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

मुंबईच्या कांदिवलीत पुन्हा अपघात, बेस्ट बसने दोघांना चिरडलं pic.twitter.com/3dVxV2CevN — News18 Marathi (@News18_marathi) June 10, 2026

Thane Crime: भटक्या कुत्र्याच्या तोंडात दिसला नवजात बालकाचा मृतदेह; एक पाय खाल्ला आणि…; स्थानिक हादरले!

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा अपघात नेमका कुठे घडला?

    Ans: कांदिवलीतील पोईसर डेपोजवळ हा अपघात घडला.

  • Que: अपघातात किती जण जखमी झाले?

    Ans: या अपघातात दोन पादचारी जखमी झाले.

  • Que: पोलिस कोणत्या बाबींचा तपास करत आहेत?

    Ans: चालकाची निष्काळजीपणा किंवा बसमध्ये तांत्रिक बिघाड होता का, याचा तपास सुरू आहे.

Web Title: Mumbai accident after dadar now a best bus rampage in kandivali speeding bus mows down two people harrowing incident captured on cctv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Ambarnath Crime: थरकाप उडवणारी घटना! वरवंट्याने डोक्यावर वार, गुप्तांगावर…; 7 वर्षीय मुलाची आईच्या प्रियकराकडून हत्या
1

Ambarnath Crime: थरकाप उडवणारी घटना! वरवंट्याने डोक्यावर वार, गुप्तांगावर…; 7 वर्षीय मुलाची आईच्या प्रियकराकडून हत्या

Mumbai Crime: पंचर काढताना चोराने मारला डल्ला; 111 लाख 55 हजार रुपये केले लंपास; अवघ्या २४ तासात आरोपी जेरबंद
2

Mumbai Crime: पंचर काढताना चोराने मारला डल्ला; 111 लाख 55 हजार रुपये केले लंपास; अवघ्या २४ तासात आरोपी जेरबंद

Bengaluru Crime : Gemini AI ला विचारून रचला तिहेरी हत्येचा कट; आधी आंधळं कसं….; लिव्ह-इन पार्टनरसह दोघे अटकेत
3

Bengaluru Crime : Gemini AI ला विचारून रचला तिहेरी हत्येचा कट; आधी आंधळं कसं….; लिव्ह-इन पार्टनरसह दोघे अटकेत

Karnataka Crime: ‘संपत्ती कशी वाटायची’ चिठ्ठीत लिहिलं अन् संपूर्ण कुटुंब संपवलं; म्हैसूरमधील धक्कादायक घटना
4

Karnataka Crime: ‘संपत्ती कशी वाटायची’ चिठ्ठीत लिहिलं अन् संपूर्ण कुटुंब संपवलं; म्हैसूरमधील धक्कादायक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.