काय घडलं नेमकं?
दादरवरून मार्ग क्र. 463 वर धावणाऱ्या इलेक्ट्रिक बेस्ट बसने सोमवारच्या (8 जून) सकाळी 9.30 च्या सुमारास वीर कोतवाल गार्डनजवळ नियंत्रण गमावलं. यात बसने एका क्रेनला जोरदार धडक दिली. यानंतर खाजगी कार, टॅक्सी, उबर कॅब आणि दोन दुचाकींसह पाच वाहनांनाही चिरडलं. या अपघातात इतर सहा जण जखमी झाले आहेत. तर, नियाज अहमद याचा मृत्यू झाला. बसने धडक दिली तेव्हा अहमद त्याच्या इलेक्ट्रिक स्कूटरवर होता. त्याला तातडीने सायन रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तिथे डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. दुसरा डिलिव्हरी कामगार, 22 वर्षीय ऋषभ गुप्ताच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
Jalgaon Crime: जळगावात थरारक हत्याकांड! किरकोळ कारणावरून वृद्धाची हत्या, एक आरोपी ताब्यात
बहिणीच्या लग्नासाठी पैसे साठवले आणि…
या प्रकारातील मृत अहमद हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. नियाज रोजगाराच्या शोधात पाच वर्षांपूर्वी मुंबईत आले होते. नियाज चांगल्या संधींच्या शोधात होता. मात्र तात्पुरत्या स्वरूपात स्विगीमध्ये डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होता. तो आपल्या चुलत भावासोबत राहत होता. त्याचा भाऊ एक रोजंदारी मजूर आहे. त्याचे आई-वडील आणि लहान बहीण उत्तर प्रदेशात राहतात. पूर्वी तो हातगाडीवर कांदा- बटाटा विकायचा, पण नंतर कुटुंबाला हातभार लावण्यासाठी आणि बहिणीच्या लग्नासाठी पैसे साठवण्यासाठी त्याने स्विगीमध्ये काम सुरू केले होते. असे नियाजच्या काकांनी रोज अली यांना सांगितलं.
तर नातेवाईकांच्या सांगण्यानुसार, त्याने नुकतीच लग्नाची चर्चा सुरू केली होती. लग्नाविषयी बोलणी सुरू असून यासाठी तो 17 जूनला होणाऱ्या वधूच्या कुटुंबाला भेटण्यासाठी उत्तर प्रदेशला जाणार होता, असंही अली यांनी सांगितलं. मात्र आता या अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबात शोककळा पसरली आहे.
दरोड्याच्या तयारीतील टोळी आंबेगाव पोलिसांच्या जाळ्यात, कोयता अन् मिरची पावडर जप्त; तिघांना अटक
Ans: मुंबईतील दादरच्या वीर कोतवाल उद्यानाजवळ हा अपघात घडला.
Ans: नियाज अहमद नावाचा स्विगी डिलिव्हरी बॉय या अपघातात मृत्यूमुखी पडला.
Ans: बेस्ट बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने अनेक वाहनांना धडक दिली.






