Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

APMC Market : APMC दक्षता पथकाकडून मोठी कारवाई ; बिना लायसन्स शेतमालाचे 200 कंटेनर जप्त

बाजार समितीचा कार्यक्षेत्रात बिना लायसन्स व सेस न भरता मोठ्या प्रमाणात शेतमालाचा अनधिकृतपणे आयात करणाऱ्या एका आयातदारावर कारवाई करण्यात आली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 31, 2025 | 06:03 PM
APMC Market : APMC दक्षता पथकाकडून मोठी कारवाई ; बिना लायसन्स शेतमालाचे 200 कंटेनर जप्त
Follow Us
Close
Follow Us:

APMC Market: मुंबई एपीएमसी दक्षता पथकाने मोठी कारवाई केल्याचं समोर आलं आहे. बिनपरवाना व बाजारसमितीचा सेस न भरल्यामुळे आयातदाराचा “तूर”चा कंटेनर परस्पर विक्रीसाठी घेऊन जात असताना जप्त केला आहे .या आयातदाराने बाजारसमितीकडून कोणतीही परवानगी घेतलेले नाही . तब्बल 200 कंटेनर मधे 5000 टन “तूर “ दुबईमधून आयात केल्यावर नावाशेवा येथील एका कंटेनर गोदमात ठेवण्यात आला आहे .या तुराची अंदाजे किंमत 34 कोटी 60 लाख रुपये असून यावर 1 कोटी 11 लाख 48 हजार रुपये दंड बाजार समिती प्रशासनाकडून वसुली करण्यात येणार आहे .बाजार समितीच्या इतिहासात सर्वात मोठी कारवाई मानले जात आहे .सदर कारवाई मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दक्षता पथकाकडून करण्यात आली आहे . बाजार समितीचा कार्यक्षेत्रात बिना लायसन्स व सेस न भरता मोठ्या प्रमाणात शेतमालाचा अनधिकृतपणे आयात करणाऱ्या एका आयातदारावर कारवाई करण्यात आली आहे.

कारवाईची पार्श्वभूमी

29 मे 2025 रात्री 8 बाजता मुंबई एपीएमसी दक्षता पथकाने बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील JNPT, तुर्भे, नेरुळ, ठाणे-बेलापुर रोड, नवी मुंबई, परिसरात अनधिकृत शेतमालाच्या वाहनांची तपासणी करत असताना उरण -JNPT येथील वहाळ फाटा येथे परदेशातून आयात करण्यात आलेला “तूर” हा शेतमाल घेऊन जाणाऱ्या वाहन (कंटेनर) जात असल्याची माहिती दक्ष्ता पथकाला मिळाली .त्यानंतर पथकाने वाहन क्रमांक एमएच ४८ टी ८१५६ हे तपासणी केला असताना या कंटेनरमधे परदेशातून आयात करण्यात आलेला तूर मिळाली .अधिक चौकशीअंती समजले की सदर शेतमाल हा मे. अग्ग्लो कमोडीटीस, FZE , जीबलअली, फ्री झोन, दुबई येथून पाठवण्यात आली आहे . सदर बिलानुसार तुरीचा शेतमाल मुंबई येथील मे. नमहा इंपोर्ट्स यांचे नावाने एकुण 200 कंटेनरची आयात झाल्याचे कागदपत्रावरुन दिसून आली आहे.

या आयातदाराने आयात केलेल्या शेतमाल बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात ठेवण्यापूर्वी बाजार समितिकडून कोणतीही अधिकृत परवाना घेतला नाही तसेच त्याचे नावे बाजार सामितीचे आयातदार लायसन्स सुधा नाही. सदर वाहनाच्या वाहन चालकाकडे वाहनातील शेतमालाची व कागदपत्रांची मागणी केली असता सदर वाहन धारकाने दिलेल्या बि .एल क्रंMEDUAC053447
या कागदपत्रांवरुन त्या कन्साईनमेंटमध्ये जवळपास 5000 टन ‘तूर’ असून सदर शेतमालाची एकूण किंमत 34 कोटी 60 लाख रुपये बोलले जात आहे .बाजार समिती प्रशासनाने सदर आयातदारावर तीन पट्ट 1 कोटी 11 लाख 48 हजार दंड मारून वसुली करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई एपीएमसी सचिव डॉ.पी .एल खंडागले यांनी दिली आहे.

बाजार फी, देखरेख खर्च न भरता बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात व्यवहार करत असल्याचे दक्षता पथकाना आढळून आल्यामुळे सदर वाहन ताब्यात घेवून मुख्यालयात जमा करण्यात आली आहे . सदर वाहन आयातदाराने शेतमाल बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात आणण्यापूर्वी पूर्व सूचना न देता आणलेला असल्याने सदर आयतदाराचा बाजार फी व देखरेख खर्च चुकविण्याचा हेतु होता याबाबत खात्री झाल्याने सदर वाहनावर महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन विकास व विनियमन अधिनियम 1963मधील कलम 32 मधील 9अ आणि क अन्वये 3 पट दंड आकारण्याची कार्यवाही करून बाजार फी, देखरेख खर्च व अनुषंगिक खर्च वसूल करण्यात येणार आहे .

सदर कारवाई मुंबई एपीएमसी सभापती प्रभू पाटील ,उप सभापती हुकूमचंद आमधारे यांच्या आदेशाने मुंबई एपीएमसीचे सचिव डॉ.पी .एल .खंडागले यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षता पथकाचे उप सचिव महेश साळुंके पाटील ,अनंत पारदुले , संजय खांडेकर , अजित नारंगकर, विनीत उबाळे यांनी कारवाई केली आहे. ही कारवाई म्हणजे बाजारसमितीला सेस न भरता व्यापार करणे बेकायदेशीरपणे आयात करून शेतमालाची विक्रीविरुद्धचा एक ठोस पाऊल आहे .बाजार समितीचा उत्पन्न वाढीसाठी असे कारवाई होणे आवश्यक आहे .दक्षता पथकाने दाखवलेली तत्परता आणि दक्षता यामुळे भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी कडक पावले उचलली जातील ,यात शंका नाही त्यामुळे व्यापाऱ्यांनी अश्या प्रकारे अनधिकृत पणे व्यापार आयात निर्यात करण्यापेक्षा बाजार समितीची लायसन्स घेवून व्यापार करावा असे आवाहन एपीएमसी प्रशासनाकडून करण्यात आली आहे ..

Web Title: Mumbai apmc market major action by apmc vigilance team 200 containers of unlicensed agricultural produce seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2025 | 06:03 PM

Topics:  

  • APMC Market
  • crime
  • Mumbai

संबंधित बातम्या

Pune News: ९ दिवसांच्या बाळाला सोडून २४ वर्षीय महिला बेपत्ता; घरात कुणालाही न सांगता महिला…
1

Pune News: ९ दिवसांच्या बाळाला सोडून २४ वर्षीय महिला बेपत्ता; घरात कुणालाही न सांगता महिला…

Dahi Handi 2025 : 10 थरांचा विश्वविक्रम, कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाला 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर
2

Dahi Handi 2025 : 10 थरांचा विश्वविक्रम, कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाला 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर

स्वातंत्र्यदिनी ८ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; घटनेने नागरिकांमध्ये संताप, आरोपीचे हॉटेल फोडले
3

स्वातंत्र्यदिनी ८ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; घटनेने नागरिकांमध्ये संताप, आरोपीचे हॉटेल फोडले

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी
4

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.