रेल्वे प्रशासनाच्या निर्णयावर किशोरी पेडणेकरांचा संताप (Photo - X)
मुंबई : मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपूजेनिमित्त भोजपुरी गाणी वाजवली जात असल्याने नवा वाद पेटला आहे. या प्रकारावरून ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी रेल्वे प्रशासनासह राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. ‘उत्तर प्रदेश आणि बिहारमधील रेल्वे स्थानकांवर महाराष्ट्राची गाणी वाजवली जातील का?’ असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे मराठी भाषा आणि स्थानिक संस्कृतीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. (Mumbai News)
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर मोठ्या आवाजात भोजपुरी गाणी वाजवली जात असल्याचा आरोप पेडणेकर यांनी केला. विशेष म्हणजे, प्रवाशांसाठी महत्त्वाच्या रेल्वे उद्घोषणा आणि वेळापत्रकाच्या सूचना बाजूला ठेवून गाणी वाजवली जात असतील, तर हा नेमका कोणता कारभार आहे, असा सवालही त्यांनी केला.
‘आमचा गाण्यांना विरोध नाही. मात्र, ज्या ठिकाणी जी स्थानिक भाषा आणि संस्कृती आहे, तिचा मान राखला गेला पाहिजे,’ अशी भूमिका त्यांनी मांडली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरही महाराष्ट्रात मराठीला दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
NCP Merger News: अजित पवार महायुतीची साथ सोडणार होते; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
छठपूजेच्या श्रद्धेबाबत बोलताना पेडणेकर यांनी महत्त्वाची भूमिका मांडली. छठपूजा पाण्याजवळ केली जाते आणि भाविकांच्या श्रद्धेचा आम्हाला आदर आहे, असं त्या म्हणाल्या. गणेशोत्सवासाठी जसे कृत्रिम तलाव तयार केले जातात, तसेच छठपूजेसाठीही संबंधित वस्त्यांमध्ये कृत्रिम तलाव तयार करावेत, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, कोणत्याही धार्मिक कार्यक्रमामुळे मुंबईच्या दैनंदिन जनजीवनावर परिणाम होता कामा नये, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
केवळ भोजपुरी गाण्यांचाच मुद्दा नाही, तर रेल्वे प्रशासनाचा एकूण कारभारच संशयाच्या भोवऱ्यात असल्याचं पेडणेकर म्हणाल्या. रेल्वे सेवा बंद राहणे, प्रवाशांना पूर्वसूचना न मिळणे आणि अपुऱ्या सुरक्षेमुळे होणाऱ्या घटनांवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांना मैदाने उपलब्ध होत नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. कोकणी जत्रेसारख्या कार्यक्रमांना जागा मिळत नसेल, तर मराठी माणसाच्या हक्कांचं काय, असा सवाल त्यांनी केला.
नायगाव रेल्वे स्थानकातील तरुणीच्या छेडछाडीच्या घटनेवरूनही त्यांनी गृहखात्याला लक्ष्य केलं. महिलांच्या सुरक्षेबाबत केवळ आश्वासनं नकोत, तर ठोस कारवाई हवी, अशी मागणी त्यांनी केली. एकूणच, भोजपुरी गाण्यांवरून सुरू झालेला हा वाद आता मराठी अस्मिता, रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारच्या कारभारापर्यंत पोहोचला आहे.
Ans: छठपूजेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवली जात असल्याचा मुद्दा समोर आला आहे. यावरून स्थानिक भाषा आणि संस्कृतीच्या प्राधान्याबाबत वाद निर्माण झाला आहे.
Ans: रेल्वे स्थानकांवर मोठ्या आवाजात भोजपुरी गाणी वाजवण्याऐवजी स्थानिक मराठी भाषा आणि संस्कृतीला प्राधान्य द्यावे, अशी भूमिका किशोरी पेडणेकर यांनी मांडली. तसेच उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये महाराष्ट्राची गाणी वाजवली जातील का, असा सवाल केला.
Ans: गणेशोत्सवाप्रमाणे छठपूजेसाठीही संबंधित वस्त्यांमध्ये कृत्रिम तलाव तयार करून द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. छठपूजेच्या श्रद्धेला विरोध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.






