Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: “आत्महत्या कर, नाहीतर नोकरी घालवू” – धमकीनंतर पोलीस कर्मचाऱ्याचे टोकाचे पाऊल; नेमकं प्रकरण काय?

मुंबईत प्रशिक्षण घेत असलेल्या 32 वर्षीय पोलीस शिपायाने प्रेयसीच्या कुटुंबीयांच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये धमक्यांचा उल्लेख असून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 18, 2026 | 10:11 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • प्रेयसीच्या कुटुंबीयांकडून मानसिक छळ आणि धमक्या
  • प्रशिक्षण केंद्रात पोलीस शिपायाची आत्महत्या
  • सुसाईड नोटमधून नावांचा खुलासा; आरोपींवर गुन्हा
मुंबई: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३२ वर्षीय पोलीस शिपायाने प्रेयसीच्या कुटुंबियांकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. जीव दे, नाहीतर तुझी नोकरी घालवू, अशी धमकी प्रेयसीच्या आईने दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

काय नेमकं प्रकरण?

भैयासाब भीमराव व्हावळे (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. भैयासाब यांची नुकतीच ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई पोलीस दलात चालक पदावर नियुक्ती झाली होती. ते कलिना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात आपले प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण करत होते. मात्र १५ मार्च रोजी सकाळी त्यांनी प्रशिक्षण केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट सापडली.

Pune Crime: शाळेतून घरी आला, खेळायला गेला आणि…, थेट आढळला मृतदेह; हत्या की अपघात?

सुसाईड नोट मध्ये काय?

या घटनेनंतर पोलिसांनी केलेल्या तपासात भैयासाब यांच्या खिशात सुसाईड नोट सापडली. या चिठ्ठीत त्यांनी आपल्या मृर्तीसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींची नावे स्पष्टपणे लिहिली आहेत. प्रेयसीच्या वडिलांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, तर तिच्या आईने “आत्महत्या कर, नाहीतर तुझी नोकरी घालवू” अशी धमकी दिली होती. या सगळ्या मानसिक छळाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

गुन्हा दाखल

भैयासाब यांचे नांदेड जिल्ह्यातील हादगाव येथील दिव्या नावाच्या तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र, मुलीच्या घरच्यांचा या नात्याला तीव्र विरोध होता. भैयासाब यांचे वडील भीमराव व्हावळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी प्रेयसीच्या आई आणि वडिलांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कायदेशीर पुराव्यासाठी पोलीस आता फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेणार आहेत. हस्ताक्षराचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोपींवर पुढील कडक कारवाई केली जाणार आहे. या घटनेने पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Ahilyanagar Crime: पत्ता विचारण्याचा बहाणा आणि थेट ॲसिड हल्ला; सहावीतील मुलीचा उजवा डोळा आणि…, मुलगी गंभीर जखमी

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: मुंबईतील कलिना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात ही घटना घडली.

  • Que: आत्महत्येमागचे कारण काय?

    Ans: प्रेयसीच्या आई-वडिलांकडून होत असलेल्या मानसिक छळ आणि धमक्यांमुळे त्यांनी हे पाऊल उचलले.

  • Que: सुसाईड नोटमध्ये काय नमूद आहे?

    Ans: त्यांनी आपल्या मृत्यूसाठी जबाबदार व्यक्तींची नावे आणि मिळालेल्या धमक्यांचा उल्लेख केला आहे.

Web Title: Mumbai crime commit suicide or well cost you your job police constable takes drastic step following threat what exactly is the case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 10:11 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
1

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
2

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या
3

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या

Karnatak crime: ग्लुकोजच्या बाटलीतून विष अन् माजी सैनिकाचा मृत्यू; 3 महिन्यांनी मृतदेह काढला कबरीतून बाहेर…
4

Karnatak crime: ग्लुकोजच्या बाटलीतून विष अन् माजी सैनिकाचा मृत्यू; 3 महिन्यांनी मृतदेह काढला कबरीतून बाहेर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.